इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘जेईई’ मुख्य परीक्षा जानेवारीत !! विद्यार्थ्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार | JEE Main 2024

JEE Main 2024

JEE Main 2024 : भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) आणि देशातील नामांकित संस्थांमध्ये इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाची जेईई मुख्य परीक्षा २२ ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) जेईई मुख्य परीक्षा घेतली जाते. या परीक्षेतील गुणांच्या आधारावर आयआयटी, एनआयटी आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये बी.ई, बी.टेक, बी.आर्क, बी. प्लॅनिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. एकूण १३ भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. त्यानुसार २२ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

‘एनटीए’कडून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षेसाठी केंद्र जाहीर केली जातील. तर परीक्षेच्या तीन दिवस आधी प्रवेश पत्र विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर उपलब्ध होईल. या परीक्षेचा निकाल १२ फेब्रुवारीला जाहीर केला जाणार आहे


JEE Mains 2023 Syllabus

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

JEE Main 2023: The National Testing Agency (NTA) has released the JEE Main 2024 Syllabus for candidates who are going to appear in the examination. This year, the concerned officials have reduced and revised the JEE Main 2024 Syllabus with an aim to match it with the syllabus of NCERT 10th and 12th students, and focus on the core concepts. Some chapters and sub-topics have been completely removed from subjects like Chemistry, Physics, and Mathematics. Majority of chapters have been erased from Chemistry.

The syllabus of the Joint Entrance Examination (JEE) main exam conducted for admission to IITs and other national institutes has been reduced. Subjects which have been omitted from the Central Board of Secondary Education (CBSE) syllabus have also been omitted from the JEE examination. Application forms for this exam are available from Thursday.

आयआयटी आणि इतर राष्ट्रीय संस्थांतील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परिक्षांतील (जेईई) मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले पाठ जेईई परीक्षेतूनही वगळण्यात आले आहेत. या परीक्षेचे अर्ज गुरुवारपासून उपलब्ध झाले आहेत.

‘सीबीएसई’ने अकरावी, बारावीच्या अभ्यासक्रमातील अनेक घटक वगळले. ‘सीबीएसई’च्या अभ्यासक्रमावरच जेईई घेण्यात येते. त्यामुळे ‘सीबीएसई’च्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेल्या घटकांवर जेईई मुख्य परीक्षेतही प्रश्न विचारण्यात येणार नसल्याचे राष्ट्रीय चाचणी कक्षाने स्पष्ट केले. या परीक्षेचे अर्ज कक्षाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत. अर्ज भरण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. तसेच या परीक्षेचा निकाल १२ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येईल, असेही कक्षाने स्पष्ट केले आहे.

दोन सत्रांत परीक्षा

दोन सत्रांत परीक्षा होणार असून कोणत्याही एक किंवा दोन्ही सत्रांना विद्यार्थी बसू शकतात. पहिल्या सत्राची परीक्षा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.

Steps to Apply Online For JEE Mains Exam 2024

Step 1:- Apply for Online Registration.
Step 2:- Fill Online Application Form.
Step 3:- Submit Documents.

JEE Mains Notification 2024

https://jeemain.ntaonline.in/


JEE Mains 75 Percentile

JEE Main 2023 : The Bombay High Court today refused to order relaxation of minimum 75 percent 12th standard board score eligibility criterion for admission to IITs, NITs, IIITs, and CFTIs/GFTIs through JEE Main and JEE Advance examinations. Know Latest Update on JEE Mains Eligibility Criteria at below :

नीट, आयआयटी, सीएफटीआय/जीएफटीआय या अभ्यासक्रमांसाठी असलेल्या (JEE Mains) जेईई-मेन या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेला बसण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना इयत्ता 12वीमध्ये किमान 75 टक्के किंवा संबंधित शिक्षण मंडळांचे टॉप-20 पर्संटाईल गुण असण्याच्या अटीबाबत कोणतीही सूट देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

याप्रश्नी अनुभा सहाय यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी सुनावणी पूर्ण केल्यानंतर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने बुधवारी निर्णय दिला. त्यांनी म्हटले की, (JEE Mains) न्यायालय सध्याच्या स्थितीत परीक्षेसंदर्भातील कोणत्याही मुद्यावर निर्णय देऊ शकत नाही. याचा निर्णय सरकार घेऊ शकेल. परीक्षा ठरविण्याची, पार पाडण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेकडे असते. यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही.

न्यायालय या निर्णयाची प्रत ताबडतोब उपलब्ध करून देऊ शकेल, जेणेकरून संबंधितांना पुढील पावले उचलता येतील. ही (JEE Mains) पात्रता परीक्षा घेणार्‍या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) नियमांत अचानक नवे बदल करून बारावीत 75 टक्के किंवा टॉप-20 पर्सेंटाईल गुण असण्याची अट आणली. ही अट विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे, असा दावा सहाय यांनी याचिकेत केला. मात्र, या अटींचा निर्णय हा धोरणात्मक आहे. शिवाय तो नव्याने घेतलेला नसून, पूर्वीचाच आहे, असे एनटीएने प्रतिज्ञापत्रावर सांगून आपल्या निर्णयाचे समर्थन केले.


JEE Main 2023

JEE Main 2023 – There is a major update regarding JEE Mains, the entrance exam for admission to IITs, NITs and other engineering colleges. The National Testing Agency has made a major change in the schedule just four days before the start of the JEE Mains exam. JEE Mains 2023 exam date has been changed. NTA has also issued an official notification in this regard. Check JEE Mains Exam Date Schedule 2023 :

आयआयटी, एनआयटीसह अन्य इंजिनीअरिंग महाविद्यालयात प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जेईई मेनच्या (मुख्य परीक्षा) वेळापत्रकात ‘एनटीए’ने बदल केला आहे. ‘एनटीए’ने २७ जानेवारीची परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आता २८ जानेवारीला घेण्यात येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नवीन वेळापत्रक – JEE Mains Exam New Date

एनटीए’च्या मूळ नियोजनानुसार जेईई मुख्य परीक्षा २४, २५, २७, २८, २९, ३० आणि ३१ जानेवारीला घेतली जाणार होती. नवीन वेळापत्रकानुसार ही परीक्षा आता २४, २५, २८, २९, ३०, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला होणार आहे. एनटीएकडून २७ जानेवारीला घेण्यात येणारी परीक्षा आता २८ जानेवारीला होणार आहे.

यातील बीई आणि बीटेक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई मुख्य पेपर १ ही परीक्षा दोन सत्रांत घेतली जाईल. बी आर्क आणि बी प्लॅनिंग अभ्यासक्रमासाठीचा जेईई मुख्य पेपर २ ही परीक्षा २८ जानेवारीला दुसऱ्या सत्रात घेतला जाणार आहे, असे ‘एनटीए’ने जाहीर केले आहे. या परीक्षा देशातील २९० केंद्रांवर आणि परदेशातील २५ शहरांत घेतल्या जाणार आहेत.

आयआयटी जेईई-मेन्सची परीक्षा ही देशभरात होते आणि देशातील लाखो लोक या परीक्षेची तयारी करीत असतील. ती परीक्षा पुढे ढकलणे आवश्यक असल्याची कोणतीही अनन्यसाधारण परिस्थिती दिसत नाही. जनहित याचिकाकर्त्याच्या विनंतीवरून ती पुढे ढकलण्याचा आदेश दिल्यास त्याचा भविष्यातील परीक्षांवरही परिणाम होईल,’ असे निरीक्षण नोंदवून तसा आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता.

एनटीए’ने ही प्रवेश परीक्षा अत्यंत उशिरा जाहीर करून विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा अवधीच दिलेला नाही. दर वर्षी ‘एनटीए’कडून चार महिने आधी प्रवेशपरीक्षेच्या तारखा घोषित होतात. या वेळी ‘एनटीए’ने खूप विलंब केला आहे. त्याचबरोबर सीबीएसई व अन्य परीक्षा मंडळांच्या इयत्ता बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना; तसेच विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, तोंडी होणार असताना ही प्रवेश परीक्षा नियोजित आहे. या साऱ्यामुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण येणार असल्याने प्रवेश परीक्षा एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा आदेश द्यावा,’ अशी विनंती बालहक्क कार्यकर्त्या अनुभा सहाय यांनी जनहित याचिकेद्वारे केली होती. याविषयी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती


JEE Mains Exam Details 2023

JEE Main 2023: National Testing Agency (NTA) has declared the JEE Mains Timetable 2023. For engineering admission, students will be able to take JEE Main twice instead of four in 2023. Further details are as follows:-

अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जेईई मेन २०२३ मध्ये चार नव्हे तर दोन वेळा देता येणार आहे. एनटीएने जेईई मेनचे वेळापत्रक जारी केले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जानेवारीत होणारी संगणक आधारित प्रवेश परीक्षा सत्र एक व एप्रिलमध्ये होणारी परीक्षा सत्र दोन म्हणून ओळखली जाईल. जानेवारीतील परीक्षा २४, २५, २७, २८, २९, ३० व ३१ जानेवारी रोजी सकाळी व दुपारी हिंदी, इंग्रजीसह १३ भारतीय भाषांत होणार आहे. जानेवारीच्या सत्राच्या परीक्षेत सहभाग घेण्यासाठी एनटीएच्या वेबसाइटवर ऑनलाइन विंडो ओपन झाली आहे. इच्छुक विद्यार्थी १२ जानेवारीच्या रात्री ९ पर्यंत अर्ज व रात्री ११.५० पर्यंत ऑनलाइन शुल्क जमा करू शकतात. एनटीएच्या वरिष्ठ संचालक डॉ. साधना पराशर यांनी वेळापत्रक जारी केले.

जेईई मेनच्या पेपर एकच्या मेरिटमधून आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी, केंद्रीय अनुदानित तांत्रिक संस्थांसह राज्य सरकारांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांतील बीई व बीटेकसाठी जागा मिळतील. दुसऱ्या पेपरमधून बॅचलर ऑफ आर्किटेक्चर व बॅचलर ऑफ प्लानिंग प्रवेश मिळेल.

JEE Main 2023


JEE Mains Update 

JEE Main 2022: जेईई मेन्सच्या परीक्षेत गणित, फिजिक्स, केमिस्ट्री असे तीन विषयांचे पेपर्स द्यावे लागतील. याशिवाय, इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर आणि प्लानिंग अशा तीन शाखांच्या पदवी प्रवेशासाठी ही प्रवेशपरीक्षा द्यावी लागते. यावर्षी जून आणि जुलै महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटी, एनआयटी, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी तसेच ट्रिपल आयटीमध्ये प्रवेश घेता येतो.

  • देशभरातील इंजिनीअरिंग प्रवेशांसाठी घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्सच्या नोंदणीला या आठवड्यात प्रारंभ होण्याची अपेक्षा आहे.
  • २०२३मध्ये होणाऱ्या या परीक्षेच्या तारखांकडेही पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
  • प्रतिष्ठित इंजिनीअरिंग कॉलेजमधील प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांना जेईई द्यावी लागते. जेईई मेन्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स परीक्षा देता येते.
  • २०२३मध्ये होणाऱ्या जेईई मेन्स परीक्षेच्या तारखा डिसेंबर महिन्यात जाहीर होणार असल्याची अपेक्षा आहे.
  • जानेवारी आणि एप्रिल अशा दोन टप्प्यांमध्ये ही परीक्षा घेतली जाई‌ल, असा अंदाज आहे.
  • कम्प्युटर आधारित पद्धतीने सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ६ अशा दोन सत्रांत ही परीक्षा होणार आहे.

जेईई मेन्सच्या परीक्षेत गणित, फिजिक्स, केमिस्ट्री असे तीन विषयांचे पेपर्स द्यावे लागतील. याशिवाय, इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर आणि प्लानिंग अशा तीन शाखांच्या पदवी प्रवेशासाठी ही प्रवेशपरीक्षा द्यावी लागते.

यावर्षी जून आणि जुलै महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटी, एनआयटी, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी तसेच ट्रिपल आयटीमध्ये प्रवेश घेता येतो.


Previous Update –

NTA कडून महत्वाची घोषणा – JEE Main 2023 ‘या’ तारखेपासून करता येईल ऑनलाईन रजिस्ट्रेशन्स!! JEE Main 2023 Registration

JEE Main 2022: The National Testing Agency (NTA) may soon announce the date of Joint Entrance Examination Main 2023. Interested candidates have to complete the JEE Main Registration 2023 from the official website- jeemain.nta.nic.in 2023. Further details are as follows:-

अभियांत्रिकीची सर्वात प्रतिष्ठित परीक्षा असलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेच्या (जेईई) तारखेची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, JEE Mains 2023 या वर्षी दोनदा म्हणजे जानेवारी आणि एप्रिलमध्ये होणार आहे. जानेवारीला फक्त काही दिवस शिल्लक असताना, असे म्हटले जात आहे की नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य 2023 ची तारीख जाहीर करू शकते. या महिन्यातच तारीख येऊ शकते. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य 2023 परीक्षेची तारीख ची तारीख जाहीर करू शकते.
  • JEE मेन 2023 परीक्षेची तारीख अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in 2023 वर जाहीर केली जाईल, येथून विद्यार्थ्यांना परीक्षेची तारीख तसेच इतर माहिती मिळू शकेल.
  • मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेईई मेन 2023 ची नोंदणी देखील लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.
  • इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइट- jeemain.nta.nic.in 2023 वरून JEE मुख्य नोंदणी 2023 पूर्ण करावी लागेल.
  • JEE मेन 2023 अर्ज भरताना, विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागेल, कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि JEE अर्ज शुल्क भरावे लागेल.

How to Register For JEE Main -jeemain.nta.nic.in 2023

  • JEE Main -jeemain.nta.nic.in 2023 च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • “JEE Main Registration 2023” या लिंकवर क्लिक करा.
  • नोंदणी पूर्ण करण्यासाठी फील्डमध्ये आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  • नोंदणी पूर्ण झाल्यावर, लॉगिन क्रेडेन्शियल्स नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरवर पाठवले जातील.
  • पुढे, क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा.
  • अर्ज भरण्यासाठी अर्ज क्रमांक आणि पासवर्ड एंटर करा.
  • आवश्यकतेनुसार वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील प्रविष्ट करा.
  • आता आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • ऑनलाइन मोडमध्ये JEE मेन 2023 अर्ज शुल्क भरा.
  • JEE Mains अर्ज फॉर्म 2023 तपासल्यानंतर, तो सबमिट करा. शेवटी सबमिट केलेल्या फॉर्मची प्रिंट काढा.

JEE Main Session 2 Registration Re-Opened

JEE Main 2022: Candidates register through the jeemain.nta.nic.in for JEE Main Examination. Applicants apply till the 9th of July 2022. JEE Meian 2022 July Session will be held between 21st to 30th of July 2022. Further details are as follows:-

जेईई मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन नोंदणी करता येईल. अर्जाची प्रक्रिया ९ जुलै रोजी रात्री ११ वाजेपर्यंत पूर्ण करता येईल. जेईई मुख्य २०२२ जुलै सत्रासाठी यापूर्वी अर्ज प्रक्रिया ३० जून रोजी बंद करण्यात आली होता. जेईई मुख्य सत्र २ हे २१ जुलै ते ३० जुलै दरम्यान आयोजित केले जाणार आहे.

  • जेईई मेन २०२२ सत्र २ परीक्षेसाठी नोंदणी विंडो पुन्हा एकदा उघडण्यात आली आहे.
  • जेईई मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन नोंदणी करता येईल.
  • अर्जाची प्रक्रिया ९ जुलै रोजी रात्री ११ वाजेपर्यंत पूर्ण करता येईल.
  • जेईई मुख्य २०२२ जुलै सत्रासाठी यापूर्वी अर्ज प्रक्रिया ३० जून रोजी बंद करण्यात आली होता.
  • जेईई मुख्य सत्र २ हे २१ जुलै ते ३० जुलै दरम्यान आयोजित केले जाणार आहे.
  • एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, ‘जेईई मेन २०२२ सत्र १ साठी परीक्षा शुल्क भरलेल्या आणि जेईई मेन २०२२ सत्र २ साठी उपस्थित राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांना मागील अर्ज क्रमांक आणि पासवर्डसह लॉग इन करावे लागेल.
  • सत्र २ साठी पेपर, परीक्षेचे माध्यम आणि शहर निवडू शकतात आणि परीक्षा शुल्क भरु शकतात.
  • इच्छुक विद्यार्थी पुढे दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करुन अर्ज करु शकतात.

How to Register – JEE Main 2022 Registration

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
  • वेबसाइटवर दिलेल्या नोंदणी लिंकवर क्लिक करा.
  • आता नाव, पालकांचे नाव, मोबाइल नंबर, ईमेल पत्ता आणि इतर तपशील सबमिट करून लॉगिन तयार करा.
  • आता पेजवर परत जाऊन लॉग इन करा.
  • लॉग इन केल्यानंतर, अर्ज भरा.
  • फोटो आणि सही अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा
  • सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.

अर्ज शुल्क – Application Fees

  • सर्वसाधारण उमेदवारांना ६०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
  • महिला उमेदवार, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि तृतीयपंथी उमेदवारांकडून ३२५ रुपये शुल्क आकारले जाईल.
  • परदेशी विद्यार्थ्यांना ३ हजार रुपये तर परदेशी महिला, थर्ड जेंडर, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १,५०० रुपये शुल्क घेतले जाईल.

अधिकृत वेबसाईट – jeemain.nta.nic.in


JEE Main 2022 July Session Application

JEE Main 2022: The application process starts for JEE Main July Session by NTA. National Testing Agency has announced The JEE Main 2022 second phase application resumption. For more details about JEE Main application visit jeemain.nta.nic.in. Further details are as follows:-

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून जेईई मुख्य जुलै सत्रासाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यावेळी दोन टप्प्यात जेईई मेन २०२२ च्या दुसऱ्या सत्रासाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. जेईईची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे. जेईई मेन २०२२ सत्र २ (जुलै) साठी अर्जांसाठी अर्ज प्रक्रिया प्रथम आयोजित केली जाणार आहे.

  • देशातील सर्वात मोठ्या इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षेच्या २०२२ आवृत्तीसाठी अर्ज नाकारण्यात आलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे.
  • परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA), ने यावेळी दोन टप्प्यात जेईई मेन २०२२ च्या दुसऱ्या सत्रासाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
  • जेईईची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे.
  • जेईई मेन २०२२ सत्र २ (जुलै) साठी अर्जांसाठी अर्ज प्रक्रिया प्रथम आयोजित केली जाणार आहे.
  • सत्र (जून) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू होईल.
  • जेईई मेन २०२२ जून सत्र २३ ते २९ जून या कालावधीत देशातील ५०१ शहरांमध्ये आणि परदेशातील २२ शहरांमध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आले होते.
  • त्यानंतर, निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, पहिली तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करून उपस्थित उमेदवारांकडून हरकती मागवण्यात येतील.
  • ज्याच्या पुनरावलोकनानंतर जेईई मुख्य २०२२ अंतिम उत्तरतालिका आणि निकाल जाहीर केला जाईल.

उमेदवारांकडून सातत्याने मागणी

एनटीएने जेईई मुख्य २०२२ च्या दुसऱ्या सत्रासाठी अर्ज करण्याची आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातून परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून यासंदर्भात सातत्याने मागणी करण्यात येत होती. जेईई मेन जुलै २०२२ सत्रासाठी अर्ज नाकारलेले उमेदवार एनटीएचे अधिकारी, केंद्रीय शिक्षण मंत्री, शिक्षण मंत्रालय इत्यादींना विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अर्ज करण्याची संधी देण्याची विनंती करत होते.

अर्ज दुरुस्ती विंडो पुन्हा उघडली

  • दुसरीकडे, NTA ने जेईई मेन २०२२ च्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अर्जातील त्रुटी सुधारण्यासाठी किंवा आवश्यक दुरुस्तीसाठी १ जुलैपासून अर्ज सुधारणा विंडो पुन्हा उघडली आहे.
  • ज्या उमेदवारांना जेईई मेन अर्ज २०२२ मधील त्रुटी दुरुस्त करायच्या आहेत ते परीक्षा पोर्टलवर लॉग इन करून दुरुस्त करू शकतात.
  • उमेदवारांना ३ जुलै २०२२ (रात्री ११.५० पर्यंत) अर्ज दुरुस्ती करता येणार आहे.

अधिकृत वेबसाईट – jeemain.nta.nic.in


JEE Main 2022 Admit Card

JEE Main 2022: JEE Main Exam city of candidates released admit card soon. JEE Main Exam dates changed. Further details are as follows:-

महत्त्वाचे – JEE Main परीक्षेच्या तारखांमध्ये बदल!!

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई मुख्य संयुक्त प्रवेश परीक्षेसंदर्भात महत्वाचे अपडेट आहे. या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आल्याची नोटीस जाहीर करण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या शहरासंदर्भात देखील माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर सविस्तर तपशील पाहता येणार आहे.

  • जेईई मुख्य २०२२ परीक्षेच्या जून सत्रासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे.
  • नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency,NTA) ने जेईई मुख्य २०२२ जून सत्रासाठी (Jee Main 2022 June Session) अर्ज केलेल्या उमेदवारांना वाटप केलेल्या परीक्षा केंद्राचे शहर जाहीर केले आहे.
  • एजन्सीने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, उमेदवार जेईई मेन परीक्षा पोर्टल jeemain.nta.nic.in किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून त्यांचे परीक्षा शहर तपासू शकतात.
  • एनटीएने उमेदवारांसाठी परीक्षेच्या शहराची माहिती जाहीर केली त्यानुसार उमेदवारांना ट्रॅव्हल प्लान करता येणार आहे.

परीक्षेच्या तारखा बदलल्या 

  • एनटीएने जेईई मेन २०२२ च्या जून सत्रासाठी नवीन तारखा जाहीर केल्या आहेत.
  • त्यानुसार परीक्षा २३ जून ते २९ जून २०२२ या कालावधीत घेतली जाईल.
  • देशभरातील ५०१ शहरे आणि भारताबाहेरील २२ शहरांमध्ये होणार आहेत.
  • यापूर्वी, एनटीएने २० ते २९ जून या कालावधीत परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या होत्या.
  • अधिक तपशीलांसाठी या लिंकवरून एनटीएने जाहीर केलेली नोटीस पाहता येणार आहे.

How to Download JEE Main Admit Card 

  • JEE Mains प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या.
  • ‘जून आणि जुलै सत्रासाठी प्रवेशपत्र डाऊनलोड करा’ असे लिहिलेल्या टॅबवर क्लिक करा.
  • एकदा लिंक सक्रिय झाल्यावर तुमचे लॉगिन तपशील नोंदवा.
  • आता तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. सर्व माहिती तपासून पाहा.
  • त्यानंतर ते डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा.

जेईई मुख्य परीक्षा प्रवेशपत्र कधी? 

तथापि, उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की एनटीएने अद्याप JEE मेन जून २०२२ परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केलेले नाही. एजन्सीने, १४ जून २०२२ रोजी जाहीर केलेल्या नोटिसमध्ये, जेईई मेन २०२२ च्या जून सत्रासाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे नंतर जाहीर केली जातील, असे जाहीर केले आहे. उमेदवारांना त्यांचे जेईई मेन २०२२ प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची लिंक परीक्षा पोर्टलवरच सक्रिय केली जाईल. ज्याद्वारे ते त्यांचा अर्ज क्रमांक आणि इतर तपशील सबमिट करून डाउनलोड करू शकतील.

  • तसेच उमेदवारांना परीक्षेचे शहर किंवा प्रवेशपत्र डाउनलोड करताना कोणतीही समस्या किंवा त्रुटी आल्यास, ते एजन्सीच्या हेल्पलाइन क्रमांक ०११-४०७५९००० किंवा ईमेल आयडी [email protected] वर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

JEE Main Exam 2022

JEE Main 2022: The JEE Main Exam 2022 will be held on the 20th of June 2022. JEE Main 2022 One More Form Will Have To Be Filled For Jee Exam This Information Is Being Sought. For more details visit jeemain.nta.nic.in. Further details are as follows:-

महत्त्वाचे – JEE परीक्षेसाठी आणखी एक फॉर्म भरावा लागणार!!

जेईई मुख्य परीक्षा २०२२ २० जून रोजी सुरु होणार आहे. यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून लवकरच प्रवेशपत्र जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर जॉइंट इंजिनीअरिंग एन्ट्रन्स टेस्ट देणाऱ्या उमेदवारांना जेईई मेनची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन प्रवेशपत्र पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे.

  • भारतातील नामांकित इंजिनीअरिंग संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई परीक्षेतील (JEE Main 2022) गुण अनिवार्य आहेत. यामध्ये मिळालेल्या रँकच्या आधारे विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेजचे वाटप केले जाते.
  • यावर्षी जेईई मेन २०२२ च्या पहिल्या टप्प्यातील परीक्षा २० ते २९ जून रोजी होणार आहे.
  • जेईई परीक्षेचा दुसरा टप्पा जुलै २०२२ मध्ये होणार आहे.
  • दरवर्षी लाखो विद्यार्थी जेईई मेन परीक्षेसाठी अर्ज करतात.
  • या परीक्षेत बसण्यासाठी बारावी उत्तीर्ण होणे किंवा बसणे अनिवार्य आहे.
  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (National Testing Agency) जेईई मेन २०२२ परीक्षेच्या पहिल्या टप्प्याचे प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
  • यासोबतच विद्यार्थ्यांना एक फॉर्मही भरावा लागणार आहे.

जेईई मुख्य प्रवेशपत्रामध्ये हे तपशीला पाहा 

  • जेईई मेन २०२२ परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर केल्यानंतर, उमेदवारांना त्यात काही महत्त्वाचे तपशील तपासण्याचा सल्ला दिला जातो.
  • जेईई प्रवेशपत्रामध्ये तुमचे नाव, परीक्षेची तारीख आणि परीक्षा केंद्र यासारखे महत्त्वाचे तपशील तपासण्यास विसरू नका.
  • काही चूक आढळल्यास एनटीएला कळवा.
  • परीक्षेला जाताना प्रवेशपत्राची हार्ड कॉपी सोबत ठेवा.

आरोग्याचा तपशील भरावा लागणार

  • जेईई मेन २०२२ च्या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्रासह स्व-घोषणापत्र (self declaration) देखील जारी केले जाईल.
  • यामध्ये त्यांना मेडिकल फिटनेस आणि अलीकडच्या प्रवासाची माहिती द्यावी लागेल.
  • प्रवेशपत्र आणि स्वघोषणापत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
  • करोना कालावधी लक्षात घेऊन ही कार्यवाही केली जात आहे.
  • परीक्षा केंद्रावर पोहोचण्यापूर्वी उमेदवारांना जेईई मेन २०२२ सेल्फ डिक्लरेशन फॉर्म पूर्व-भरावा लागेल.
  • जून सत्रासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे JEE मुख्य प्रवेशपत्र २०२२ हे अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर पाहता येणार आहे.
  • येथे सक्रिय करण्यात येणाऱ्या लिंकद्वारे उमेदवार प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील.

How to Download JEE Main Admit Card

  • To download JEE Mains Admission, first visit the official website jeemain.nta.nic.in.
  • Click on the tab labeled ‘Download Admission for June and July Session’.
  • Enter your login details once the link is activated.
  • Your ticket will now appear on the screen. Check all the information.
  • Then download it and print it for future reference.

अधिकृत वेबसाईट – jeemain.nta.nic.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड