JEE MAIN 2020 – BE / B.Tech स्कोअर आणि कट ऑफ लिस्ट

JEE Main 2020 Result


JEE Main 2020 Result :  जेईई मेन २०२० बीई / बीटेक् स्कोअर आणि कट ऑफ लिस्ट पाहा…

JEE Main 2020: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने शुक्रवारी ११ सप्टेंबर रोजी जेईई मेन परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला. यावर्षी एकूण ११.७४ लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षेसाठी नोंदणी केली (जानेवारी आणि सप्टेंबर परीक्षा मिळून) त्यापैकी १०.२३ लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. देशभरात २३२ शहरांमध्ये एकूण ६६० केंद्रांवर परीक्षा पार पडली. यापैकी ८ केंद्रे ही देशाबाहेरची होती.

जेईई मेन परीक्षा २०२० बीई / बीटेक अभ्यासक्रमांसाठी यंदा दोन वेळा संगणक आधारित पद्धतीने झाली. पहिली परीक्षा ७ ते ९ जानेवारी २०२० या कालावधी सहा सत्रात झाली तर दुसरी परीक्षा २ ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीत १० सत्रात झाली.

 • जेईई मेन २०२० कट ऑफ टोटल पेपर – १ (बीई / बीटेक)
 • प्रवर्ग – कट ऑफ
 • सर्वसाधारण रँक यादी – ९०.३७६५३३५
 • आर्थिक वंचित गट – ७०.२४३५५१८
 • ओबीसी – ७२.८८८७९६९
 • एससी – ५०.१७६०२४५
 • एसटी – ३९.०६९६१०१
 • दिव्यांग – ०.०६१८५२४

एकूण २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत. जानेवारी आणि सप्टेंबर असा दोन्ही स्कोर पाहून सर्वोत्तम स्कोर ध्यानात घेतला आहे. एनटीएचं स्कोअर कार्ड jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलं आहे.


JEE Main 2020 Result : JEE MAIN 2020 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे…

आयआयटी; तसेच देशातील नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील होणाऱ्या जेईई मेन्स प्रवेश परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर झाला. या परिक्षेत २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. शिवाय विद्यार्थी व पालकांना ही उत्तरतालिका नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाइटवर पाहायला मिळेल. जेईई मेन्स परीक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान देशभरात पार पडली. देशातील साधारण ८ लाख ६७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. परीक्षेचा निकाल jeemain.nic.in आणि jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल.

JEE Main 2020 Result

शुक्रवारी निकाल जाहीर होणार म्हणून विद्यार्थी आणि पालक दिवसभर एनटीए जेईई मेन्सची वेबसाइटवर पाहत होते. मात्र, दिवसभर निकाल जाहीर न होता रात्री अकराच्या सुमारास जाहीर झाला. निकाल वेबसाइटवर अपलोड झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना आपल्या लॉगइन आयडी आणि इतर माहितीद्वारे वेबसाइटवर पाहता येईल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

शुक्रवारी निकाल जाहीर होणार म्हणून विद्यार्थी आणि पालक दिवसभर एनटीए जेईई मेन्सची वेबसाइटवर पाहत होते. मात्र, दिवसभर निकाल जाहीर न होता रात्री अकराच्या सुमारास जाहीर झाला. निकाल वेबसाइटवर अपलोड झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना आपल्या लॉगइन आयडी आणि इतर माहितीद्वारे वेबसाइटवर पाहता येईल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

कसा पाहाल निकाल?

 • – जेईई मेनच्या jeemain.nic.in किंवा jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जा.
 • – View Result / Scorecard या पर्यायावर क्लिक करा.
 • – अॅप्लिकेशन क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
 • – सिक्युरिटी पिन नंबर टाका
 • – लॉग इन करा.
 • – तुमचा जेईई मेन परीक्षेचा निकाल तुम्हाला पाहता येईल.

ज्या २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंंटाइल मिळाले त्यांची यादी पुढीलप्रमाणे –

८ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ६ लाख ३५ हजार विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. म्हणजेच २ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवली. जेईई मेन परीक्षा वर्षातून दोन वेळा होते. यावर्षी जानेवारी महिन्यात ही परीक्षा झाली होती. गेल्या वर्षी जानेवारी आणि एप्रिल परीक्षेला अनुक्रमे ९४.११ आणि ९४.१५ टक्के उपस्थिती होती.


JEE Main 2020 Result : जेईई मेन २०२० परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे….

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) जेईई मेन २०२० परीक्षेचा निकाल आज जाहीर करणार आहे. जेईई मेन परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर हा निकाल विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. ही परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आली होती. ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि ६.३५ लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. कोविड – १९ महामारी काळात देशपातळीवर मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेली ही पहिली परीक्षा आहे.

JEE Main 2020 Result

परीक्षेचा निकाल jeemain.nic.in आणि jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळांवर ११ सप्टेंबर रोजी जाहीर होईल.

कसा पाहाल निकाल?

– जेईई मेनच्या jeemain.nic.in किंवा jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जा.
– View Result / Scorecard या पर्यायावर क्लिक करा.
– अॅप्लिकेशन क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
– सिक्युरिटी पिन नंबर टाका
– लॉग इन करा.
– तुमचा जेईई मेन परीक्षेचा निकाल तुम्हाला पाहता येईल.

जेईई मेन टॉपर २०२०, कट ऑफ आणि कॉमन मेरिट लिस्ट

एनटीए जेईई मेनच्या निकालासोबतच जेईई मेनचे टॉपरदेखील जाहीर करेल. जेईई मेन कट ऑफ आणि ऑल इंडिया रँक जाहीर केला जाईल. टॉ़प २,५०,००० विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरतील. आयआयटी’मध्ये प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्डच्या गुणांबरोबरच बारावीत ७५ टक्के किंवा टॉप २० पर्सेंटाइल गुण आवश्यक असतात. यावर्षी ही अट शिथिल करण्यात आली आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. मात्र विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. तसेच जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षाही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

२५ टक्के विद्यार्थी गैरहजर

जेईई मेन सप्टेंबर परीक्षेला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी २५ टक्क्यांवर विद्यार्थी अनुपस्थित राहिले. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ही माहिती दिली आहे. १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली. ८ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ६ लाख ३५ हजार विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. म्हणजेच २ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवली.

सोर्स : म. टा.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड