JEE अॅडव्हान्स्ड परीक्षेची तयारी सुरू!!

JEE Advanced 2020


JEE Advanced 2020  : जेईई अॅव्हान्स्ड २०२० परीक्षेसाठी सध्या ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

JEE Advanced 2020 : जेईई मेननंतर आता जेईई अॅव्हान्स्ड २०२० परीक्षा होणार आहे. ही परीक्षा २७ सप्टेंबर रोजी देशभरात आयोजित केली जाणार आहे. जेईई मेन परीक्षेत आवश्यक कट-ऑफपेक्षा जास्त गुण मिळवणारे टॉप २ लाख ५० हजार विद्यार्थीच जेईई अॅव्हान्स्ड २०२० परीक्षेसाठी पात्र ठरतात.

जेईई अॅव्हान्स्ड २०२० परीक्षेसाठी सध्या ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन अर्जांसाठी १७ सप्टेंबर ही अखेरची मुदत आहे. जेईई अॅव्हान्स्ड २०२० परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी यंदा आयआयटी दिल्लीवर आहे. जॉइंट अॅडमिशन बोर्ड (JAB 2020) च्या नेतृत्वाखाली सात आयआयटींमध्ये ही परीक्षा होणार आहे. जेईई अॅव्हान्स्डमधील गुणांच्या आधारेच आयआयटींमधील २०२०-२१ च्या पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश होणार आहेत. जेईई अॅव्हान्स्ड परीक्षा आणि प्रवेशांशी संबंधित निर्णय जॉइंट अॅडमिशन बोर्ड २०२० करेल.

आयआयटी दिल्ली नुसार, जर कोणी भारताबाहेरून १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली आहे, किंवा अशा बोर्डातून परीक्षा उत्तीर्णय केली आहे, जे यादीत नाही, अशा वेळी त्या विद्यार्थ्यांना AIU सर्टिफिटेस सादर करावा लागेल. या प्रमाणपत्राद्वारे हे सिद्ध होते की विद्यार्थ्याने बारावी समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

जेईई मेन २०२० निकाल असा होता –

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मेन निकाल शुक्रवारी ११ सप्टेंबर रोजी जाहीर केला. यंदा सुमारे ८ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षा दिली. देशभरात ६६० केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक खबरदारी आयोजकांनी घेतली होती. जेईई मेन २०२० मध्ये १०० पर्सेन्टाइल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २४ आहे.


JEE Advance : जेईई अॅडव्हान्स्डसाठी ११ सप्टेंबर २०२० पासून नोंदणी सुरू होणार आहे. परीक्षा कधी? जाणून घ्या…

JEE Advanced 2020 revised dates: जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयआयटी दिल्ली यंदा या परीक्षेचे आयोजन करणार आहे. जेईई अॅडव्हान्स्डसाठी ११ सप्टेंबर २०२० पासून नोंदणी सुरू होणार आहे. विद्यार्थी सुधारित वेळापत्रक पाहण्यासाठी परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ jeeadv.ac.in ला भेट देऊ शकतात.

११ सप्टेंबरपासून सुरू होणारी ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया १६ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. विद्यार्थी शुल्क भरण्याची प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत करू शकतात. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. परीक्षेचा निकाल ५ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.

जेईई मेन परीक्षेतील टॉप २.५ लाख विद्यार्थीच जेईई अॅडव्हान्स्डसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे आणि या परीक्षेचा निकार १० सप्टेंबर रोजी आहे.

जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देशातील सर्व आयआयटींमधील इंजिनीअरिंग, सायन्य किंवा आर्किटेक्चरच्या पदवी, इंटिग्रेटेड मास्टर्स किंवा बॅचलर-मास्टर ड्युअल डिग्री अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतली जाते.

जेईई अॅडव्हान्स्डचा पेपर पॅटर्न

परीक्षेला दोन पेपर (पेपर १ आणि पेपर २) असतात. प्रत्येक पेपरचा कालावधी तीन तासांचा असतो. दोन्ही पेपर्स देणे बंधनकारक आहे. प्रत्येक पेपरमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्सचे तीन स्वतंत्र विभाग असतात. काही प्रश्नांच्या उत्तरांना नकारात्मक मूल्यांकन असते.

परीक्षा पुढील वेळांनुसार होईल –

  • परीक्षेची तारीख – रविवार, २७ सप्टेंबर २०२०
    • पेपर १ ची वेळ – सकाळी ९ ते दुपारी १२
    • पेपर २ ची वेळ – दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३०

जेईई अॅडव्हान्स्ड अॅडमिट कार्ड

जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी हॉल तिकीट सोमवार २१ सप्टेंबर २०२० पासून परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ jeeadv.ac.in वर उपलब्ध होईल. विद्यार्थी २१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर सकाळी ९ वाजेपर्यंत हे प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतील. अॅडमिट कार्डवर विद्यार्थ्याचे नाव, जेईई अॅडव्हान्स्डचा रोल नंबर, छायाचित्र, स्वाक्षरी, जन्मतारीख, पत्ता आदी माहिती असेल. याशिवाय परीक्षा केंद्राचा पत्त आणि नाव असेल.


JEE Advance : JEE Advance 2020 Not to be Condected in Foreign Countries : IIT Delhi ने घोषणा केली की यंदा जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा परदेशात होणार नाही…

जेईई अॅडव्हान्स्ड ही परीक्षा यंदा परदेशांमध्ये आयोजित केली जाणार नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली (IIT Delhi) ने ही घोषणा केली आहे. यंदाच्या जेईई मेन आणि अॅडव्हान्स्ड परीक्षांचे आयोजन आयआयटी दिल्लीमार्फत केले जाणार आहे.

‘करोना विषाणूच्या संक्रमणामुळे परदेश प्रवास, व्हिसा यावर सध्या बंधने आहेत, त्यामुळे जेईई अॅडव्हान्स्ड २०२० परीक्षा विदेशातील केंद्रांवर आयोजित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परदेशात राहत असलेल्या सर्व पात्र उमेदवारांनी भारतातील परीक्षा केंद्रांची शहरे निवडावीत,’ असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.

याबाबत जेईई अॅडव्हान्स्ड २०२० चे अध्यक्ष सिद्धार्थ पांडे यांनी सांगितले की, ‘या निर्णयामुळे फार मोठा परिणाम होणार नाही. कारण दरवर्षी केवळ १५० च्या आसपास विद्यार्थी हे परदेशात राहणारे असतात. त्यापैकी एकही विद्यार्थी पात्र ठरत नाही.’

पांडे पुढे म्हणाले की, ‘गेल्या ३ वर्षांत केवळ एका विदेशी विद्यार्थ्याला आयआयटीत प्रवेश मिळाला. परदेशी विद्यार्थी भारतात बहुतांशी मास्टर्स किंवा पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी येतात. ते आयआयटीमधील यूजी कोर्स करत नाहीत.’ दरवर्षी एकूण प्रवेशांच्या दहा टक्के जागा परदेशी विद्यार्थ्यांना दिल्या जातात.

आयआयटी मद्रासच्या अकॅडमिक अभ्यासक्रमांचे अधिष्ठाता जगदीश कुमार म्हणाले, ‘या निर्णयाने प्रवेशावर काही परिणाम होणार नाही. मात्र परदेशी विद्यार्थ्यांची संख्या घटल्यानंतर आयआयटींच्या ग्लोबल रॅंकिंगवर याचा परिणाम होणार आहे. आंतरराष्ट्रीय रँकिंग पॅरामीटर्समध्ये विदेशी विद्यार्थ्यांचा पट महत्त्वाची भूमिका बजावतो. परदेशी विद्यापीठांच्या तुलनेत यात भारतीय संस्था मागे पडतात. बांगलादेश, श्रीलंका या शेजारी देशांची आर्थिक स्थिती भारताप्रमाणेच आहे. या देशांमधील विद्यार्थ्यांना तितकेच शुल्क भरावे लागते जितके पाश्चात्य विद्यार्थ्यांना भरावे लागते. त्यामुळे हे विद्यार्थी यूएस, युके सारख्या देशांचा पर्याय निवडतात.

शेजारील देशातील विद्यार्थ्यांसाठी येथील शुल्क कमी केले आणि विद्यार्थ्यांना पार्ट टाइम आणि ऑन कॅम्पस जॉबची संधी दिली तर मोठ्या प्रमाणावर परदेशी विद्यार्थी भारतात शिकायला येतील, असेही कुमार यांनी सांगितले.

सोर्स : म. टा.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड