ITI Supplementary Exam: ITI पुरवणी परीक्षा लांबणीवर; डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा
ITI Supplementary Exam
ITI Supplementary Exam
ITI Supplementary Exam: ITI Supplementary Exam Postponed Students Facing Technical Trouble. A possible schedule was announced. However, the exams were not conducted as per the fixed schedule. The exam is now said to be held in the first week of December. Further details are as follows:-
प्रशिक्षण महासंचालनालयातर्फे २०१४ ते २०२१ या कालावधीत औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था आयटीआयमध्ये प्रवेश घेतलेल्या, परंतु उत्तीर्ण न होऊ शकलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी २० नोव्हेंबरपासून पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. तसे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मात्र, निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा झाल्या नाहीत. परीक्षा आता डिसेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे सांगण्यात येते.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीची पुरवणी परीक्षा लांबणीवर पडली आहे.
- २०१४पासूनच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना एक संधी म्हणून परीक्षा घेण्यात येत आहे.
- आठ वर्षांत बदललेल्या पॅटर्ननुसार परीक्षा नियोजनात आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे परीक्षांचे वेळापत्रक लांबणीवर गेल्याचे सांगण्यात येते.
- डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
- प्रशिक्षण महासंचालनालयातर्फे २०१४ ते २०२१ या कालावधीत औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था आयटीआयमध्ये प्रवेश घेतलेल्या, परंतु उत्तीर्ण न होऊ शकलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी २० नोव्हेंबरपासून पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
- तसे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मात्र, निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा झाल्या नाहीत.
परीक्षा आता डिसेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे सांगण्यात येते. आयटीआय अभ्यासक्रमाच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा परीक्षा देण्याची संधी असते, परंतु संचालनालयातर्फे विद्यार्थ्यांना विशेष संधी देण्यात आली. त्यानुसार परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया झाली.
ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ऐनवेळी वेळापत्रक लांबल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. परीक्षेचे निश्चित वेळापत्रक अद्याप आले नसल्याचे आयटीआय प्राचार्यांनी सांगितले. हॉलतिकीट सोबत हे वेळापत्रक विद्यार्थ्यांना कळेल असे सांगण्यात येते. पुरवणी परीक्षेला नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.
विविध पॅटर्नमुळे नियोजनात अडचणी
महासंचालनालयामार्फत देण्यात आलेल्या या संधीनुसार वार्षिक पुरवणी परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला हॉलतिकीट विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. परीक्षांचे वेळापत्रक लांबणीचे कारण २०१४ ते २०२१ दरम्यान बदललेले विविध पॅटर्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. सुरुवातीला ऑफलाइन लेखी परीक्षा, सत्र पद्धतीने घेण्यात येत होती. त्यानंतर वार्षिक पॅटर्न आला व परीक्षा ओएमआर शीट पद्धतीने झाली. २०२०पासून परीक्षा ऑनलाइन होत आहे. विविध पॅटर्नचे विद्यार्थी असल्याने त्याबाबतचे नियोजन करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या आता त्या दूर करण्यात आल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले.