ITI Admission 2022 – ITI दुसऱ्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर!!

ITI Admissions 2022 

ITI Admissions 2022 @admission.dvet.gov.in

ITI Admissions 2022  : Industrial Training Institute has been declared the ITI Admission Second Round Timetable. There are a total of 44.11% of students confirm their admissions. 92 thousand 140 students got allotment for the first regular round. Out of them, 40 thousand 710 students have taken admission. Further details are as follows:-

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाच्या पहिल्या फेरीत निवड झालेल्यांपैकी ४४.११ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. पहिल्या नियमित फेरीसाठी ९२ हजार १४० विद्यार्थ्यांना ॲलॉटमेंट मिळाली होती. त्यापैकी ४० हजार ७१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेशाची पहिल्या फेरीतील प्रक्रिया पूर्ण झाली असून पहिल्या फेरीत ९२ हजार १४० विद्यार्थ्यांना ॲलॉटमेंट मिळाली होती. यामध्ये शासकीय आयटीआयमधील ७५ हजार ७९९, तर खासगी आयटीआयमधील १६ हजार ३४१ विद्यार्थ्यांना ॲलॉटमेंट जाहीर झाली होती. त्यातील  शासकीय आयटीआयमध्ये ३१ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी (४१.५२ टक्के), तर खासगी आयटीआयमध्ये नऊ हजार २३७ विद्यार्थ्यांनी (५६.५२ टक्के) प्रवेश निश्चित केला आहे.

ITI Admission Second Round Timetable

दुसऱ्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक :

तपशील : कालावधी

 • – संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळविणे : ६ ऑगस्ट (सायंकाळी ५ वाजता)
 • – दुसरी फेरीत निवड झालेल्या संस्थेत विद्यार्थ्यांनी सर्व मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थिती राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे : ८ ते १२ ऑगस्ट

‘आयटीआय’ पहिल्या फेरीत प्रवेश घेतलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या –

तपशील : शासकीय आयटीआय : खासगी आयटीआय : एकूण आयटीआय

 • – ॲलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या : ७५,७९९ : १६,३४१ : ९२,१४०
 • – प्रवेश निश्चित केलेले : ३१,४७३ : ९,२३७ : ४०,७१०
 • – प्रवेश घेतलेल्यांची टक्केवारी : ४१.५२ टक्के : ५६.५२ टक्के : ४४.१८ टक्के

पहिल्या फेरीतील पुणे विभागातील प्रवेशाची आकडेवारी :

तपशील : शासकीय आयटीआय : खासगी आयटीआय : एकूण आयटीआय

 • – ‘ॲलॉटमेंट’साठी उपलब्ध जागा : १७,५६४ : १४,१२४ : ३१,६८८
 • – ॲलॉटमेंट मिळालेल्या जागा : १४,१२१ : ४,४१२ : १८,५३३
 • – प्रवेश घेतेलेल्यांची संख्या : ५,९६४ : २,५५६ : ८,५२०

सर्वाधिक जागा असणाऱ्या ट्रेडमध्ये पहिल्या फेरीत झालेले प्रवेश

ट्रेड : झालेले प्रवेश : प्रवेशाची टक्केवारी

 • इलेक्ट्रिशियन: ८,५३८ : ६३.२४ टक्के
 • फिटर :४,७३८ : ४५.६१ टक्के
 • वेल्डर : ३,५३५ : ३३.६८ टक्के
 • कॉम्प्युटर ऑपरेटिंग ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट : २,८१० : ४२.१० टक्के
 • मेकॅनिक डिझेल : २,५३२ : ४७.१२
 • मेकॅनिक मोटर व्हेईकल : २,५३९ : ५१.८८ टक्के
 • इलेट्रॉनिक्स मेकॅनिक : १,३२९ : ४१.६८

ITI Admissions 2022 


ITI Admission 2022 – ITI प्रवेशाला 27 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

ITI Admissions 2022  : The extension till 27th Of August 2022 for ITI Admission by Industrial Training Institute, ITI. Interested and eligible candidates apply before the last date. For more details visit https://admission.dvet.gov.in/. Further details are as follows:-

मुंबई विभागातील ७ जिल्ह्यात ६७ शासकीय आयटीआय असून यामध्ये ४९ सर्वसाधारण आयटीआय, ३ महिलांकरिता आयटीआय, १० आदिवासी आयटीआय, २ अल्पसंख्याक आयटीआय, ३ आदिवासी आश्रमशाळा आहेत. याशिवाय मुंबई विभागात ३९ खासगी आयटीआय आहेत. शासकीय व खासगी आयटीआयमध्ये २० हजार १८४ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

 • औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (Industrial Training Institute, ITI) प्रवेशाकरीता २७ ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून मुंबई विभागातील इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रदीप दुर्गे यांनी केले आहे.
 • मुंबई विभागाच्या वतीने मुलुंड आयटीआय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई विभाग सहसंचालक यांच्यावतीने ही माहिती देण्यात आली.
 • विविध व्यवसायनिहाय प्रवेशासाठी उपलब्ध जागा तसेच व्यवसाय अभ्यासक्रमाची माहिती व प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती विभागाच्या www.dvet.admission.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे.
 • विहीत मुदतीत प्रवेश अर्ज सादर करु न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती (एडीट) करणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे यासाठी संकेतस्थळावर १ ते २७ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

मुंबई विभागातील ७ जिल्ह्यात ६७ शासकीय आयटीआय असून यामध्ये ४९ सर्वसाधारण आयटीआय, ३ महिलांकरिता आयटीआय, १० आदिवासी आयटीआय, २ अल्पसंख्याक आयटीआय, ३ आदिवासी आश्रमशाळा आहेत. याशिवाय मुंबई विभागात ३९ खासगी आयटीआय आहेत. शासकीय व खासगी आयटीआयमध्ये २० हजार १८४ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विविध व्यवसायनिहाय प्रवेशासाठी उपलब्ध जागा तसेच व्यवसाय अभ्यासक्रमाची माहिती व प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती विभागाच्या www.dvet.admission.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • २९ जुलै २०२२ पर्यंत केंद्रीय ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाकरीता मुंबई विभागातील एकूण ६७ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील १२ हजार ३९४ उमेदवारांना प्रवेश वाटप करण्यात आले असून १ ऑगस्टपर्यंत २ हजार १५७ उमेदवारांनी प्रवेश निश्चित केले आहेत.
 • पहिल्या फेरीतील प्रवेश ३ ऑगस्ट पर्यंत निश्चित करण्याबाबत उमेदवारांना आवाहन करण्यात आले आहे.
 • विविध व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया ५ फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे.
 • प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी प्रवेश निवड यादी व अन्य माहितीकरीता विभागाच्या संकेतस्थळास भेट द्यावी.
 • आयटीआयमधील सर्व व्यवसायांसाठी एकूण उपलब्ध जागांच्या ३० टक्के जागा महिला उमेदवारांकरीता राखीव आहेत.
 • तसेच विभागातील २ अल्पसंख्याक आयटीआयमध्ये ७० टक्के जागा अल्पसंख्याक समूहाकरीता उपलब्ध आहेत.
 • आदीवासी समूहाकरीता १० संस्थांमध्ये ७५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

अधिकृत वेबसाईट – admission.dvet.gov.in


ITI Admission 2022 – ITI प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जाहीर

ITI Admissions 2022  : Industrial Training Institute has been declared the ITI Admission process first list. As many as 92 thousand 140 students have been selected for admission in the first list. Further details are as follows:-

राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या (Industrial Training Institute) प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी (Entrance Process ITI) काल शुक्रवारी जाहीर करण्यात आली असून पहिल्या यादीत तब्बल 92 हजार 140 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना आता 3 ऑगस्टपर्यंत प्रवेश (3 August Last Date Of ITI Admissions) घ्यावे लागणार आहेत. पहिल्या प्रवेशफेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत विद्यार्थ्यांनी 30 जुलैपासून 3 ऑगस्ट, सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशा सूचना संचालनालयाने केल्या आहेत.

 • आयटीआयमध्ये 1 लाख 49 हजार 292 जागा
 • त्यापैकी शासकीय आयटीआयमध्ये 93 हजार 676
 • खासगी आयटीआयमध्ये 55 हजार 616 जागा
 • या जागांवर प्रवेशासाठी यंदा 3 लाख 8 हजार 439 इतक्या विद्यार्थ्यांची नोंदणी
 • त्यापैकी 2 लाख 48 हजार 796 विद्यार्थ्यांनी ट्रेड ऑप्शन भरले
 • पहिल्या यादीत 92 हजार 206 विद्यार्थ्यांना प्रवेश, यामध्ये 75 हजार 799 शासकीय जागांवर तर 16 हजार 341 खासगी आयटीआयच्या जागांवर प्रवेश निश्चित

व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिध्द

 • प्रथम प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
 • तसेच विद्यार्थ्यांना निवड पत्र त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे.
 • प्रथम प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे.
 • पसंतीक्रमांच्या प्रथम विकल्पानुसार जागा मिळाल्यास त्या विद्यार्थ्यांला प्रवेश निश्चित करावा लागेल.
 • अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पुढील प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही.

राज्यातील विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला

आयटीआय प्रवेशासाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पहिल्या यादीत विद्यार्थ्यांना प्रवेश मोठ्या संख्येने मिळाले आहेत. दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत असं व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी म्हटले आहेत.


ITI प्रवेशासाठी चार फेऱ्या; सविस्तर वेळापत्रक जाहीर – ITI Admissions 2022 

ITI Admissions 2022 : Industrial Training Institute, ITI has bee announced the schedule of admission rounds in the admission process for courses. The merit list will be declared on the 28th of July 2022 & the first admission round will start on the 29th of July 2022. Further details are as follows:-

संचालनालयातर्फे राज्यातील शासकीय, खासगी आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू आहे. १७ जूनपासून ऑनलाइन नोंदणीसह कागदपत्र छाननी, अर्जातील दुरूस्ती, अर्ज निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होऊन महिना होत आला तरी पुढील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झालेल नव्हते. या प्रक्रियेच्या वेळापत्रकाकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष होते.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (Industrial Training Institute, ITI) अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक मंगळवारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले.
 • ऑनलाइन अर्ज, दुरूस्ती, अर्ज निश्चितीसाठी २३ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
 • यंदा प्रवेशाच्या चार फेरी असणार आहेत.
 • २८ जुलैला गुणवत्ता यादी जाहीर होईल व पहिल्या प्रवेश फेरीला २९ जुलैपासून सुरुवात होणार असून हा टप्पा पाच सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
 • संचालनालयातर्फे राज्यातील शासकीय, खासगी आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू आहे.
 • १७ जूनपासून ऑनलाइन नोंदणीसह कागदपत्र छाननी, अर्जातील दुरूस्ती, अर्ज निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे.
 • दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होऊन महिना होत आला तरी पुढील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झालेल नव्हते.
 • या प्रक्रियेच्या वेळापत्रकाकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष होते.
 • संचालनालयाने सविस्तर वेळापत्रक जाहीर केले.

आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा कल अधिक असतो. करोनामुळे मागील दोन वर्षे प्रक्रिया लांबली, यंदा प्रक्रिया दहावीच्या निकालाच्या दिवशी सुरू झाली, परंतु प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक महिनाभर लांबले होते. अखेर पुढील वेळापत्रक जाहीर झाल्याने प्रक्रियेला गती येईल असे सांगण्यात येते. प्रवेश प्रक्रियेत २३ जुलै विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.

Important Dates For ITI Admission

 • अर्ज निश्चितीनंतर प्रथम फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य २२ ते २३ जुलै दरम्यान ऑनलाइन नोंदवावे लागतील.
 • त्यानंतर प्रथम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे
 • . विद्यार्थ्यांना दोन दिवस तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील हरकती नोंदविण्यासाठी देण्यात आले आहेत.
 • २८ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
 • त्यानंतर निवड यादी व प्रत्यक्ष प्रवेश फेरीला २९ जुलैपासून सुरुवात होणार आहे.
 • प्रवेशाच्या चार फेरीनंतर संस्थास्तरावरील समुपदेशन फेरी होणार आहे.
 • प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणार आहे.

ITI Admission Timetable

असे आहे वेळापत्रक

 • ऑनलाइन अर्ज नोंदणी, निश्चिती २३ जुलैपर्यंत पहिल्या फेरीसाठी विकल्प, प्राधान्य २४ जुलैपर्यंत
 • तात्पुरती गुणवत्ता यादी २५ जुलै, सकाळी ११ वा. यादीवरील आक्षेप, हरकती २५ व २६ जुलै अंतिम गुणवत्ता यादी २८ जुलै सायं. ५ वा.
 • पहिली प्रवेशफेरी निवड यादी २९ जुलै सायं. ५ वा.
 • निवड यादीतील प्रत्यक्ष प्रवेश ३० जुलै ते ३ ऑगस्ट
 • दुसरी प्रवेश फेरी विकल्प व प्राधान्य ३० जुलै ते ३ ऑगस्ट दुसऱ्या फेरीची निवड यादी ६ ऑगस्ट सायं. ५ वा. दुसऱ्या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश ८ ते १२ ऑगस्ट
 • तिसऱ्या फेरीसाठी विकल्प व प्राधान्य ८ ते १२ ऑगस्ट तिसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर १६ ऑगस्ट सायं. ५ वा.
 • तिसरी फेरी पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश १७ ते २० ऑगस्ट चौथ्या फेरीसाठी विकल्प व प्राधान्य सादर करणे १७ ते २० ऑगस्ट
 • चौथी फेरी निवड यादी २३ ऑगस्ट सायं. ५ वा.
 • नव्याने ऑनलाइन अर्ज करणे १ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट संस्थास्तरीय समुपदेशन फेरीची सुरुवात २९ ऑगस्टपासून
 • प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

यंदाही प्रवेशाच्यासाठी चार फेऱ्या आहेत. त्यानंतर समुपदेशन फेरी आहे. काही कारनाने ऑनलाइन नोंदणी केली नसेल, तर अशांना नवीन नोंदणीची संधीही देण्यात येते. करोनानंतर यंदा कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चितीची प्रक्रिया आयटीआय संस्थेमध्ये होत असल्याने प्रक्रियेतील त्रुटी कमी होतील अशी प्रतिक्रिया औरंगाबाद विभागाचे प्रवेश प्रक्रिया समन्वयक, निरीक्षक देविदास राठोड यांनी दिली.


ITI Admissions 2022 

ITI Admissions 2022 : There are a total of 1 Lakh 49 Thousand vacancies available in State ITI. The first merit list will be available on the 25th of July 2022 & the final merit list will be available on the 28th of July 2022. For more details about ITI Admission, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

राज्यात आयटीआयच्या एकूण १ लाख ४९ हजार जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी मंगळवारपर्यंत तीन लाख १४ हजार ५३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून,२५ जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी तर पहिली अंतिम गुणवत्ता यादी येत्या २८ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर संचालनालयाने मंगळवारी आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले असून, विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्याची माहिती संचालक दिगंबर दळवी यांनी दिली. या प्रवेश प्रक्रियेत एकूण ४ प्रवेशफेन्या, संस्थास्तरीय समुपदेशन फेरी, खासगी संस्थेतील प्रवेशफेरी अशा फेऱ्या पार पडणार आहेत.

तीन लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

राज्यात ४१९ शासकीय आयटीआय, तर ५७२ खासगी आयटीआय आहेत. शासकीय व खासगी आयटीआयमध्ये मिळून १ लाख ४९ हजार २६८ जागा उपलब्ध आहेत. राज्यातील ३ लाख १४ हजार ५३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केले. त्यातील २ लाख ९२ हजार ७५८ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरला असून, २ लाख ८८ हजार ८३५ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपला अर्ज निश्चित केला. तर २ लाख १३ हजार ७९४ विद्यार्थ्यांनी कागदपत्रे सादर करून अर्ज निश्चित केला आहे.२ लाख ४२६ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत.

ITI Admissions 2022 


How to Apply Online for DVET ITI Admission 2022 – 2023

 

ITI Admission 2020 Details Registration

प्रवेशाबाबत महत्त्वाचे –

 • प्रवेश अर्ज भरल्यानंतर प्रवेश शुल्क ऑनलाईन भरावे.
 • हे शुल्क भरल्यानंतर प्रवेश निश्‍चित होणार आहे.
 • प्रमाणपत्रे तपासणी, प्रवेश निश्‍चितीसाठी संस्थेत येण्याची गरज नाही.
 • प्रवेश अर्ज शुल्कानंतर अर्जात कोणतेही बदल करता येणार नाहीत.
 • प्राथमिक गुणवत्ता यादीनंतर माहितीत बदलाची सुविधा ऑनलाईन.

Maha ITI Admission Application Fee 2022

Candidates should have to make the payment of application fee through online mode and the application fee is

 • Unreserved category (UR)- Rs.150/-
 • Reserved category – Rs.100/-
 • Candidates from outside Maharashtra state- Rs.300/-
 • Non-Residential Indians (NRIs)- Rs.500/-

Helpline Number (From 10:00 AM to 06:00 PM)
8104-493-361, 8104-460-640, 9108-259-812

 

Maha ITI App For DVET ITI Admission 2022

DVET ITI published a MahaITI App on Google Play store for tracking your Admission Status & Application process. You can Download this App For Applying the DVET ITI Admission 2022.  Candidates who have registered themselves for admissions on Admission Portal via http://admission.dvet.gov.in can access their Admission Status, Submit Option Form, Search ITI, Check Merit Number, Check Allocation, Download Application Form, Allotment Letter and Admission Confirmation Slip and many other features.

List of Required Documents For Admission

The applicants have to carry all these required documents and certificates at the time of admission.

 • Seat allotment letter.
 • Birth certificate.
 • SSC (Class X) mark sheet and certificate.
 • HSC certificate.
 • Domicile certificate.
 • Caste or category certificate.
 • School leaving certificate.
 • Two passport size photographs (must be recent).
 • Address proof.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

20 Comments
 1. Mangesh Gajanan sonwane says

  ITI form takna hai

 2. Mithun Govind rathod says

  ITI pass welder aahe job pahejet

 3. सोमनाथ घुले says

  मी दहावी नापास आहे .मला इलेक्ट्रीशियन आय टी आय करायचा आहे कसा करता येईल

 4. वसंत भोईर says

  1जानेवारीला आटीआय मध्ये मुलांना बोलवले का?

 5. Akshayshinde says

  Chiplun 415605

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड