Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

JEE Advanced परीक्षेचा निकाल जाहीर; वाविलाला चिद्विलास रेड्डी देशात पहिला !! येथे बघा

JEE Advanced Result

JEE Advanced Result 2023

JEE Advanced Result: Joint Entrance Examination (JEE) Advanced 2023 Result has been Published by the Indian Institute of Technology (IIT). The result of the JEE Advanced exam conducted for admission to degree courses in the IITs. Vavila Chidvilas Reddy, a student from the IIT Hyderabad department secured the first rank in the country by scoring 341 out of 360 marks.Check Your IIT JEE Advanced Result 2023 from below link:

देशातील आयआयटींमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी घेण्यात आलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स्ड या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात आयआयटी हैद्राबाद विभागातील वाविलाला चिद्विलास रेड्डी या विद्यार्थ्याने ३६० पैकी ३४१ गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळवला. तर नायाकांती नागा भाव्या श्री या विद्यार्थिनीने ३६० पैकी १९८ गुण मिळवत मुलींमध्ये पहिले स्थान प्राप्त केले.

या निकाला संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

देशभरातील आयआयटींमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस असते. त्यामुळे जेईई मेन्स या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांचे लक्ष जेईई अ‍ॅडव्हान्स्डकडे असते. यंदा आयआयटी गुवाहाटीतर्फे जेईई अ‍ॅडव्हान्स्ड आयोजित करण्यात आली. जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी १ लाख ८० हजार २७२ परीक्षार्थ्यांनी जेईई अ‍ॅडव्हान्समधील दोन्ही पेपर दिले. त्यातील ४३ हजार ७७३ परीक्षार्थी पात्र ठरले. त्यात ७ हजार ५०९ मुली आहेत.

आयआयटी मुंबईअंतर्गत ७ हजार ९७५, आयआयटी दिल्लीअंतर्गत ९ हजार २९०, आयआयटी गुवाहाटीअंतर्गत २ हजार ३९५, आयआयटी हैद्राबाद अंतर्गत १० हजार ४३२, आयआयटी कानपूरअंतर्गत ४ हजार ५८२, आयआयटी खरगपूरअंतर्गत ४ हजार ६१८, आयआयटी रुरकीअंतर्गत ४ हजार ९९९ परीक्षार्थी पात्र ठरले. आयआयटी मुंबई विभागातील अनुक्रमे पहिल्या पाच स्थानी शंकर, युवराज गुप्ता, चैतन्य माहेश्वरी, जस्त्य जरीवाला, सुमेध एस एस यांचा समावेश आहे, तर मुलींमध्ये आदिती सिंगने पहिला क्रमांक मिळवला.

How to Download JEE Advanced Result 2023 | jeeadv.ac.in 

  • सर्व प्रथम JEE Advanced च्या अधिकृत वेबसाईट, https://jeeadv.ac.in/ वर जा.
  • त्यानंतर होम पेजवरील निकाल तपासण्यासाठी थेट लिंकवर क्लिक करा.
  • आता रोल नंबर, जन्मतारीख आणि फोन नंबर टाका.
  • यासह, परिणाम स्क्रीनवर दिसेल.
  • आता JEE Advanced 2023 स्कोअरकार्ड आणि निकाल डाउनलोड करा.

The final answer keys for JEE (Advanced) 2023 examination are available now:
Paper 1 Final Answer Keys
Paper 2 Final Answer Keys

Candidates can check their JEE (Advanced) 2023 result from 10:00 AM IST on June 18, 2023 using the following link.
Link for Result Portal

Qualified candidates can register for Architecture Aptitude Test (AAT) 2023 from June 18, 2023, 10:00 AM IST to June 19, 5:00 PM IST using any of the following links:
AAT 2023 Registration Link 1
AAT 2023 Registration Link 2


JEE Advanced Result 2022

JEE Advanced Result: The result of JEE Advanced, which is very important for admission to various courses in IITs of the country, has been declared. Check here more details about the result. Further details are as follows:-

देशातील आयआयटीमधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जेईई ॲडव्हान्स या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. 

  • मुंबई झोनमधून बंगळूरु येथील आर. के. शिशिर हा देशात प्रथम आला आहे.
  • त्याने ३६० पैकी ३१४ गुण मिळवले आहेत. दिल्ली आयआयटी झोनमधील तनिष्का काबरा ही मुलींमध्ये देशात टॉपर ठरली आहे.
  • तिने ३६० पैकी २७७ गुण मिळवले आहेत.
  • मुंबईचा ओजस महेश्वरी हा दिव्यांग विद्यार्थी त्या प्रवर्गातून पहिला आला आहे.
  • या परीक्षेत राज्यातून ओंकार शिरपुरे हा ओबीसी दिव्यांग प्रवर्गातून पहिला आला असून नवी मुंबईतील उत्कर्ष पंत देशात ४५ वा आला आहे.
  • यंदा २००८ नंतर सर्वांत कमी निकाल लागला असल्याने आयआयटीची कटऑफ घसरण्याची शक्यता आहे.

जेईई ॲडव्हान्सच्या परीक्षेला देशभरातून एक लाख ५५ हजार ५३८ जण बसले होते. त्यातमध्ये ४० हजार ७१२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये ३४ हजार १९७ विद्यार्थी; तर ६ हजार ४१६ विद्यार्थिनींचा समावेश आहे. अपंग वर्गातून ३७५ आणि विदेशातील १४५ विद्यार्थीही पात्र ठरले आहेत.


JEE Advanced Result 2022 Dates

JEE Advanced Result: Indian Institute of Technology Bombay (IIT Bombay) has declared the JEE Advanced Result 2022 date. The result will be declared on 11th of September 2022. visit jeeadv.ac.in to download the result. Further details are as follows:-

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) ने JEE Advanced Result 2022 ची तारीख जाहीर केली आहे. JEE Advanced निकाल 2022 11 सप्टेंबर 2022 रोजी अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर प्रसिद्ध केला जाईल. अशा परिस्थितीत, जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा दिलेले उमेदवार 2022 च्या अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वरून त्यांचे निकाल पाहू शकतात. JEE Advanced Result (JEE Advanced 2022) तपासण्यासाठी उमेदवारांना रोल नंबर, जन्मतारीख आणि फोन नंबर आवश्यक असेल.

  • JEE Advanced 2022 ची परीक्षा 28 ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती.
  • परीक्षेला बसलेले विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्ड फायनल आन्सर कीची वाट पाहत आहेत.
  • प्राधिकरण लवकरच अंतिम उत्तर की जारी करेल अशी सूत्रांची माहिती आहे.
  • उत्तरपत्रिकेनंतर निकाल जाहीर केला जाईल.
  • JEE Advanced निकाल 2022 सोबत, परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑल इंडिया रँक (AIR) देखील प्रसिद्ध केले जातील.
  • IITB JEE Advanced परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना टेक्स्ट मेसेज देखील पाठवेल.
  • मात्र जेईई अॅडव्हान्स परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना प्राधिकरण वैयक्तिक रँक कार्ड पाठवणार नाही.
  • अलीकडेच तात्पुरती JEE Advanced 2022 उत्तर की अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • उमेदवारांना 3 ते 4 सप्टेंबर दरम्यान JEE Advanced 2022 च्या आन्सर की वर आक्षेप नोंदवण्याची परवानगी होती.
  • आर्किटेक्चर अॅप्टिट्यूड टेस्टचा JEE अॅडव्हान्स्ड निकाल 17 सप्टेंबर रोजी जाहीर केला जाईल.

अधिकृत वेबसाईट – jeeadv.ac.in


JEE IIT Results Declared

JEE Advanced Result : The Indian Institute of Technology Kharagpur on Friday announced the results of the Joint Entrance Examination Advanced (JEE Advanced 2021). A list of toppers has also been announced along with this result. Further details are as follows:-

JEE IIT Results: जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन अॅडव्हान्स्डचा निकाल जाहीर झाला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खडगपूरने जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन अॅडव्हान्स्ड म्हणजेच जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा (JEE Advanced 2021) निकाल शुक्रवारी घोषित केला आहे. या निकालासह टॉपर्सची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.

How to Check JEE Advanced Result 2021

  • – सर्वात आधी अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जा.
  • – यानंतर हायलाइट केलेल्या रिझल्टच्या पर्यायावर क्लिक करा.
  • – यानंतर आपला रोल नंबर आणि जन्मतारीख भरून सबमिट करा.
  • – यानंतर समोर स्क्रीनवर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.
  • – निकाल सेव्ह करून डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊटही घेऊन ठेवा.

निकाल डाउनलोड – http://jeeadv.ac.in./


JEE Advanced Result : जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे… कसा पाहाल निकाल …वाचा

JEE Advanced Result 2020: आयआयटी दिल्लीने जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. जेईई अॅडव्हान्स्डचे अधिकृत संकेतस्थळ jeeadv.ac.in वर विद्यार्थी त्यांचा निकाल पाहू शकतील.

विद्यार्थ्यांना त्यांचा अॅप्लिकेशन क्रमांक आणि पासवर्ड टाकून निकाल पाहताय येईल. जेईई अॅडव्हान्स्ड स्कोअरकार्डमध्ये विद्यार्थ्यांचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्सचे दोन्ही पेपर १ आणि पेपर २ चे गुण देण्यात आले आहेत. यासोबतच कॉमन रॅंक लिस्टमधील (CRL) रँकही देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा प्रवर्ग आणि अन्य माहितीही देण्यात आली आहे.

हे आहेत टॉपर्स

विद्यार्थ्यांमध्ये आयआयटी मुंबई झोनमधून चिराग फेलोर हा विद्यार्थी अव्वल आहे. चिरागला ३९६ पैकी ३५२ गुण मिळाले आहेत. मुलींमध्ये आयआयटी रुरकी झोनमधून कनिष्का मित्तल पहिली आली आहे. तिला ३९६ पैकी ३१५ गुण मिळाले आहेत. जेईई अॅडव्हान्स्ड २०२० साठी ओव्हरऑल टॉपर चिराग फेलोर हाच आहे. कनिष्काचा ओव्हरऑल रँक १७ आहे.

विद्यार्थ्यांना JoSSA काउन्सेलिंगमध्ये सहभागी होण्यासाठी

जेईई अॅडव्हान्स्ड निकाल डाऊनलोड करावा लागेल. जे विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्डमध्ये पात्र ठरले आहेत, ते आयआयटी, एनआयटी आणि अन्य संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास पात्र आहेत. निकालासोबतच जेईई अॅडव्हान्स्डचे टॉपर्सही आयआयटी दिल्लीने जाहीर केले आहेत.

२७ सप्टेंबर २०२० रोजी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देशभरात आयोजित करण्यात आली होती. भारतासह परदेशातही काही केंद्रे पहोती. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी ९६ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १,५१,३११ विद्यार्थी पेपर १ मध्ये तर १,५०,९०० विद्यार्थी पेपर २ मध्ये सहभागी झाले होते.

कसा डाऊनलोड कराल Jee Advanced Result 2020?

  • – जेईई अॅडव्हान्स्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. थेट लिंक या बातमीच्या अखेरीत दिली आहे.
  • – JEE Advanced Result 2020 या पर्यायावर क्लिक करावे.
    – जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मिळालेला अॅप्लिकेशन क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगइन करावे.
  • – आता तुमचा जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
  • – निकाल डाऊनलोड करावा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट आऊट काढून सुरक्षित ठेवावे.
JEE Advanced निकाल – http://result.jeeadv.ac.in/
फायनल आन्सर कीसाठी येथे क्लिक करा – http://jeeadv.ac.in/paper2020.php

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड