Japan MEXT Scholarship: भारतीय विद्यार्थ्यांसाठी जपानमध्ये मोफत शिक्षणाची अनोखी संधी! कसलीही फी नाही, विमान प्रवासदेखील मोफत. जपान सरकारने MEXT (शिक्षण, संस्कृती, क्रीडा, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय) शिष्यवृत्ती कार्यक्रम २०२५ साठी अर्ज स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. ही सुवर्णसंधी भारतीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.

जपानमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जपान सरकारने MEXT शिष्यवृत्ती कार्यक्रम २०२५ साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या शिष्यवृत्तीद्वारे पात्र भारतीय विद्यार्थी जपानमध्ये जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकतात. ही शिष्यवृत्ती विशेषतः अशा विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांना जपानी भाषा व संस्कृतीची प्राथमिक माहिती आहे आणि जे जपानमध्ये पदवीपूर्व शिक्षण घेऊ इच्छितात.
या शिष्यवृत्तीचा सर्वात मोठा लाभ म्हणजे जपान सरकार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा १,१७,००० येन (अंदाजे ६३,६०० रुपये) आर्थिक मदत देईल. विद्यार्थ्यांना कोणत्याही अभ्यासक्रमासाठी शुल्क भरावे लागणार नाही. यासोबतच, भारत ते जपान आणि परत येण्यासाठी विमान प्रवासाचा संपूर्ण खर्च देखील जपान सरकार उचलणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















