JEE Main 2021 परीक्षेची तारीख बदलली, नवे वेळापत्रक पाहा

JEE Main Exam

Table of Contents

JEE Main Exam 2021 Latest Update

JEE Main Exam : Entrance test dates for admission to the Engineering UG course were announced. Union Education Minister Dharmendra Pradhan tweeted about it. Further details are as follows:-

इंजिनीअरिंग यूजी कोर्सच्या प्रवेशासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात आली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली.

जेईई मेनच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्राच्या परीक्षेमध्ये किमान ४ आठवड्याचे अंतर असावे अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. यासाठी ही परीक्षा आता २६,२७,३१ ऑगस्ट २०२१ आणि २ सप्टेंबर २०२१ ला होणार आहे. परीक्षेची तारीख बदलण्यासोबतच जेईई मेन सेशन ४ नोंदणीची शेवटची तारीख देखील वाढवण्यात आली आहे. आता विद्यार्थी २० जुलै २०२१ पर्यंत jeemain.nta.nic.in वर नोंदणी करु शकतात.

Admission letter has been announced for NTA JEE Main April 2021 (JEE Main 3rd session). The exam will start on July 20. Exams will be held online on 20, 22, 25 and 27 July 2021 in 334 cities across the country and abroad. 


JEE Main March Application Form 2021 

JEE Main Exam : The National Testing Agency (NTA) has started the application process for the fourth session of JEE Mains 2021 from today. Candidates who want to apply for this exam can register online on NTA’s official website jeemain.nta.nic.in. Further detailr are a follows:-

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)तर्फे जेईई मेन्स २०२१ च्या चौथ्या सत्रासाठी नोंदणी आजपासून करता येणार आहे. यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जावे लागणार आहे. उमेदवारांना यावरील लिंकवर १२ जुलैपर्यंत नोंदणी करुन अर्ज शुल्क भरता येणार आहे.

जेईई मेन चौथे सत्र २७ जुलै पासून २ ऑगस्टपर्यंत आयोजित केले आहे. यासाठी प्रवेश पत्र अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर उपलब्ध होणार आहे. या तीन दिवसात ज्यांनी आधी एप्रिल किंवा मार्चच्या सत्रासाठी अर्ज केला आहे ते आपला अर्ज अपलोड करु शकतात.

JEE Main March Application Form 2021 

 • जेईई मेन्सची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा
 • होमपेजवर असलेल्या लिंकवर क्लिक करा
 • नाव,शैक्षणिक आर्हता हा तपशिल भरा आणि जेईई मेन्स नोंदणी पूर्ण करा
 • फोटो आणि सहीची स्कॅन कॉपी अपलोड करा
 • जेईई मेन्स २०२१ साठी अर्ज शुल्क भरा
 • प्रत डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा

JEE Main 2021 Exam Dates

JEE Main Exam : JEE Mains exam dates have been announced. Union Education Minister Ramesh Pokhriyal informed about this on Twitter. The window will also be kept open for students who did not register for the session, he said.

जेईई मेन्स परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी या सत्रासाठी नोंदणी केली नव्हती त्या विद्यार्थ्यांसाठी देखील विंडो खुली ठेवण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री म्हणाले.

एप्रिल २०२१ मध्ये होणारी जेईई मेन परीक्षा २० ते २५ जुलैदरम्यान आयोजित होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या टप्प्यात (एप्रिल२०२१) साठी अर्ज केला नव्हता ते आता अर्ज करु शकतात. जेईई मेन२०२१ तिसऱ्या सत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ६ जुलै चे ८ जुलै रात्री ११ वाजेपर्यंत विंडो खुली असणार आहे.

जेईई मेन (मे) २०२१ परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये 

जेईई मेन२०२१ च्या चौथ्या टप्प्याची परीक्षा मे २०२१ मध्ये होणार होती. ही परीक्षा आचा २७ जुलैपासून २ ऑगस्टदरम्यान होणार आहे. ज्या उमेदवारांनी चौथ्या आणि शेवटच्या सत्रासाठी अर्ज केले नव्हते ते आता ९ ते १२ जुलैपर्यंत नोंदणी करु शकतात.


JEE Main Exam Details 

JEE Main Exam : The JEE Main exam, which is important for IIT admissions in the country, will be held in the last week of July. The results of the test will be announced by August 14, according to the National Testing Agency (NTA).

देशातील IIT प्रवेशासाठी महत्त्वाची असलेली जेईई मेन हि परीक्षा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाणार आहे. या परीक्षेचा निकाल हा 14 ऑगस्टपर्यंत जाहीर केला जाईल, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) जाहीर केली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

JEE Main Exam


JEE Main ExamThe JEE Main May exam has also been postponed. The National Testing Agency has issued a notice in this regard.

JEE Main May 2021: मे सत्राची परीक्षाही लांबणीवर. JEE Main May 2021: जेईई मेन मे परीक्षा देखील स्थगित करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यासंदर्भात नोटीस जारी केली आहे.

एप्रिल नंतर आता जेईई मेन मे सत्राची परीक्षा देखील लांबणीवर पडली आहे. ही परीक्षा २४ ते २८ मे २०२१ या कालावधीत होणार होती. दरम्यान, जेईई एप्रिल सत्र परीक्षाही यापूर्वी स्थगित करण्यात आली आहे. केवळ फेब्रुवारी आणि मार्च सत्राच्या परीक्षा झाल्या आहेत. जेईई मेन मे २०२१ सत्रासाठी नोंदणी सुरू करण्यात आली नव्हती. एनटीएने सांगितले की नोंदणीची तारीख नंतर घोषित केली जाईल.

परीक्षेसंबंधीच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी ऑफिशियल वेबसाइट्स nta.ac.in आणि jeemain.nta.nic.in वर भेट देत राहावी. जेईई मेन संबंधी कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी ०११-४०७५९००० वर किंवा [email protected] वर ईमेल द्वारे संपर्क साधण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.


JEE Main 27 ते 30 एप्रिल या कालावधीत होणारी परीक्षा लांबणीवर – नवी तारीख लवकरच

JEE Main Exam : The National Testing Agency has decided to postpone the JEE Main April session exams in the wake of Corona. The next date of the exam will be announced soon.

JEE Main 27 ते 30 एप्रिल या कालावधीत होणारी परीक्षा लांबणीवर – नवी तारीख लवकरच. JEE Main एप्रिल सत्र परीक्षा लांबणीवर – पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. करोनाच्या पार्श्वभूमीवर JEE Main एप्रिल सत्र परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतल्या आहे. परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

करोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली. ही परीक्षा २७ ते ३० एप्रिल या कालावधीत होणार होती.

नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल आणि विद्यार्थ्यांना परीक्षेआधी किमान १५ दिवसांचा अवधी मिळेल. दरम्यान, यापूर्वी सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे तर बारावीची परीक्षा लांबणीवर पडली आहे. महाराष्ट्रातही दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.


JEE Main 2021 April Session: प्रवेशपत्र कधी?

JEE Main Exam – Admit card for JEE Main April 2021 exam will be issued soon. The third session of JEE Main 2021 is being held from April 27 to April 30th.

JEE Main 2021 April Session: प्रवेशपत्र कधी?- JEE Main April 2021 परीक्षेचे अॅडमिट कार्ड लवकरच. JEE Main April 2021 परीक्षेचे अॅडमिट कार्ड लवकरच जारी होणार आहे. जेईई मेन २०२१ चे तिसरे सत्र २७ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे लवकरच जेईई मेन एप्रिल सत्र परीक्षेचे अॅडमिट कार्ड अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जारी करण्यात येईल. विद्यार्थी आपले प्रवेशपत्र अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्डसह लॉग इन करून डाउनलोड करू शकतात.

How to Download JEE Main 2021 Admit Card-

 • – सर्वात आधी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
 • – आता अॅडमिट कार्डसाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
 • – आता लॉग इन विंडो वर आपला अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाका.
 • – आता सर्व माहिती सबमिट करा.
 • – अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करा आणि प्रिंट आऊट घेऊन ठेवा.

JEE Main 2021 April Session: अर्जदुरुस्तीसाठी मुदतवाढ

JEE Main Exam : JEE Main April session application deadline has been extended. Candidates can amend the application for the JEE Main Examination 2021 for the April session on 6th and 7th April 2021 till 11.50 pm.

JEE Main 2021 April Session: अर्जदुरुस्तीसाठी मुदतवाढ. JEE Main एप्रिल सत्राच्या अर्जदुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवार जेईई मेन परीक्षा 2021 च्या एप्रिल सत्रासाठी ६ आणि ७ एप्रिल २०२१ रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत अर्जात दुरुस्ती करू शकतील. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनी (NTA) ने जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन, म्हणजे जेईई मेन २०२१ एप्रिल सत्रासाठी अर्जात दुरुस्ती करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

शुल्क जमा करण्याची अंतिम मुदतही वाढवण्यात आली आहे. यासंबंधी अधिकृत वेबसाइटवर एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. JEE Main परीक्षा 2021 च्या एप्रिल सत्रासाठी ६ आणि ७ एप्रिल २०२१ रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत अर्जात दुरुस्ती करू शकतील तसेच शुल्क जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतील.


JEE Main 2021 परीक्षेच्या एप्रिल आणि मे सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

JEE Main Exam: JEE Main 2021 परीक्षेच्या एप्रिल आणि मे सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू – नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एप्रिल मे 2021 सेशनच्या रजिस्ट्रेशन संबंधी परिपत्रक जारी केले आहे. JEE Main 2021 परीक्षेच्या एप्रिल आणि मे सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार 25 मार्च 2021 पासून 4 एप्रिल 2021  (रात्री 11.50 वाजेपर्यंत) या कालावधीत जेईई मेन परीक्षांसाठी नोंदणी करता येणार आहे. मात्र दोन्ही सत्रांसाठी भरावयाचे शुल्क 5 एप्रिल 2021 रोजी रात्री 11.50 वाजेपर्यंतच भरता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी त्वरित नोंदणी करावी.

JEE Main 2021 परीक्षा एप्रिलमध्ये 27 ते 20 पर्यंत तर मे मध्ये 24 ते 28 मे पर्यंत होणार. एनटीएच्या परिपत्रकानुसार एप्रिल सत्राची जेईई मेन परीक्षा 27, 28, 29 आणि 30 एप्रिल 2021 रोजी आयोजित केली जाईल. मे सत्राची परीक्षा 24, 25, 26, 27 आणि 28 मे 2021 रोजी आयोजित केली जाईल. एप्रिल मध्ये केवळ पेपर १ चे आयोजन केले जाईल. जेईई मेन 2ए या 2बी परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना जेईई मेन मे 2021 साठी नोंदणी करावी लागेल.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…


JEE Main 2021 : विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स 

JEE Main Exam : जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम मेन २०२१ (JEE Main 2021) चा पहिला टप्पा २३ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे आणि परीक्षा २३, २४, २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहेत. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. आपणही या परीक्षेला बसणार असाल तर परीक्षेच्या वेळी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत हे जाणून घ्या. या परीक्षेच्या माध्यमातून अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जातात.

परीक्षेच्या वेळी या गोष्टी लक्षात ठेवा –

 • १) सूचना योग्य रीतीने वाचा: कोणतीही महत्वाची माहिती सुटू नये म्हणून माहिती काळजीपूर्वक वाचा.
 • २) विभागाची निवड: प्रथम रसायनशास्त्र विभाग निवडण्याचा प्रयत्न करा आणि त्याचे प्रश्न सोडवा, कारण जर आपण हा विभाग त्वरीत पूर्ण केला तर उर्वरित विभागात आपण पुरेसा वेळ देऊ शकता.
 • ३) प्रत्येक विभागाला वेळ द्या, वेळेचे व्यवस्थापन करा: प्रत्येक विभागासाठी वेळ वाटून घ्या. असे केल्याने तुम्ही प्रत्येक विभागाला पुरेसा वेळ देऊ शकाल. आपण कोणत्याही विभागासाठी जास्त वेळ घालवत नाही आहोत, याची खात्री करा. रसायनशास्त्राला ४० मिनिटे, गणिताला ६० मिनिटे आणि भौतिकशास्त्रावर ८० मिनिटे देण्याचा सल्ला दिला जातो.
 • ३) प्रत्येक प्रश्नासाठी लागणारा वेळः एका प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका. जर कोणताही प्रश्न आला तर ताबडतोब करा, परंतु कोणत्याही प्रश्नावर तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवू नका.
 • ५) सर्व प्रश्न वाचा: प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचणे महत्वाचे आहे. प्रत्येक प्रश्न समजून घ्या. जर उमेदवारांनी प्रश्न चांगले वाचले तर उमेदवार चुका करणे टाळू शकतात.
 • ६) पर्याय काळजीपूर्वक वाचा: सर्व चार पर्याय काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. वाचताना घाई करू नका.
 • ७) परीक्षेच्या वेळी शांत राहा: आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी शांत राहणे महत्वाचे आहे. म्हणूनच परीक्षेच्या वेळीही शांत राहण्यावर भर द्या.
  परीक्षेच्या वेळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एक- दोन वेळा दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा, कारण यामुळे मेंदूला आराम मिळतो.
 • ८) स्वत:वर विश्वास ठेवा: जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही काहीही मिळवू शकता. प्रेरणा ही त्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी महत्त्वाचा घटक असतो. या किंवा इतर कोणत्याही परीक्षेसाठी स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.
 • ९) त्वरित नवीन प्रश्न सोडवायला घेऊ नका: शेवटी नवीन असलेल्या संकल्पना टाळा. आधी आपल्याला जे येते ते आधी सोडवावे.
 • १०) अंदाज लावू नका, खात्री कराः अंदाजानुसार उत्तरे निवडणे योग्य नाही. उमेदवारांनी ज्या प्रश्नांची त्यांना खात्री नाही अशा प्रश्नांची उत्तरे सोडावीत. ज्यांबाबत खात्री आहे, अशीच उत्तरं द्यावीत.

सोर्स : म. टा.


JEE Main Exam : JEE Main 2021 Admit Card Update: इंजिनीअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अर्थात जेईई मेन (JEE Main) परीक्षा २०२१ चे अॅडमिट कार्ड या आठवड्यात जारी होण्याची शक्यता आले. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जेईई मेनचे अॅडमि ट कार्ड उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली होती.

यावर्षी जेईई मेन परीक्षा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात चार टप्प्यांत होणार आहेत. गेल्या वर्षी करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एनटीएने सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म विद्यार्थ्यांकडून भरून घेतला होता. हा फॉर्म यंदाही भरून घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांना हा अर्ज संकेतस्थळावरून डाऊनलोड करावा लागेल आणि परीक्षा केंद्रात सोबत आणावा लागेल.

अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना jeemain.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला रजिस्टर क्रमांक, अन्य माहितीच्या आधारे लॉगइन करावे लागेल. सेल्फ डिक्लेरेशन फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्य%Eसंबंधीची अद्ययावत माहिती विचारण्यात येईल.

जेईई मेन २०२१ अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी –

 1. – नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जावे.
 2. – होमपेजवरील अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याच्या लिंकवर क्लिक करावे.
 3. – विचारलेली माहिती भरावी.
 4. – सबमिट करावे.
 5. – आता अॅडमिट कार्ड तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
 6. – अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे, प्रिंटआऊट घ्यावे आणि त्यावरील संपूर्ण माहिती, सूचना नीट वाचाव्या.

अॅडमिट कार्डमध्ये काही चूक आढळली तर तत्काळ नॅशनल टेस्टिंग एजन्सीशी संपर्स साधावा. परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांना जेईई मेनचा ड्रेस कोड फॉलो करावा लागेल. यासंबंधीची माहिती अॅडमिट कार्डवर असेल. जेईई मेन अॅडमिट कार्डाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना एक वैध ओळखपत्रदेखील परीक्षेला येताना सोबत बाळगावे लागेल.

विद्यार्थ्यांना त्यांचे वैयक्तिक हँड सॅनिटायझर, पारदर्शक पाण्याची बाटली सोबत बाळगण्यास परवानगी आहे. मधुमेह असणारे विद्यार्थी सोबत खाणंही आणू शकतात, मात्र त्यासाठी परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागेल.


JEE Main Exam: JEE Main 2021 Update: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ने जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (JEE Main) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी विंडो २७ जानेवारीपासून खुली केली आहे. उमेदवारांना काही दुरुस्ती असल्यास ते त्यांचे लॉगइन वापरून त्यांच्या अर्जात दुरुस्ती करु शकतात. यासाठी जेईईचे अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in येथे जाऊन ऑनलाइन दुरुस्ती करण्याची संधी एनटीएने दिली आहे. दुरुस्ती करण्यासाठी ३० जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना अर्जातील माहिती बदलता येणार नाही. काही माहिती जसे विद्यार्थ्याचे नाव, संपर्क क्रमांक किंवा पत्ता, प्रवर्ग, शैक्षणिक माहिती, जन्मतारीख, परीक्षा केंद्रांचे शहर आदी माहितीत बदल करता येईल. दिलेल्या मुदतीनंतर कोणत्याही प्रकारची दुरुस्तीबाबतची विनंती स्वीकारण्यात येणार नसल्याचं एनटीएने परिपत्रकात म्हटलं आहे.

जेईई मेन २०२१ परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत २३ जानेवारी रोजी संपली आहे. ही परीक्षा २३ ते २६ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत घेतली जाणार आहे. अॅडमिट कार्ड फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जारी केले जाणार आहेत. यंदा ही परीक्षा चार वेळा घेतली जाणार आहे. विद्यार्थी चार पैकी कोणतीही एक किंवा सर्व चार परीक्षांना बसू शकतात. त्यांचे सर्वोत्तम गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

यंदा जेईई मेन परीक्षेच्या पॅटर्नमध्येही बदल करण्यात आला आहे. १५ बहुपर्यायी प्रश्नांना नकारात्मक मूल्यांकन नसेल. प्रश्नपत्रिकेत ९० प्रश्न विचारले जातील, यापैकी ७५ प्रश्नच सोडवायचे आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स अशा प्रत्येक विभागात २५ प्रश्न विचारले जातील.

सोर्स : म. टा.


JEE Main Exam : JEE Main 2021 परीक्षेसाठी अर्ज करण्याचा शनिवार २३ जानेवारी हा अखेरचा दिवस आहे. परीक्षेचे आयोजन करणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी शनिवारी अॅप्लिकेशन विंडो बंद करणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप जेईई मेन २०२१ परीक्षेसाठी अर्ज केलेला नाही ते अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

फेब्रुवारी महिन्यातील २३, २४, २५ आणि २६ या तारखांना जेईई मेन २०२१ चा पहिला टप्पा पार पडणार आहे. देशातील आयआयटी, एनआयटी आणि अन्य सीएफटीआय संस्थांमधील अभियांत्रिकीच्या यूजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा घेतली जाते.

यंदा तब्बल चार वेळा ही परीक्षा होणार आहे. फेब्रुवारीव्यतिरिक्त मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात या परीक्षेचे अन्य तीन टप्पे पार पडणार आहे.

विद्यार्थ्यांनी https://jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचे आहेत. विद्यार्थी एका किंवा एकापेक्षा अधिक टप्प्यातील परीक्षा देऊ शकतात. त्यांचे सर्वोतम गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

दरम्यान, JEE Main 2021 साठी अर्जात दुरुस्ती असल्यास ती करण्यासाठी २७ जानेवारी २०२१ रोजी पुन्हा विंडो ओपन होणार आहे. दुरुस्तीसाठी अखेरची मुदत ३० जानेवारी २०२१ आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे.

पॅटर्नमध्ये बदल

विविध राज्यांनी बारावी बोर्ड परीक्षांच्या अभ्यासक्रम कपातीबाबत वेगवेगळे निर्णय घेतले होते. त्यामुळे या सामायिक परीक्षेत नेमके कोणत्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता होती. तीही दूर करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेत एकूण ९० प्रश्न विचारले जातील, त्यापैकी ७५ प्रश्नांचीच उत्तरे विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. त्यामुळे या ९० प्रश्नांमध्ये सर्व प्रकारचा अभ्यासक्रम कव्हर केला जाणार आहे. शिवाय १५ वैकल्पिक प्रश्नांमध्ये नकारात्मक गुणही नसणार आहेत.

१३ भाषांमध्ये होणार परीक्षा

देशात पहिल्यांदाच जेईई मेन परीक्षा १३ भाषांमध्ये आयोजित केली जाणार आहे. इंग्रजीसह हिंदी, मराठी, बंगाली, आसामी, मल्याळम, गुजराती, कन्नड, उडिया, पंजाबी, तमीळ, तेलगु, उर्दू या भाषांचा समावेश करण्यात आला आहे.


JEE Main च्या ‘या’ बोगस वेबसाइटवरून भरू नका अर्ज; NTA ने केले सावध 

JEE Main Exam : JEE Main Update: JEE Main 2021 aware of fake website of jee main, nta issue notice –  इंजिनीअरिंग यूजी प्रवेश परीक्षा जेईई मेन २०२१ च्या नावे एक बनावट वेबसाइट सुरू आहे. या वेबसाइट वर जेईई मेन २०२१ साठी ऑनलाइन अर्ज भरले जात आहेत आणि शुल्कही भरले जात आहे. या सर्व प्रकाराबद्दल माहिती देत नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.

एनटीएने जेईई मेनच्या या बनावट वेबसाइटबद्दल लोकांना सावध करण्यासाठी एक परिपत्रक जारी केलं आहे. यात असं म्हटलंय की एनटीएकडे जेईई मेनच्या अन्य एक वेबसाइटबद्दल खूप तक्रारी आल्या. यानंतर चौकशी केली गेली. ही वेबसाइट बनावट असून jee guide नावाने सुरु आहे.

चौकशीत एनटीएला असं कळलं की या वेबसाइट द्वारे जेईई मेन २०२१ परीक्षेसाठी अर्ज आणि शुल्क भरून घेतले जात आहे. शिवाय हा गैरप्रकार करणाऱ्यांनी एक ई-मेल आयडी आणि हेल्पडेस्क नंबरही जारी केला आहे. एनटीएने या वेबसाइटचे डिटेल्स जारी केले आहेत. येथे यासंबंधीची माहिती दिली जात आहे –

 • या बोगस वेबसाइटचा अॅड्रेस आहे – jeeguide.co.in
 • ईमेल आयडी आहे – [email protected]
 • मोबाइल क्रमांक आहे – ९३११२४५३०७

विद्यार्थ्यांनी, चुकूनही या वेबसाइटवर विश्वास ठेवू नये. या साईटच्या बनावट मेल आयटी किंवा मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न करू नये. जेईई मेनची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in आहे. परीक्षेसंबंधीची कोणतीही माहिती किंवा अर्जासंबंधीची कोणतीही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जेईई मेनच्या अधिकृत संकेतस्थळालाच भेट द्या.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Suraj taktode says

  CET exam date 2020

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड