Japan Jobs Opportunity 2026
राज्यातील तरुणांना जपानमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जपान सरकारशी चर्चा सुरू असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवारी दिली. या संदर्भात पुढील तीन महिन्यांत ठोस निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बुधवारी जपानच्या होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी मंत्रालयात मंत्री लोढा यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. या भेटीत झालेल्या प्राथमिक चर्चेत जपानमध्ये कौशल्यप्राप्त मनुष्यबळाची मोठी गरज असून भारतीय तरुणांसाठी रोजगाराच्या व्यापक संधी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले. या वेळी अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, माधवी सरदेशमुख आदी उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना मंत्री लोढा म्हणाले की, जागतिक पातळीवर भारतीय मनुष्यबळ अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कौशल्य विकासावर विशेष भर देत आहेत. त्याच दिशेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा कौशल्य विकास विभाग कार्यरत असून विविध देशांमध्ये राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विद्याविहार येथील स्वामी विवेकानंद कौशल्य विकास प्रबोधिनीच्या माध्यमातून आवश्यक कौशल्य प्रशिक्षणासोबतच जपानी भाषेचे शिक्षण देण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जपानमध्ये कृषी, वैद्यकीय, तांत्रिक, बांधकाम तसेच सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी असल्याचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी नमूद केले. भारतीय तरुण मेहनती व कार्यक्षम असल्याने त्यांना जगभरात आदराने रोजगाराच्या संधी दिल्या जात असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. सध्या होक्काईडो प्रांतातील आवश्यक मनुष्यबळावर चर्चा झाली असून, पुढील काळात जपानमधील इतर प्रांतांतील संधींचाही आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















