‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी मुदतवाढ; प्रवेशाचे पुरवणी वेळापत्रक येथे तपासा – ITI Admission 2024
DVET ITI Admissions 2024
DVET ITI Admission Date Extend
DVET ITI Admissions 2024 :राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास येत्या बुधवारपर्यंत (ता. २३) मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी दिलेल्या मुदतीत प्रवेश अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन फेरीत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही मुदतवाढ दिली असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर योजनेंतर्गत ऑगस्ट २०२४ सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने करण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या पुरवणी परीक्षेच्या निकालानुसार नव्याने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. समुपदेशन फेरीत पात्र आणि नव्याने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची एकत्रित गुणवत्ता यादी बुधवारी (ता. २३) रात्री दहा वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. कोणत्याही स्थितीत प्रवेश रद्द करण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध राहणार नाही. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
यापूर्वी ऑगस्ट २०२४ च्या प्रवेश सत्रात कोणत्याही व्यवसायात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्प्रवेश देण्यात येणार नाही, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे संचालक सतीश सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे. समुपदेशन फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्व मूळ कागदपत्रांच्या पडताळणीनंतर संबंधित संस्थेत त्याचदिवशी प्रवेश घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी त्याचदिवशी प्रवेश निश्चित न केल्यास संबंधित जागा दुसऱ्या दिवशी रिक्त समजून प्रवेशासाठी खुल्या करण्यात येतील. तसेच, समुपदेशन फेरीसाठी दिलेल्या कालावधीत खासगी आयटीआयमधील संस्थास्तरीय प्रवेश फेरीनंतर रिक्त असलेल्या जागा देखील प्रवेशासाठी उपलब्ध राहणार आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
प्रवेशाचे पुरवणी वेळापत्रक –
- नव्याने ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे, अर्ज निश्चिती करणे: २३ ऑक्टोबर (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)
- समुपदेशन फेरीसाठी पात्र आणि नव्याने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे आणि विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळविणे : २३ ऑक्टोबर (रात्री १० वाजेपर्यंत)
- विद्यार्थ्यांनी संबंधित आयटीआयमध्ये व्यक्तिशः हजर राहून समुपदेशन फेरीत हजेरी नोंदवावी, या विद्यार्थ्यांची संस्थास्तरावर गुणवत्ता यादी तयार करून प्रसिद्ध करणे, त्यानुसार विद्यार्थ्यांना समुपदेशनासाठी बोलाविणे आणि उपलब्ध प्रवेशाच्या जागांचे वाटप करणे: २४ ते ३० ऑक्टोबर
- अधिक माहितीसाठी संकेतस्थळ https://admission.dvet.gov.in/ – https://www.dvet.gov.in/
DVET ITI Admissions 2024 : कौशल्यपूर्ण शिक्षण देणाऱ्या शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. नियोजित वेळापत्रकानुसार रविवारपर्यंत (दि. ३०) ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत होती. मात्र, आता ही मुदत वाढवली असून ३ जुलैला सायंकाळी पाचपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
चार जुलैला प्राथमिक गुणवत्ता यादीची प्रसिद्धी तर चार व पाच जुलैला गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे, अर्जातील माहितीत बदल करणे ही प्रक्रिया होणार आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प, प्राधान्य सादर करण्याची प्रक्रिया पाच जुलैला सुरू होणार असून सहा जुलैला सायंकाळी पाचपर्यंत ही प्रक्रिया होईल. मराठवाड्यातील १४९ आयटीआयमधील २१ हजार ९४४ जागांसाठी तब्बल ४० हजारांहून अधिक अर्ज आले आहे. नांदेड जिल्ह्यातील आयटीआयमध्ये ४ हजार ६८४ जागा उपलब्ध आहे. त्या खालोखाल लातूर जिल्ह्यात शासकीय आणि खासगी आयीआयमध्ये प्रवेशाच्या ३ हजार ९६४ जागा उपलब्ध आहे. त्यानंतर बिड जिल्ह्यात ३ हजार ४४४, छत्रपती संभाजीनगर २ हजार ८४४, परभणी २ हजार ४१२, धाराशिव २ हजार ९२, जालना येथे १ हजार ५६८, हिंगोलीत ९३६ अशा जागा उपलब्ध आहे.
DVET ITI Admission Last Date 2024
पदविका अभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत राज्यभरात एक लाख २ हजार २१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गुरुवारी (ता. २७) कच्ची गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, त्यावर रविवार (ता. ३०) अखेर हरकत घेण्याची मुदत आहे. दोन जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. मराठवाड्यातील ६० संस्थांमध्ये एकूण १५ हजार ८६५ जागांची प्रवेश क्षमता आहे, त्यासाठी आतापर्यंत २१ हजार ८६६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. दहावीचा निकाल जाहीर होताच तंत्रशिक्षण संचालनालयाने पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रिया २९ मेपासून सुरू केली. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
दहावीनंतर कमी कालावधीत तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम उत्तम पर्याय मानला जातो. तीन वर्षांनंतर नोकरीची संधी मिळत असल्याने विद्यार्थी आणि पालकांची या अभ्यासक्रमाला सर्वाधिक पसंती मिळत आहे. विद्याथ्यर्थ्यांना मंगळवारपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. प्रवेश अर्जाची रक्कम खुल्या गटासाठी ४००, तर राखीव प्रवर्गासाठी ३०० रुपये आहे. सर्व शासकीय, अनुदानित व खासगी पॉलिटेक्निक प्रवेशासाठी एकूण ४५ सुविधा केंद्रे आहेत. दोन जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर संस्था आणि अभ्यासक्रम निवडण्याच्या (कंप राउंड) फेऱ्या होतील. त्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. यावर्षीही कॅप राउंडच्या तीन फेऱ्या होणार आहेत. गतवर्षीपासून मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) माध्यमातून अध्यापनाचा पर्याय निवडक पॉलिटेक्निकमध्ये उपलब्ध आहे.
यावर्षी नवीन अभ्यासक्रम
पॉलिटेक्निकमध्ये कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल चा पारंपरिकसह आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, मेका ट्रॉनिक्स, डाटा सायन्स रोबोटिक्स ऑटोमेशन, आयओटी असे नवे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अलीकडे खास करून पॉलिटेक्निक करून पदवी शिक्षण घेणाऱ्यांना अभ्यास सोपा जात असल्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.
- मराठवाड्यात एकूण संस्था ६० (शासकीय १०, खासगी ५०).
- मराठवाड्यात एकूण २१ हजार ८६६ विद्यार्थ्यांची नोंदणी.
- कच्ची गुणवत्ता यादी २७ जूनला जाहीर होणार.
- हरकत घेण्याची मुदत ३० जूनअखेर.
- अंतिम गुणवत्ता यादी दोन जुलैला जाहीर होणार
DVET ITI Admission Process 2024
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया दि. ३ जूनपासून सुरू करण्यात आलेले असून, दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. ३० जूनपर्यंत http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक आर. एस. मुंडासे यांनी केले आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाइन स्वरूपात वरील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावेत. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यभरात एकूण ८५ व्यवसाय उपलब्ध असून, एक लाख ५४ हजार ९३२ एवढ्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जादा मागणीच्या, तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ६५२ नवीन अभ्यासक्रमाच्या तुकड्या सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच, जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह ५०० रुपये विद्यावेतन देण्यात येते. विविध प्रवर्गांच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यात आलेली आहे.
ITI Admissions 2024 Process
Institute (ITI) admission process has started. Applications are being submitted online. There are 1080 seats for 24 trades. This process is going to be implemented for that. It is estimated that a record number of applications will be filed this year.
Directorate of Vocational Education and Training has started online application process from 3rd June. After the results of 10th, the students focus on it. Employment opportunities from traditional education are less.
ITI DVET Admission 2024 – Centralized Online ITI Admission Process – 2024 व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार सोमवार (दि. 3) पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. दहावीच्या निकालानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाची प्रक्रिया कधी होणार, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून राहिले होते. नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील शासकीय व खासगी मिळून 52 आयटीआयमधील सुमारे 6 हजारांहून अधिक प्रवेश जागांसाठी ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.
आयटीआयच्या इलेक्ट्रिशियन, फीटर, मॅकेनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडशनिंग, कॉम्प्युटर ऑपरेटर, वेल्डर यासह महिलांसाठी कॉस्मॉटॉलॉजी, फूड अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, सुईंग टेक्नॉलॉजी आदी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा कल असतो. कोल्हापूर शासकीय आयटीआयमध्ये विविध 31 ट्रेडच्या सुमारे 1,340 जागा उपलब्ध आहेत, अशी माहिती शासकीय आयटीआयचे प्राचार्य एम. एस. आवटे यांनी दिली. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रिया अशी
जुलैपर्यंत ■ पहिली प्रवेश फेरी: १५ जुलै ते १९ दुसरी प्रवेश फेरी २८ जुलै ते २ ऑगस्ट
• ऑनलाईन अर्ज करणे : ३ जून ते ३० जून ■ प्रवेश अर्ज निश्चित करणे: ५ जून ते १ जुलै
• अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : ७ जुलै
■ तिसरी प्रवेश फेरी: १० ऑगस्ट ते १४ ऑगस्ट
■ चौथी प्रवेश फेरी: २१ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट
• संस्थास्तर समुपदेश फेरी २९ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट
आवश्यक कागदपत्रे : शाळा सोडल्याचा दाखला, दहावीची गुणपत्रिका, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, दिव्यांग/सैन्यदल/अल्पसंख्यांक प्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, इत्यादी.
ITI Admission 2024 Schdule Timetable Imortant Dates
प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज करणे, अर्जात दुरुस्ती 3 ते 30 जून
प्रवेश अर्ज निश्चित करणे 5 जून ते 1 जुलै
पहिल्या फेरीसाठी प्राधान्यक्रम सादर करणे 5 जून ते 2 जुलै
प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध 4 जुलै
गुणवत्ता यादीवर हरकती नोंदवणे 4 ते 5 जुलै
अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध 7 जुलै
पहिली प्रवेश फेरी 14 जुलै
दुसरी प्रवेश फेरी 15 ते 19 जुलै
तिसरी प्रवेश फेरी 28 जुलै ते 2 ऑगस्ट
संस्थास्तर समुपदेश फेरी 26 ऑगस्ट
पूर्ण माहिती आणि वेळापत्रक डाउनलोड करा
DVET ITI अर्ज प्रक्रिया
ITI Admissions 2024: आयटीआयचे प्रवेश यंदा ३ जूनपासून ऑनलाईन स्वरूपात होणार आहेत. या प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक येत्या दोन दिवसांत जाहीर केले जाणार आहे. यावर्षी ४१८ शासकीय आयटीआयमध्ये ९२ हजार ३६४ व ६०८ अशासकीय आयटीआयमध्ये ५६ हजार २०४ अशा एकूण १ लाख ४८ हजार ५६८ जागांवर प्रवेश होणार आहेत. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाअंतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे ही प्रवेशाची प्रक्रिया संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत. यावर्षी प्रवेशासाठी उपलब्ध व्यवसायांची संख्या ८० असून त्यामध्ये पारंपारिक इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, वेल्डर यासारख्या लोकप्रिय व्यवसायांबरोबरच गतवर्षी एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर तसेच ड्रोन टेक्निशियन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे.
गतवर्षी राज्यात ४१७ संस्थात १ लाख ४२ हजार ५०० जागा उपलब्ध होत्या. प्रवेशाच्या सहा फेऱ्या झाल्या होत्या. शासकीय आयटीआय मधील ९३ हजार ४८४ जागावर ८९ हजार ३८३ प्रवेश झाले होते तर खासगी आयटीआयमध्ये ४९ हजार १६ जागापैकी ३५ हजार ६६९ जागावर प्रवेश झाले होते. एकूण १ लाख ४२ हजार ५०० जागांवर १ लाख २८ हजार १७१ प्रवेश झालेले होते. गतवर्षी २ टक्के प्रवेश अधिक झाले होते. तर मुलींनी गेल्या पाच वर्षातील तुलनेत अधिक प्रवेश घेतले. गतवर्षी २२ हजार ८२४ मुलींनी आयटीआयला प्रवेश घेतले होते.
उपलब्ध जागांपैकी ३० हजारहून जागा मुलींसाठी राखीव
यंदा आयटीआय संस्थामधील यावर्षीच्या उपलब्ध जागांपैकी ३० हजारहून जागा मुलींसाठी राखीव असून इतर प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार मराठा विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा असणार आहेत. यंदा विभागनिहाय एकूण जागापैकी सर्वाधिक जागा नाशिक विभागातील आयटीआयमध्ये ३० हजार ८१६ जागा उपलब्ध आहेत. त्या खालोखाल पुणे विभागामध्ये शासकीय आणि खाजगी आयटीआय मध्ये २९ हजार प्रवेशाच्या २४८ जागा उपलब्ध आहेत. नागपूर विभागात २७ हजार ४०८ आणि मुंबई, औरंगाबाद, अमरावती विभागामध्ये प्रत्येकी २० हजाराहून अधिक जागा आहेत.
यंदा काय बदल?
• विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना मूळ कागदपत्रे सादर करुन आपला प्रवेश कन्फर्म करावा लागतो. त्यामुळे आता अर्ज भरताना प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी नजीकच्या कोणत्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहणार हे सांगावे लागणार आहे. त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातील पाठपुरावा त्या आयटीआयची यंत्रणाही करणार आहे.
• प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नोंदवलेला दूरध्वनी क्रमांक
आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत तोच ठेवावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना केंद्राच्या संकेतस्थळावर माहिती अपलोड करताना हा मोबाईल क्रमांक लॉगीन असणार आहे. त्यामुळे हॉल तिकीट, परीक्षा विषयक माहिती, तसेच अंतिम प्रमाणपत्र प्राप्त करणे यासाठी आवश्यक असणार आहे. यामुळे हा दूरध्वनी क्रमांक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे अर्जावर काळजीपूर्वक मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे.
ITI Stipend 2024
ITI Admissions 2024 : Students belonging to Scheduled Castes, Scheduled Tribes, Freed Castes and Nomadic Tribes, Other Backward Classes, Special Backward Classes, Minority Communities, as well as Economically Backward Sections of the Open Category were earlier given a tuition fee of Rs 40 per month. It has now been reduced to Rs.500. This decision has been taken in the state cabinet and the government decision will be published soon. Check ITI Admissions 2024 at below:
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक समाज, तसेच खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागास घटकातील विद्यार्थ्यांना यापूर्वी मासिक ४० रुपये विद्यावेतन दिले जात होते. ते आता ५०० रुपये करण्यात आले आहे. हा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला असून, लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध केले जाणार आहे.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना पूर्वी ५०० रुपये विद्यावेतन दिले जात होते. तसेच इतर एससी ६० रुपये, ओबीसी व इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० रुपये रुपये महिना विद्यावेतन दिले जात होते. आता सर्वच प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ५०० रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.
सप्टेंबर महिन्यापासून अमलबजावणी
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन चाळीस वर्षापासून केवळ ४० रुपये एवढे आहे. वाढती महागाई पाहता ते अपुरे आहे. त्यामुळे विद्यावेतनात वाढ करावी, अशी मागणी विद्यार्थ्याकडून वारंवार होत होती. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाने त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर महिन्यापासून अमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयला प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती व भटक्या जमाती व इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक समाज आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया मागास घटकातील विद्यार्थ्यांना विद्यावेतनाचा लाभ मिळणार आहे
जिल्ह्यांत साडेपाच हजार विद्यार्थी
कोणाला मिळणार लाभ? शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयला प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती व भटक्या जमाती व इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक समाज आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया मागास घटकातील विद्यार्थ्यांना विद्यावेतनाचा लाभ मिळणार आहे.
ITI Tuition Fee
ITI Admissions 2023 : We are going to start a career helpline soon for the students of Government Industrial Training Institute, also for all Scheduled Tribes, Freed Castes, Nomadic Tribes, Other Backward Classes, Special Backward Classes, Minorities, Open Category Economically Backward category trainees whose parents’ annual income is within the limit of 8 lakhs. Skill Development Minister Mangal Prabhat Lodha gave an answer in the Legislative Council that he will start the 500 rupees tuition fee by September 2023.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी करिअरविषयक हेल्पलाईन लवकरच सुरू करणार आहोत, तसेच सर्व अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील प्रशिक्षणार्थी यांना ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखाच्या मर्यादेत आहे. त्यांना ५०० रूपये विद्यावेतन सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरू करणार असल्याचे उत्तर कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत दिले.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना करिअर विषयक संधीची माहिती देण्याकरिता कायमस्वरूपी हेल्पलाईन व ईमेल सुरू करण्याबाबत विधानपरिषद सदस्य उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना मंगल प्रभात लोढा बोलत होते.
कौशल्यविकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मेळावे राज्यात २८८ मतदारसंघातील २६० ठिकाणी शिबीर पार पडले. यामध्ये १ लाख ७४ हजार युवक युवतींनी सहभाग घेतला, यामध्ये १५ हजार ४९३ पालकांनी सहभाग घेतला. तसेच ज्या आस्थापनांमध्ये नोकरभरती होणार आहे, त्यासाठीदेखील समन्वय साधून रोजगाराची संधी निर्माण व्हावी, यासाठी जॉब कार्डबाबतही माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल. पुणे व ठाणे येथे इंडस्ट्री मीट घेतली होती, अशी माहिती कौशल्यविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
या चर्चेत विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.
Maharashtra ITI Admissions 2024 @admission.dvet.gov.in
ITI Admissions 2023: The admission process in the industrial training institutes has been started from 12th June 2023 and the interested students who have passed or failed the 10th must go to the website admission.dvet.gov.in and submit the application form online till 11th July 2023. Information booklet of standardized procedure prepared for admission in industrial training institute has been made available in online form on the website.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया दिनांक १२ जून २०२३ पासून सुरू करण्यात आलेली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन दिनांक ११ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यभरात एकूण ८५ व्यवसाय उपलब्ध असून १५४९३२ एवढ्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जादा मागणीचे तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ६५२ नवीन अभ्यासक्रमाच्या तुकड्या सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. विविध प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यात आलेली आहे. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. तरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआयतून व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआयमध्ये प्रवेश घ्यावे, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.
DVET ITI Admissions 2024 @admission.dvet.gov.in
Admissions to government Industrial Training Institutes (ITIs) in the state will begin from Monday (June 12). The first admission list will be announced on July 20 and the admission will begin. Students can apply through the website https://admission.dvet.gov.in. – Centralized Online ITI Admission Process – 2023 केंद्रीय ऑनलाईन आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया – 2023
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाची सुरवात सोमवारपासून (१२ जून) होणार आहे. २० जुलैला प्रवेशाची पहिली यादी जाहीर होऊन प्रवेश घ्यायला सुरवात होईल. विद्यार्थ्यांना https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे. आयटीआय प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक पात्रता असलेल्या १४ वर्षांवरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी पात्र असणार आहे. या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज, नोंदणी शुल्क भरणे, पसंतीच्या ‘आयटीआय’ची निवड करणे, अर्जात दुरुस्ती व हरकती नोंदविण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यातील ४१८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ९५ हजार ३८० आणि ५७४ खासगी ‘आयटीआय’मध्ये ५९ हजार १२ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश (मुलींसाठी एकूण ५३ हजार ६०० जागा राखीव) मिळणार आहे. १२ जूनपासून प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार असून १ सप्टेंबरपर्यंत प्रवेशाचे टप्पे पूर्ण होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
दहावीनंतर पुढे शिकून तर कोठे सरकारी नोकरी लागणार आहे, असा भविष्याचा विचार करून अनेकजण ‘आयटीआय’कडे वळत असल्याची वस्तुस्थिती आहे. आता अकरावीसह तंत्रनिकेतनचे (अभियांत्रिकी डिप्लोमा) देखील प्रवेश सुरु आहेत. त्यामुळे कोणत्या प्रवेशाला विद्यार्थ्यांची पसंती सर्वाधिक राहिली, विद्यार्थ्यांचा कल काय आहे हे ऑगस्टमध्ये स्पष्ट होणार आहे.
ITI Admission Schedule 2023 Timetable
ITI प्रवेशाचे वेळापत्रक
- ऑनलाइन अर्जाची सुरवात : १२ जून ते ११ जुलै
- पहिल्या फेरीसाठी संस्था पसंतीक्रम : १९ जून ते १२ जुलै
- अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : १६ जुलै
- पहिली प्रवेश फेरी : २० जुलै
- द्वितीय प्रवेश फेरी : ३१ जुलै
- दुसऱ्या यादीनुसार प्रवेश : १ ते ४ ऑगस्ट
- तिसरी प्रवेश फेरी : ९ ऑगस्ट
- चौथी प्रवेश फेरी : २० ऑगस्ट
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून एक-दोन वर्षाचा ट्रेड (कोर्स) पूर्ण करून दहावीनंतर लगेचच खासगी नोकरीत पदार्पण करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षी साधारणतः: एक लाख तरुण-तरुणी ‘आयटीआय’ला प्रवेश घेतात. ‘आयटीआय’च्या माध्यमातून एकूण ८२ प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामध्ये फिटर व इलेक्ट्रिशन या दोन कोर्सला सर्वाधिक मागणी असून दरवर्षी त्या ट्रेडचे १०० टक्के प्रवेश हाऊसफुल होतात.
ITI Admissions 2023 : The latest update for failed ITI students. Opportunity For Failed Students In Industrial Training Institute. The Annual Supplementary Examination will be conducted through Computer Based Test (CBT) mode. The list of eligible students for the examination will be published on the website of the National Council of Education Research and Training by November 10. Hall tickets will be available between 25th to 25th of November 2022. Further detail are as follows:-
Opportunity For Failed ITI Students
वार्षिक पुरवणी परीक्षा संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वेबसाइटवर १० नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रवेशपत्र २० ते २५ नोव्हेंबर या काळात उपलब्ध होणार आहेत. अधिक माहिती https://ncvtmis.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) २०१४ ते २०२१ या प्रवेश सत्रात प्रवेश घेतलेल्या मात्र परीक्षांमध्ये अनुतीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रशिक्षण महासंचालनालयामार्फत अखिल भारतीय व्यवसाय सत्र व वार्षिक पुरवणी परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
- त्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी १० नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
- वार्षिक पुरवणी परीक्षा संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने घेतली जाणार आहे.
- परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वेबसाइटवर १० नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
- प्रवेशपत्र २० ते २५ नोव्हेंबर या काळात उपलब्ध होणार आहेत.
- अधिक माहिती https://ncvtmis.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अधिकाधिक प्रशिक्षणार्थ्यांनी वार्षिक पुरवणी परीक्षेत सहभागी व्हावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.
‘आयटीआय’साठी अखेरची संधी
राज्यभरातील खासगी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थींच्या अध्ययनास महिना उलटला आहे. मात्र, अजूनही रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. नवी दिल्ली येथील प्रशिक्षण महासंचालनालयाच्या (डीजीटी) आदेशानुसार ३० ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
- ‘डीजीटी’च्या निर्देशानुसार, देशभरातील सर्व राज्यांमध्ये ‘आयटीआय’ची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते.
- महाराष्ट्रातील सुमारे दीड लाख जागांसाठी १५ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
- दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण उमेदवारांसाठी राज्य परीक्षा मंडळाकडून पुरवणी परीक्षा घेण्यात आली.
- यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाही आयटीआयमध्ये प्रवेशाची संधी मिळावी, या उद्देशाने राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (डीव्हीईटी) पुरवणी प्रवेश वेळापत्रकही जाहीर केले.
Maha ITI App For DVET ITI Admission 2024
DVET ITI published a MahaITI App on Google Play store for tracking your Admission Status & Application process. You can Download this App For Applying the DVET ITI Admission 2022. Candidates who have registered themselves for admissions on Admission Portal via http://admission.dvet.gov.in can access their Admission Status, Submit Option Form, Search ITI, Check Merit Number, Check Allocation, Download Application Form, Allotment Letter and Admission Confirmation Slip and many other features.
List of Required Documents For Admission
The applicants have to carry all these required documents and certificates at the time of admission.
- Seat allotment letter.
- Birth certificate.
- SSC (Class X) mark sheet and certificate.
- HSC certificate.
- Domicile certificate.
- Caste or category certificate.
- School leaving certificate.
- Two passport size photographs (must be recent).
- Address proof.
Table of Contents
iti 2020 che paper kadhi honar aahet
No problem
Iti exam kadhi honar
Online admission form due date
2020 te 2021 che pepar kadhi honar aahet