Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

काय असेल JEE Main आणि NEET परीक्षेचा अभ्यासक्रम? जाणून घ्या…

JEE, Neet Exam Syllabus

JEE, Neet Exam Syllabus  : JEE, Neet exam 2021 syllabus to remain unchanged for 2021 announced education ministry –  इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अर्थात JEE आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या NEET परीक्षेसाठी अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना विचारण्याच येणाऱ्या प्रश्नांची संख्या वाढवण्यात येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

JEE Main 2021 चा सिलॅबस मागील वर्षीप्रमाणेच असेल. विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायॉलॉजीमधील प्रत्येकी २५ प्रश्न सोडवायचे असतील.विचारण्यात आलेल्या प्रश्नांची एकूण संख्या ९० असेल. या ९० पैकी ७५ प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचेच आहेत. NEET 2021 परीक्षेचा नेमका पेपर पॅटर्न कसा असेल ते अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र ज्या पद्धतीने देशातील अनेक राज्यांमध्ये बोर्डाचा सिलॅबस कमी केला आहे, ते पाहता नीट परीक्षेसाठी देखील जेईई मेन प्रमाणेच निर्यण होण्याची दाट शक्यता आहे.

फेब्रुवारी महिन्यातील २३, २४, २५ आणि २६ या तारखांना जेईई मेन २०२१ चा पहिला टप्पा पार पडणार आहे. देशातील आयआयटी, एनआयटी आणि अन्य सीएफटीआय संस्थांमधील अभियांत्रिकीच्या यूजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा घेतली जाते. यंदा तब्बल चार वेळा ही परीक्षा होणार आहे. फेब्रुवारीव्यतिरिक्त मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात या परीक्षेचे अन्य तीन टप्पे पार पडणार आहे.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड