जलसंपदा विभागात ५०० इंजिनीअर्सची भरती

ज्युनिअर इंजिनीअर्स (सिव्हिल)च्या ५०० जागांसाठी महाराष्ट्र जलसंपदा विभागाने अर्ज मागवले आहेत. या सर्व जागा गट ब प्रवर्गासाठी असतील. या पदासाठी शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवार महाराष्ट्र भरती २०१९ च्या आधिसूचनेनुसार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. २५ जुलैपासून अर्ज मागवण्यात आले आहेत.

महत्वाचे मुद्दे –

अधिकृत वेबसाईट: mahapariksha.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ ऑगस्ट २०१९ (11:59 PM)

फी : खुला प्रवर्ग: ₹500/- (राखीव प्रवर्ग: ₹300/-)

शैक्षणिक पात्रता: स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयाची अट: १५ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय असल्यास ५ वर्ष सूट)

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !