ITI मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना शासन सेवेत सामावून घेणार! – DVET ITI Shikshak Bharti 2024

DVET ITI Shikshak Bharti 2024

ITI Shikshak Bharti 2024 (ITI Instructor Bharti 2024)- Nideshak, Shilp Nideshak Recruitment 2024 – As per the latest news received, the recruitment process for the 1457 posts of ITI Instructor recruitment will begin soon 2024. This recruitment will open again after the court hearings. More updates about this ITI Instructor Bharti are given below.

 

राज्यात सध्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये कार्यरत 297 कंत्राटी शिल्पनिदेशकांचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागात सामावून घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मनुष्यबळाची कमतरता भरुन निघण्यास मदत होणार आहे. शासकीय सेवेत सामावण्यात येणाऱ्या 297 पदांकरीता वेतन व इतर भत्यांकरता 16.09 कोटी प्रति वर्ष इतक्या खर्चास सुध्दा यावेळी मान्यता देण्यात आली. तसेच, या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

 

राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसरी व तिसरी पाळी आणि उर्वरित औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसरी पाळी ऑगस्ट, 2010 सत्रापासून यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. येथील सर्व विद्यार्थांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

 


आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्यभरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प निदेशक (आयटीआय क्राफ्ट इन्स्ट्रक्टर) या पदाच्या महिला संवर्गातील ४३६ जागा भरतीला स्थगिती मिळाली आहे. महिला समांतर आरक्षणाच्या मुद्दांवर राज्यातील नऊ उमेदवारांनी मुंबईतील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायाधिकरणाने स्थगितीचा निर्णय दिला आहे.

 

शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय विभागाने ऑगस्ट २०२२ मध्ये शिल्प निदेशक या पदाच्या एकूण १४५७ जागांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली. त्यात महिला संवर्गातील जागांची संख्या ४३६ इतकी आहे. दोन चाळणी परीक्षा झाल्यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी आणि निवड यादी प्रसिद्ध झाली. या दोन्ही यादीमधील महिलांच्या समांतर आरक्षणामध्ये तफावत दिसून आली. निवड यादी समांतर आरक्षणाप्रमाणे लावली नसल्याने पीडित महिला उमेदवारांनी विभागाला वारंवार विनंती अर्ज केले. मात्र, विभागाकडून त्यांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. त्यावर नऊ महिला उमेदवारांनी अॅड. आदित्य रक्ताडे यांच्यातर्फे ‘मॅट’ मध्ये ११ डिसेंबर रोजी याचिका दाखल केली. त्यावर या खटल्याचा निकाल लागेपर्यंत महिला संवर्गातील जागा भरतीला ‘मॅट’ने स्थगिती दिली आहे.

 


‘सीआयटीएस’ प्रशिक्षित विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमाने निवड यादीत स्थान द्यावे. पुरेसे विद्यार्थी उपलब्ध नसतील तर पात्रता यादीत ‘सीआयटीएस’ पात्र विद्यार्थ्यांनंतर ‘नॉन सीआयटीएस’ विद्यार्थ्यांची नावे घ्यावीत, असे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. डी. डोंगरे व सदस्य बिजयकुमार यांनी दिले. महाराष्ट्रातील सर्व विभागातील ‘आयटीआय’मध्ये १,४५७ शिल्प निदेशक व निदेशक यांच्या भरतीसाठी ‘डीव्हीईटी’मार्फत जाहिरात देण्यात आली होती. न्यायाधिकरणाच्या या निर्णयामुळे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. जळगाव आयटीआयमध्ये शिल्प निदेशकाच्या सुमारे २५ जागा रिक्त आहेत.

ऑगस्ट २०२२ मध्ये १,४५७ निदेशक, शिल्प निदेशक पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली; परंतु त्यात ‘सीटीआयएस’ धारक विद्यार्थ्यांना डावलण्याचा प्रयत्न झाला, असा विद्यार्थ्यांचा आक्षेप होता. या जाहिरातीला विद्यार्थी व त्यांच्या संघटनेमार्फत अॅड. संतोष डांबे यांनी आव्हान दिले. शासनातर्फे अॅड. व्ही. आर. भुमकर व ‘डीजीटी’साठी अॅड. डी. बी. गायकवाड यांनी काम पाहिले.

भरण्यासाठी जाहीर केलेली शैक्षणिक पात्रता आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात नमूद केलेल्या पात्रतेला अनुसरून संबंधित जाहिरात नव्हती. त्यामुळे ‘सीआयटीएस’ धारक विद्यार्थी व त्यांच्या संघटनेने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठात ७३ तुकड्यांत जागा रिक्त जळगाव आयटीआयमध्ये २८ ट्रेडच्या ७३ तुकड्या आहेत. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या शिल्प निदेशकांच्या सुमारे २५ जागा रिक्त आहेत.

 

या जागा भरल्या गेल्या तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडणार आहे. तसेच इतर निदेशकांच्या अतिरिक्त कामाचा ताणही कमी होईल, अशी माहिती प्राचार्य एस. एम. पाटील यांनी दिली. दाद मागितली होती. ‘सीआयटीएस प्रशिक्षण हे आयटीआय निदेशक (शिक्षक) यांच्याकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आहे. रिक्त जागा भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने आता गुणवत्ता वाढीसाठी त्याची खऱ्या अर्थाने मदत होईल असे सांगण्यात येते आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड