महत्त्वाचे – JEE Main परीक्षेच्या तारखांमध्ये बदल!!

JEE Main 2022

JEE Main 2022 Admit Card

JEE Main 2022: JEE Main Exam city of candidates released admit card soon. JEE Main Exam dates changed. Further details are as follows:-

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई मुख्य संयुक्त प्रवेश परीक्षेसंदर्भात महत्वाचे अपडेट आहे. या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आल्याची नोटीस जाहीर करण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या शहरासंदर्भात देखील माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर सविस्तर तपशील पाहता येणार आहे.

 • जेईई मुख्य २०२२ परीक्षेच्या जून सत्रासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे.
 • नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency,NTA) ने जेईई मुख्य २०२२ जून सत्रासाठी (Jee Main 2022 June Session) अर्ज केलेल्या उमेदवारांना वाटप केलेल्या परीक्षा केंद्राचे शहर जाहीर केले आहे.
 • एजन्सीने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, उमेदवार जेईई मेन परीक्षा पोर्टल jeemain.nta.nic.in किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून त्यांचे परीक्षा शहर तपासू शकतात.
 • एनटीएने उमेदवारांसाठी परीक्षेच्या शहराची माहिती जाहीर केली त्यानुसार उमेदवारांना ट्रॅव्हल प्लान करता येणार आहे.

परीक्षेच्या तारखा बदलल्या 

 • एनटीएने जेईई मेन २०२२ च्या जून सत्रासाठी नवीन तारखा जाहीर केल्या आहेत.
 • त्यानुसार परीक्षा २३ जून ते २९ जून २०२२ या कालावधीत घेतली जाईल.
 • देशभरातील ५०१ शहरे आणि भारताबाहेरील २२ शहरांमध्ये होणार आहेत.
 • यापूर्वी, एनटीएने २० ते २९ जून या कालावधीत परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या होत्या.
 • अधिक तपशीलांसाठी या लिंकवरून एनटीएने जाहीर केलेली नोटीस पाहता येणार आहे.

How to Download JEE Main Admit Card 

 • JEE Mains प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या.
 • ‘जून आणि जुलै सत्रासाठी प्रवेशपत्र डाऊनलोड करा’ असे लिहिलेल्या टॅबवर क्लिक करा.
 • एकदा लिंक सक्रिय झाल्यावर तुमचे लॉगिन तपशील नोंदवा.
 • आता तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. सर्व माहिती तपासून पाहा.
 • त्यानंतर ते डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा.

जेईई मुख्य परीक्षा प्रवेशपत्र कधी? 

तथापि, उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की एनटीएने अद्याप JEE मेन जून २०२२ परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केलेले नाही. एजन्सीने, १४ जून २०२२ रोजी जाहीर केलेल्या नोटिसमध्ये, जेईई मेन २०२२ च्या जून सत्रासाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे नंतर जाहीर केली जातील, असे जाहीर केले आहे. उमेदवारांना त्यांचे जेईई मेन २०२२ प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची लिंक परीक्षा पोर्टलवरच सक्रिय केली जाईल. ज्याद्वारे ते त्यांचा अर्ज क्रमांक आणि इतर तपशील सबमिट करून डाउनलोड करू शकतील.

 • तसेच उमेदवारांना परीक्षेचे शहर किंवा प्रवेशपत्र डाउनलोड करताना कोणतीही समस्या किंवा त्रुटी आल्यास, ते एजन्सीच्या हेल्पलाइन क्रमांक ०११-४०७५९००० किंवा ईमेल आयडी [email protected] वर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

JEE Main Exam 2022

JEE Main 2022: The JEE Main Exam 2022 will be held on the 20th of June 2022. JEE Main 2022 One More Form Will Have To Be Filled For Jee Exam This Information Is Being Sought. For more details visit jeemain.nta.nic.in. Further details are as follows:-

महत्त्वाचे – JEE परीक्षेसाठी आणखी एक फॉर्म भरावा लागणार!!

जेईई मुख्य परीक्षा २०२२ २० जून रोजी सुरु होणार आहे. यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून लवकरच प्रवेशपत्र जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर जॉइंट इंजिनीअरिंग एन्ट्रन्स टेस्ट देणाऱ्या उमेदवारांना जेईई मेनची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन प्रवेशपत्र पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे.

 • भारतातील नामांकित इंजिनीअरिंग संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई परीक्षेतील (JEE Main 2022) गुण अनिवार्य आहेत. यामध्ये मिळालेल्या रँकच्या आधारे विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेजचे वाटप केले जाते.
 • यावर्षी जेईई मेन २०२२ च्या पहिल्या टप्प्यातील परीक्षा २० ते २९ जून रोजी होणार आहे.
 • जेईई परीक्षेचा दुसरा टप्पा जुलै २०२२ मध्ये होणार आहे.
 • दरवर्षी लाखो विद्यार्थी जेईई मेन परीक्षेसाठी अर्ज करतात.
 • या परीक्षेत बसण्यासाठी बारावी उत्तीर्ण होणे किंवा बसणे अनिवार्य आहे.
 • नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (National Testing Agency) जेईई मेन २०२२ परीक्षेच्या पहिल्या टप्प्याचे प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
 • यासोबतच विद्यार्थ्यांना एक फॉर्मही भरावा लागणार आहे.

जेईई मुख्य प्रवेशपत्रामध्ये हे तपशीला पाहा 

 • जेईई मेन २०२२ परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर केल्यानंतर, उमेदवारांना त्यात काही महत्त्वाचे तपशील तपासण्याचा सल्ला दिला जातो.
 • जेईई प्रवेशपत्रामध्ये तुमचे नाव, परीक्षेची तारीख आणि परीक्षा केंद्र यासारखे महत्त्वाचे तपशील तपासण्यास विसरू नका.
 • काही चूक आढळल्यास एनटीएला कळवा.
 • परीक्षेला जाताना प्रवेशपत्राची हार्ड कॉपी सोबत ठेवा.

आरोग्याचा तपशील भरावा लागणार

 • जेईई मेन २०२२ च्या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्रासह स्व-घोषणापत्र (self declaration) देखील जारी केले जाईल.
 • यामध्ये त्यांना मेडिकल फिटनेस आणि अलीकडच्या प्रवासाची माहिती द्यावी लागेल.
 • प्रवेशपत्र आणि स्वघोषणापत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
 • करोना कालावधी लक्षात घेऊन ही कार्यवाही केली जात आहे.
 • परीक्षा केंद्रावर पोहोचण्यापूर्वी उमेदवारांना जेईई मेन २०२२ सेल्फ डिक्लरेशन फॉर्म पूर्व-भरावा लागेल.
 • जून सत्रासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे JEE मुख्य प्रवेशपत्र २०२२ हे अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर पाहता येणार आहे.
 • येथे सक्रिय करण्यात येणाऱ्या लिंकद्वारे उमेदवार प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील.

How to Download JEE Main Admit Card

 • To download JEE Mains Admission, first visit the official website jeemain.nta.nic.in.
 • Click on the tab labeled ‘Download Admission for June and July Session’.
 • Enter your login details once the link is activated.
 • Your ticket will now appear on the screen. Check all the information.
 • Then download it and print it for future reference.

अधिकृत वेबसाईट – jeemain.nta.nic.in


JEE Main 2022 Session II Timetable

JEE Main 2022 : The timetable for JEE Main Exam Session II has been announced. The exam is between 21st to 30th of July 2022. The National Testing Agency (NTA), which conducts the test, made the announcement on its official website. Candidates application can be filled through the //jeemain.nta.nic.in/ for this exam. The last date of applications is the 30th of June 2022. Further details are as follows:-

JEE Main चे वेळापत्रक जाहीर!!

देशभरातील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्यासह नामांकित केंद्रीय संस्थांमध्ये अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या ‘जेईई मेन’ परीक्षेच्या दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक गुरुवारी (ता. २) जाहीर झाले. २१ ते ३० जुलै दरम्यान ही परीक्षा पार पडणार आहे.

परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) अधिकृत संकेतस्थळावरून याबाबत घोषणा केली. या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना //jeemain.nta.nic.in/ संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. ३० जून रोजी रात्री ९ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या सत्रातील परीक्षा दिली होती, त्यांनी त्याच सत्राच्या अर्ज क्रमांक आणि पासवर्डने दुसऱ्या सत्राचे अर्ज भरावेत. तर, पहिल्यांदाच परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज करावेत, अशी सूचना एनटीएने केली आहे.

How to Apply 

दुसऱ्या सत्रासाठी असा करा अर्ज  

 • सर्वप्रथम https://jeemain.nta.nic.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
 • तेथील जेईई मेन २०२२ च्या नोंदणी लिंकवर क्लिक करा.
 • पहिल्या सत्रातील परीक्षेसाठी नोंदणी केली असल्यास त्याचा अर्ज क्रमांक आणि पासवर्डने लॉग इन करा.
 • पहिल्यांदाच नोंदणी करत असल्यास नोंदणी तपशील भरून सबमिट करा.
 • लॉग इन केल्यानंतर अर्ज भरा.
 • आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रवेश शुल्क भरा.
 • अर्जाची प्रत डाऊनलोड करून त्यांची प्रिंट काढा.

JEE Main 2022


JEE Main 2022 Session 2

JEE Main 2022: The registration process has been started for JEE Main July Session under National Testing Agency. Registration Process Starts For JEE Mains July Session, Apply Till 9 Pm On 30th June. Candidates apply online on jeemain.nta.nic.in portal. Further details are as follows:-

JEE Main जुलै सत्रासाठी नोंदणी सुरु!!

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे जेईई मेन जुलै सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी ३० जून रोजी रात्री ९ वाजेपर्यंतच उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील. या एका महिन्यादरम्यान, उमेदवार माहिती बुलेटिनमधील सर्व महत्त्वाचे तपशील वाचू शकतात आणि वेळेवर अर्ज करू शकतात. जेईई मेन २०२२ सत्र २ ची परीक्षा २१, २२, २३,२४,२५,२६, २७,२८, २९ आणि ३० जुलै २०२२ रोजी होणार आहे.

 • जेईई मेन जुलै सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया (jee main 2022 July session registrations) सुरू झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनेने (National Testing Agency, NTA) १ जून २०२२ रोजी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जेईई मेन्स २०२२ ( JEE Mains 2022) जुलै सत्रासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.
 • या परीक्षेत भाग घेऊ इच्छिणारे सर्व विद्यार्थी पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
 • ३० जून रोजी रात्री ९ वाजेपर्यंतच उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील. या एका महिन्यादरम्यान, उमेदवार माहिती बुलेटिनमधील सर्व महत्त्वाचे तपशील वाचू शकतात आणि वेळेवर अर्ज करू शकतात.
 • जेईई मेन २०२२ सत्र २ ची परीक्षा २१, २२, २३,२४,२५,२६, २७,२८, २९ आणि ३० जुलै २०२२ रोजी होणार आहे.

JEE Main Session 2 Exam 2022 – Important Dates 

 • जेईई मेन २०२२ सत्र २ नोंदणी सुरू – १ जून २०२२
 • JEE मुख्य जुलै परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२२ रात्री ९ वाजता
 • अर्ज फी भरण्याची अंतिम तारीख- ३० जून २०२२ रात्री ११.५० पर्यंत
 • JEE मुख्य २०२२ जुलै सत्र तारीख- २१ ते ३० जुलै २०२२
 • जेईई मेन २०२२ प्रवेशपत्र (सत्र १)- जून २०२२ च्या मध्यापर्यंत
 • JEE Mains 2022 च्या जुलै सत्राचे प्रवेशपत्र जुलै 2022 च्या मध्यापर्यंत येण्याची शक्यता आहे.
 • रँक कार्डसह जेईई मुख्य निकाल २०२२- ६ ऑगस्ट २०२२

How to Apply For JEE Main 2022 Session 2 

 • Candidates visit the jeemain.nta.nic.in for JEE Main July Session Registration
 • then click on the home page Session 2 registration for JEE Main 2022
 • Register yourself and log in using your credentials
 • By giving all the details and uploading documents
 • Submit application fees and fill the application
 • Download and print a copy for future reference.

अधिकृत वेबसाईट – jeemain.nta.nic.in


JEE Main 2022 Admit Card 

JEE Main 2022 : Millions of candidates are waiting for the city of JEE main exams and the issuance of tickets for the June 2022 session. According to media reports, the city of JEE Main 2022 Admission and Examination Center is expected to be announced next week. Further details are as follows:-

जेईई मेन २०२२ च्या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना सर्व अद्ययावत माहितीसाठी अधिकृत वेबसाइट – jeemain.nta.nic.in वर लक्ष ठेवावे लागेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परीक्षा केंद्र शहर मे महिन्याच्या अखेरीस म्हणजेच या आठवड्यापर्यंत जाहीर होण्याची अपेक्षा आहे. लाखो उमेदवार जेईई मुख्य परीक्षेचे शहर आणि जून २०२२ सत्रासाठी प्रवेशपत्र जारी होण्याची वाट पाहात आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये केलेल्या दाव्यानुसार, जेईई मेन २०२२ प्रवेशपत्र आणि परीक्षा केंद्राचे शहर पुढील आठवड्यात घोषित केले जाण्याची अपेक्षा आहे.

जून सत्रासाठी हॉल तिकीट आणि जुलै सत्रासाठी नोंदणी लवकरच 

 • तथापि, जेईई मेन २०२२ च्या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना सर्व अद्ययावत माहितीसाठी अधिकृत वेबसाइट – jeemain.nta.nic.in वर लक्ष ठेवावे लागेल.
 • मीडिया रिपोर्ट्सनुसार, परीक्षा केंद्र शहर मे महिन्याच्या अखेरीस म्हणजेच या आठवड्यापर्यंत जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
 • त्याच वेळी, परीक्षेची हॉल तिकीट पुढील महिन्यात म्हणजेच जूनच्या पहिल्या आठवड्यात जारी केले जाईल.
 • नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) जून २०२२ सत्रासाठी हॉल तिकीट जारी करेल आणि दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणजेच जुलै २०२२ परीक्षेसाठी नोंदणी विंडो लवकरच सुरू करेल अशी अपेक्षा आहे.

दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा २१ जुलैपासून सुरू होणार आहे. जेईई मेन २०२२ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी मुख्य संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच जुलै सत्र २१ जुलै ते ३० जुलै २०२२ या कालावधीत घेण्यात येईल. त्याचवेळी, NTA ने लवकरच JEE Main 2022 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणजेच जुलै सत्रासाठी अॅप्लिकेशन विंडो उघडण्याची अपेक्षा आहे. परीक्षेच्या पहिल्या टप्प्यासाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी वेबसाइटला सतत भेट देत रहावे. तर, जेईई मेन – 2022 च्या अधिक माहितीसाठी, उमेदवार ०११- ४०७५९०००/ ०११-६९२२७७०० वर संपर्क किंवा [email protected] वर ई-मेल करू शकतात.

How to Download JEE Main 2022 Admit Card 

 • JEE Mains प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्यावी.
 • ‘जून आणि जुलै सत्रासाठी प्रवेशपत्र डाऊनलोड करा’ असे लिहिलेल्या टॅबवर क्लिक करा.
 • एकदा लिंक सक्रिय झाल्यावर तुमचे लॉगिन तपशील नोंदवा.
 • आता तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
 • सर्व माहिती तपासून पाहा.
 • त्यानंतर ते डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा.

JEE Main Session 1 Admit Card 2022

JEE Main 2022: JEE is the largest examination in the country for admission to engineering courses conducted by the National Testing Agency, through which students are admitted for degree courses in engineering and related sciences. According to media reports, the first session of JEE Main 2022 will be held by NTA from 20 to 29 June 2022. Further details are as follows:-

जेईई ही नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे आयोजित अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशातील सर्वात मोठी परीक्षा आहे, या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि संबंधित विज्ञान क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेईई मेन २०२२ चे पहिले सत्र एनटीए २० ते २९ जून २०२२ दरम्यान आयोजित करेल.

 • नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मुख्य म्हणजेच जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम 2022 (JEE Main 2022) सत्र १ परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
 • विद्यार्थी संबंधित वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट देऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील.
 • जेईई मेन 2022 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल २०२२ होती.
 • जेईई ही नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे आयोजित अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशातील सर्वात मोठी परीक्षा आहे, या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि संबंधित विज्ञान क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो.
 • मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेईई मेन २०२२ चे पहिले सत्र एनटीए २० ते २९ जून २०२२ दरम्यान आयोजित करेल. परीक्षेच्या वेळी हॉल तिकीट सोबत असणे आवश्यक आहे.

पुढे दिलेल्या सोप्या टप्प्यांद्वारे देखील तुम्ही तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

How to Download JEE Main Exam 2022 

 • – संबंधित वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या.
 • – मुख्यपृष्ठावर, JEE मुख्य परीक्षा 2022 सत्र १ प्रवेशपत्र लिंकवर क्लिक करा.
 • – येथे तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
 • – तुमचे प्रवेशपत्र तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

After downloading the admission card, the students should check it carefully, because if any kind of error is found, the students will not be allowed to sit in the examination hall. Also keep in mind that there may be a self-declaration form with the admission card, in which you will have to provide your health status and travel details.

JEE (मुख्य) – 2022 च्या अधिक माहितीसाठी, उमेदवार ०११- ४०७५९००० किंवा ०११- ६९२२७७०० वर संपर्क साधू शकतात किंवा [email protected] वर ईमेल करू शकतात.


JEE Main Exam 2022

JEE Main 2022: The registration window for the JEE Main 2022 exam was closed on April 5, 2022 by the National Testing Agency. But now the registration has been restarted. To apply, candidates must first apply on the official website. Further details are as follows:-

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे ५ एप्रिल २०२२ रोजी जेईई मेन २०२२ परीक्षेसाठी नोंदणी विंडो बंद करण्यात आली. पण आता ही नोंदणी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा लागेल.

How to Apply For JEE Main Exam 2022

 • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
 • तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल फोन नंबर भरुन नोंदणी करा.
 • त्यानंतर ऑनलाइन अर्ज भरून एक ‘अॅप्लिकेशन नंबर’ तयार होईल. तो लिहून ठेवा.
 • सिस्टिमद्वारे जनरेटेड नोंदणी किंवा अर्ज क्रमांक वापरून जेईई मेन २०२२ अर्ज भरा.
 • फोटो आणि सहीसह स्कॅन केलेले डॉक्यूमेंट अपलोड करा.
 • अर्ज शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरा.
 • जेईई मुख्य अर्ज सबमिट करा.
 • कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा. सेव्ह करा आणि प्रिंट काढा.

Candidates will have to upload some required documents to fill up the application form for JEE Main 2022 Examination. These documents need to be uploaded in a specific size and format. The information to upload all the relevant documents is given below.

१) जेपीजी किंवा जेपीईजी फॉरमॅटमधील फोटोची स्कॅन केलेली प्रत आणि फाइलचा आकार १० केबी ते २०० केबी दरम्यान असावा.

२) स्कॅन केलेली ससही जेपीजी किंवा जेपीईजी फॉरमॅटमध्ये आणि ४ केबी ते ३० केबीच्या दरम्यान असावी.

३) संबंधित राखीव श्रेणीची स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा. त्यांचा आकार ५० केबी ते ३०० केबी दरम्यान असावा.

JEE Mains Exam Pattern 

According to the JEE Main 2022 exam pattern, both the papers will be conducted online computer based online except for the drawing test for B.Arch. For Paper 1, each subject consists of 20 multiple choice questions (MCQ) and 10 numerical value questions and only 5 out of 10 questions are compulsory as per the pattern of JEE Main 2022 exam.


JEE Main 2022

JEE Main 2022: Applications for JEE Main Exam can be submitted till 9.50 pm on 5th April, 2022. Candidates will be able to register by following the steps given in the news by visiting the official website. According to the new schedule, JEE examination will now be held from 21st April to 04th May 2022. Further details are as follows:-

जेईई मुख्य परीक्षेसाठी ५ एप्रिल २०२२ रात्री ९.५० पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो नोंदणी करता येणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार आता जेईई परीक्षा २१ एप्रिल ते ०४ मे २०२२ या कालावधीत घेतली जाणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार २१, २४, २५ आणि २९ एप्रिल, आणि ४ मे २०२२ दरम्यान परीक्षा होणार आहेत.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (National Testing Agency, NTA) ५ एप्रिल २०२२ रोजी जेईई मेन २०२२ परीक्षेसाठी नोंदणी विंडो बंद करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरला नसेल ते उमेदवार ५ एप्रिल रात्री ९.५० वाजेपर्यंत अर्ज भरु शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर अर्ज करावा लागेल. उमेदवारांना पुढील स्टेप्स फॉलो करुन नोंदणी करता येणार आहे.

JEE Main 2022 Important Documents 

 • उमेदवाराचे फोटो आणि सही स्कॅन केलेले फोटो
 • कॅटेगरी प्रमाणपत्र (आरक्षित श्रेणीशी संबंधित असल्यास).
 • जेईई मेन २०२२ नोंदणी शुल्क भरण्यासाठी डेबिट कार्ड / इंटरनेट बँकिंग तपशील.
 • आधारकार्ड, बँक पासबुक, रेशन कार्डची प्रत इ.

JEE Main 2022 exam dates

 • JEE मेन २०२२ अर्ज जाहीर होण्याची तारीख – १ मार्च २०२२
 • जेईई मुख्य अर्ज भरण्याची शेवटची तारीख २०२२- ५ एप्रिल २०२२
 • जेईई मुख्य २०२२ परीक्षेची तारीख- २१, २४, २५, २९ एप्रिल, १ आणि ४ मे २०२२

Pattern of JEE Main Exam

जेईई मेन २०२२ च्या परीक्षेच्या पॅटर्ननुसार, बी.आर्कसाठी ड्रॉईंग चाचणी वगळता दोन्ही पेपर ऑनलाइन कॉम्प्युटर आधारित पद्धतीने आयोजित केले जातील. पेपर १ साठी, प्रत्येक विषयामध्ये २० एकाधिक निवड प्रश्न (MCQ) आणि १० संख्यात्मक मूल्याचे प्रश्न असतात आणि जेईई मेन २०२२ परीक्षेच्या पॅटर्ननुसार १० पैकी फक्त ५ प्रश्न अनिवार्य आहेत.


JEE Main 2022 Exam

JEE Main 2022: The National Testing Agency has started the registration by announcing the notification for the year 2022 Engineering Admission, Joint Entrance Examination (Main). Students who have not yet registered for this exam will be able to apply till April 5. Further details are as follows:-

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने वर्ष २०२२ च्या इंजिनीअरिंग प्रवेश, संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) साठी नोटिफिकेशन जाहीर करुन नोंदणी सुरु केली आहे. या परीक्षेसाठी अद्याप नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना ५ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन नोंदणी करता येणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केला नसेल ते अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी आता वेळेत अर्ज करावा कारण यानंतर त्यांना दुसरी संधी दिली जाणार नाही. तसेच अर्ज फी भरण्याची अंतिम तारीख देखील ५ एप्रिल २०२२ रोजी रात्री ११.५० पर्यंत असेल याची नोंद घ्या. जेईई मेन २०२२ सत्र १ चा ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध अडचणींमुळे एनटीएने नोंदणीची तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे देण्यात आलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करुन विद्यार्थ्यांना आपला निकाल तपासता येईल.

How to Register JEE Main 2022 Exam 

 • जेईई मेन २०२२ मध्ये नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम जेईई मेनची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
 • होमपेजवर उपलब्ध असलेल्या जेईई मेन २०२२ नोंदणी लिंकवर क्लिक करा.
 • आता नोंदणी तपशील भरा आणि सबमिटवर क्लिक करा.
 • लॉगिन केल्यानंतर अर्ज भरा.
 • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क भरा.
 • अर्ज पूर्ण भरुन झाल्यावर सबमिटवर क्लिक करा.
 • पेज डाउनलोड करा आणि पुढील आवश्यकतेसाठी त्याची प्रिंट काढा.

The agency has also announced the syllabus for both the papers of the entrance examination. Accordingly, Paper 1 will be for BE / B.Tech admission and Paper 2 will be for B.Arch. Candidates who are preparing for this year’s exam can check the syllabus of JEE Main 2022 from the active link on the exam portal jeemain.nta.nic.in or from the direct link given below.

दुसरीकडे, एनटीएने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार देशभरात चाचणी सराव केंद्रे (TPCs) तयार केली आहेत. ज्याद्वारे जेईई मेन २०२२ ची तयारी करणारे उमेदवार परीक्षा देऊ शकतील. तसेच प्रश्नांचे स्वरूप, कॉम्प्युटर आधारित प्रश्न (CBT)याबद्दल सविस्तर माहिती मिळवू शकतील. एनटीएने जाहीर केलेल्या माहितीनुसार, ज्या उमेदवारांकडे जेईई मेनची तयारी करण्यासाठी मर्यादित संसाधने असलेल्या उमेदवारांना एनटीएच्या टीपीसी सुविधा मोफत पुरवल्या जाणार आहेत. TPCs विशेषतः ग्रामीण भागात आणि देशातील दुर्गम भागातील उमेदवारांसाठी तयार केले गेले आहेत.


JEE Main 2022 Exam

JEE Main 2022: The National Testing Agency has changed the date of the first phase of JEE Main Examination 2022. These exams were to start from March 12. But now, according to the latest update, JEE main exam will be held from 16th to 21st April, 2022. Further details are as follows:-

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे जेईई मुख्य परीक्षा २०२२ च्या पहिल्या टप्प्याच्या तारखेमध्ये बदल केला आहे. या परीक्षा १२ मार्चपासून सुरु होणार होत्या. पण आता नव्या अपडेटनुसार जेईई मुख्य परीक्षा २०२२ या १६ ते २१ एप्रिल या कालावधीत होणार आहे. एनटीएने आपल्या अधिकृत वेबसाईटवर यासंदर्भात माहिती जाहीर केली आहे. नवीन वेळापत्रकानुसार आता जेईई परीक्षा २१ एप्रिल ते ०४ मे २०२२ या कालावधीत घेतली जाणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार २१, २४, २५ आणि २९ एप्रिल, आणि ४ मे २०२२ दरम्यान परीक्षा होणार आहेत.

JEE Main Exam Pattern – जेईई मुख्य परीक्षेचा पॅटर्न

जेईई मेन २०२२ च्या परीक्षेच्या पॅटर्ननुसार, बी.आर्कसाठी ड्रॉईंग चाचणी वगळता दोन्ही पेपर ऑनलाइन कॉम्प्युटर आधारित पद्धतीने आयोजित केले जातील. पेपर १ साठी, प्रत्येक विषयामध्ये २० एकाधिक निवड प्रश्न (MCQ) आणि १० संख्यात्मक मूल्याचे प्रश्न असतात आणि जेईई मेन २०२२ परीक्षेच्या पॅटर्ननुसार १० पैकी फक्त ५ प्रश्न अनिवार्य आहेत.

इतर शहरांमध्ये परीक्षा केंद्र असल्यास अडचण

पहिल्यांदाच जेईई-मेन परीक्षा बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या मध्यावर होणार आहे. अशा परिस्थितीत जेईई परीक्षार्थींचे परीक्षा केंद्र त्यांच्याच शहरात न आल्यास त्यांच्यासमोर मोठी समस्या निर्माण होईल. जुन्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, सीबीएसईच्या ज्या विद्यार्थी आणि उमेदवारांकडे अतिरिक्त जीवशास्त्र विषय असेल त्यांना जेईई-मेन आणि बोर्ड परीक्षा केंद्रे वेगळी असल्यास परीक्षा द्यायला अडचण येणार आहे. २८ आणि २९ मे रोजी जेईई मेन परीक्षा होत आहे. जेईई मेन आणि बोर्ड परीक्षा केंद्र वेगवेगळ्या शहरांमध्ये असते. त्यामुळे प्रवासामुळे पेपर चुकण्याची शक्यता असते.

According to the official notification, NTA JEE Mains 2022 will be held only twice. Students who want to appear in NTA JEE Main Exam 2022 are required to submit JEE Application Form 2022 before the deadline. This is an important update for candidates preparing for JEE Main 2022 exams, especially in rural and remote areas. The National Testing Agency (NTA) has started the registration by announcing the notification for the year 2022 Engineering Entrance, Joint Entrance Examination (Main).

यासोबतच एजन्सीने प्रवेश परीक्षेच्या दोन्ही पेपरसाठी अभ्यासक्रम देखील जाहीर केला आहे . त्यानुसार पेपर १ हा BE/B.Tech प्रवेशासाठी आणि पेपर २ B.Arch साठी असेल. या वर्षीच्या परीक्षेची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांना परीक्षा पोर्टल jeemain.nta.nic.in वर सक्रिय लिंक किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरुन जेईई मेन २०२२ चा अभ्यासक्रम तपासता येणार आहे.


JEE Main 2022 Update

JEE Main 2022 : The age limit for candidates as well as the requirement of PCM (Physics, Chemistry, Maths) have been abolished as per the changes made by the National Testing Agency (NTA) in the rules regarding this examination. Further details are as follows:-

अभियांत्रिकी प्रवेशासाठी महत्त्वाच्या अशा जेईई मेन २०२२ या परीक्षेसाठी अर्ज व नोंदणी प्रक्रिया सध्या सुरु आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) या परीक्षेसंबंधी नियमांत केलेल्या काही बदलांनुसार आता उमेदवारांसाठी वयोमर्यादा तसेच पीसीएमची (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) अनिवार्यता संपुष्टात आली आहे.

JEE Main 2022


JEE Main Examination 2022

JEE Main 2022: The National Testing Agency has announced that the JEE Main Examination 2022 will be held in two phases. So the candidates will get two chances to improve their marks in the exam. Students who do not give the best in the first test will be able to prepare well in the second test. Further details are as follows:-

जेईई मुख्य परीक्षा २०२२ दोन टप्प्यात होणार असल्याची घोषणा नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना परीक्षेतील आपले गुण सुधारण्यासाठी दोन संधी मिळणार आहेत. पहिल्या परीक्षेत सर्वोत्तम देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रयत्नामध्ये उत्तम तयारी करुन उतरता येणार आहे.

जेईई मुख्य परीक्षेत दोन पेपर

संयुक्त प्रवेश परीक्षा, जेईई मेनमध्ये दोन पेपर असतील. जेईई मेनचा पेपर १ हा एनआयटी, आयआयटी, इतर केंद्रीय अनुदानित तांत्रिक संस्था (CFTIs) आणि केंद्रीय विद्यापीठे आणि राज्य सरकारांनी अनुदानित/मान्यताप्राप्त बीई/बीटेक मधील प्रवेशासाठी घेतला जाईल. तर पेपर २ हा देशभरातील आर्किटेक्चर इंजिनीअरिंग संस्थांमध्ये बीआर्क आणि बी प्लानिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतला जाईल. या गुणांच्या आधारे जेईई अॅडव्हान्स परीक्षेच्या माध्यमातून आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश मिळेल.

दोन्ही टप्प्यात बसणे आवश्यक नाही

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने हेही स्पष्ट केले आहे की, उमेदवारांनी परीक्षेच्या दोन्ही टप्प्यांमध्ये उपस्थित राहणे आवश्यक नाही. ते कोणत्याही एका टप्प्यातील परीक्षेतही बसू शकतात. त्यांनी दोन्ही टप्प्यात भाग घेतल्यास गुण सुधारण्यास त्यांना मदत होईल. उमेदवार त्यांच्या बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकानुसार उमेदवार जेईई मुख्य परीक्षा २०२२ च्या कोणत्याही एका टप्प्यात उपस्थित राहू शकतात.

…तर दुसरी संधी मिळणार नाही

यासोबत एनटीएनेही उमेदवारांना मोठा धक्का दिला आहे. एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, एखादा उमेदवार त्याच्या काही कारणांमुळे जेईई मुख्य प्रवेश परीक्षेस उपस्थित राहिला नसेल तर त्याला पूर्ण एक वर्ष वाट पाहावी लागेल. म्हणजेच जर एखादा उमेदवार परीक्षा देऊ शकला नाही तर त्याला त्याच वर्षात त्याला दुसरी संधी दिली जाणार नाही.

या संस्थांमध्येही मिळेल प्रवेश

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्ट केले आहे की, २०२१ पासून एकेटीयू म्हणजेच डॉ. एपीजे अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटी, लखनऊ, उत्तर प्रदेश आणि मदन मोहन मालवीय टेक्निकल युनिव्हर्सिटी, गोरखपूर देखील जेईई मेन परीक्षा २०२२ स्कोअरच्या आधारे इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणार आहे.


JEE Main 2022 May Be Conducted In March 2022

JEE Main 2022 : This year, the board exams have been organized in two phases. The first phase has been completed in December 2021 while the second phase board examinations will be held in March 2022. As a result, the JEE Main exam is likely to be held in March instead of February. Further details are as follows:-

यंदा बोर्ड परीक्षांचे आयोजन दोन टप्प्यात करण्यात आले आहे. पहिला टप्पा डिसेंबर २०२१ मध्ये पार पडला आहे तर दुसऱ्या टप्प्यातील बोर्ड परीक्षा मार्च २०२२ मध्ये आयोजित होणार आहेत. परिणामी जेईई मेन परीक्षेचे आयोजनही फेब्रुवारीऐवजी मार्चमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

देशभरातील प्रतिष्ठित इंजिनीअरिंग संस्थांमध्ये बॅचलर डिग्री अभ्यासक्रमांसाठी प्रवेशांसाठी जॉइंट एन्ट्रन्स परीक्षेचे आयोजन मार्च २०२२ मध्ये केले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA)द्वारे या परीक्षेचे आयोजन केले जाते. यापूर्वी अशी शक्यता वर्तवली जात होती की २०२१ प्रमाणेच २०२२ मध्ये देखील जेईई परीक्षेचा आयोजन टप्प्याटप्प्याने फेब्रुवारीपासून सुरू होईल. पण विविध मिडीया रिपोर्ट्सनुसार, एनटीए जेईई मेन २०२२ चे आयोजन मार्चपासून एकूण चार टप्प्यांमध्ये होऊ शकते.

जेईई मेन परीक्षा मार्चमध्ये होण्याची शक्यता का?

This year, the board exams have been organized in two phases. The first phase has been completed in December 2021 while the second phase board examinations will be held in March 2022. As a result, the JEE Main exam is likely to be held in March instead of February. The exams could also be held in March due to the Assembly elections in five states next year.

Elections could change the planning of the 2022 JEE March. The first exam is expected to be held in March followed by the JEE Main exam in April, May and June. However, no update has been given on the official start dates of JEE Main 2022 registration. But there is a possibility that registration for JEE Main 2022 may start from January on jeemain.nta.nic.in. The notification may be issued in the first week of January.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड