DVET ITI Admission 2020 – 2021 – admission.dvet.gov.in

ITI Admission 2020 - 2021


DVET ITI Admission 2020 – admission.dvet.gov.in – Admission Process For ITI 2020 is started Now. Candidates Registration & Login process is started now. Submit your online Application Forms to DVET ITI Website. As you know the official website is admission.dvet.gov.in. But one issue many students aee facing is Server issue with DVET ITI website.

राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मधील ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पहिल्या दिवशी ढेपाळली. प्रवेशांसाठी देण्यात आलेली वेबसाइट हँग झाली आणि विद्यार्थ्यांना नोंदणी करता आली नाही. अखेर सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणारे हे संकेतस्थळ सायंकाळी ७ वाजता सुरू होईल, असा मेसेज संकेतस्थळावर झळकू लागला.

आयटीआयचे प्रवेश १ ऑगस्टपासून सुरू होणार होते. पण सकाळी ११ वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी लॉग इन करण्याचा प्रयत्न केला असता साइट क्रॅश झाली. वेबसाईटच्या होमपेजवरील सर्व लिंक्स नोटिफिकेशन, डाऊनलोड्स सुरू होते. मात्र कॅंडिडेट लॉगइन होत नव्हते. DVET ITI Website admission.dvet.gov.in not working.

प्रवेश प्रक्रीया –

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयटीआय प्रवेशाची प्रक्रीया केंद्रीयभूत ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार असून उद्या 1 ऑगस्ट 2020 पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. अल्पसंख्याकांसाठी सुरु करण्यात येणाऱ्या वर्गांचीही प्रवेश प्रक्रिया याच पद्धतीतून होईल. तथापी, सध्या फक्त प्रवेशप्रक्रिया सुरु होत असून आयटीआय वर्ग कधी सुरु होणार याबाबत लॉकडाऊनसंदर्भातील शासनाच्या नियमांना अनुसरुन नंतर माहिती देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

उत्तीर्ण, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी

प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुतीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षावरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही, जेणेकरुन वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छूक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. चालू वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीचा प्रभावी वापर केला जाणार असून प्रवेश अर्ज व अर्ज नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, प्रमाणपत्रे तपासणी, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे ऑनलाईन करता येणार आहेत. प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.


ITI Admission 2020 – राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) प्रवेश प्रक्रिया यंदा केंद्रीभूत ऑनलाईन पद्धतीने (सेंट्रलाइज्ड) करण्यात येणार आहे. त्यासाठी १ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी सविस्तर माहितीपुस्तिका ३१ जुलै २०२० पासून संकेतस्थळावर डाउनलोड सेक्शनमध्ये PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ITI Admission

राज्यातील खासगी आणि शासकीय आयटीआयमधील प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्ट २०२० पासून सुरू होत आहे.. अधिक तपशील जाणून घ्या.

प्रवेशअर्ज शुल्क: Application Fees

  • राखीव प्रवर्ग उमेदवार (Unreserved Category): रु. १५०/-
  • महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार (Outside Maharashtra State): रु. ३००/-
  • राखीव प्रवर्ग उमेदवार (Reserved Category): रु. १००/-
  • अनिवासी भारतीय उमेदवार (Non Residential Indian): रु. ५००/-

अर्ज करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे –

  • ऑनलाईनप्रवेश अर्ज http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दि. १ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध होईल.
  • प्रवेश अर्जात “Primary Mobile Number (प्राथमिक मोबाईल नंबर)” नोंदविणे अनिवार्य आहे. एका मोबाईल क्रमांकावर केवळ एकच प्रवेश अर्ज नोंदविता येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रीयेबाबत उमेदवारांना वेळोवेळी SMS व्दारे माहिती व OTP (One Time Password) कळविण्यात येईल. सबब, उमेदवारांनी आपला अद्ययावत मोबाईल क्रमांक ऑनलाइन प्रवेश अर्जात “Primary Mobile Number” म्हणून नोंदविणे आवश्यक आहे. तसेच सदर मोबाईल क्रमांक प्रवेश प्रक्रिये दरम्यान बदलता येणार नाही.
  • तथापि, उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत कोणत्याही प्रकारे बदल करावयाचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरी नंतर “हरकती नोंदविणे” या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करुन तसा बदल करता येईल. तद्नंतर प्रवेश अर्जातकोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही.
  • प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावरच पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादरकरण्यासाठी प्रवेशसंकेतस्थळावर नोंदणीक्रमांक (Registration Number) वपासवर्ड (Password) व्दारे प्रवेश (Login) करुन “Submit/ Change Options/ Preferences” व्दारे सादर करावेत.
  • पहिल्याप्रवेशफेरीसाठी व्यवसायवसंस्थानिहायविकल्पवप्राधान्यपूर्ण भरल्यानंतर Option Form ची छापीलप्रत (Print Out) घ्यावी.
  • उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील. अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चूकीने प्रवेश देण्यात आला असल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवार संपूर्ण प्रवेशप्रक्रीयेतुन बाद होईल.
आयटीआयची प्रवेशक्षमता – https://bit.ly/2Xd340l

DVET ITI Admission 2020 – 2021राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI Admission 2020 – 20201) प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत यंदा काहीसा बदल करण्यात आला आहे. प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश अर्जाचे शुल्क भरणे आणि अर्ज निश्‍चिती ‘ऑनलाईन’ होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संस्थेत जावे लागणार नाही. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रियेत हा बदल करण्यात आला आहे. Online Admission Process 2020 – 2021.  

Maha ITI App Download

Students Yo have to download the Maha ITI APP From Google play store to get every update about your admission process. Just Download & install this Mobile app to your mobile phone. Candidates who have registered themselves for admissions on Admission Portal via http://admission.dvet.gov.in can access their Admission Status, Submit Option Form, Search ITI, Check Merit Number, Check Allocation, Download Application Form, Allotment Letter and Admission Confirmation Slip and many other features.

विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज निश्‍चितीच्या (कन्फर्मेशन) कार्यपध्दतीनुसार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तपासणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे, प्रवेश अर्ज निश्‍चितीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) यापूर्वी जावे लागत होते. परंतु आता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने संबंधित शुल्क भरण्यासाठी ऑनलाइनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचा राज्य मंडळासमवेत सामंजस्य करार झाला असून त्याद्वारे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती संस्थेकडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवेशासाठी अर्ज करताना दहावीच्या परिक्षेचा आसनक्रमांक नमूद केल्यास त्यांची वैयक्तिक माहिती आपोआप अर्जात नोंद होणार आहे. अन्य मंडळातून दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना माहिती प्रवेश अर्जात द्यावी लागेल.

– List of Document for Admission (प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज)

ITI Admission 2020 Details Registration

ITI Admission Timetable Schedule 2020

The Date wise Schedule or timetable of DVET ITI Admission details are given below. More dates & updates will be published here. Tomorrow more details schedule or timetable of admission process will be declared here.

प्रक्रिया बुधवारपासून (Admission Process From 15th July 2020) 

DVET ITI Admission 2020 – प्रवेशाची माहिती पुस्तिका, प्रवेश नियमावली, अर्ज व प्रवेश प्रक्रिया अशी प्रवेशाबाबत आवश्‍यक माहिती येत्या बुधवारपासून (ता. १५) उपलब्ध होणार आहे.

  • ४१७ – राज्यात आयटीआय प्रशिक्षण संस्था
  • १ लाख – एकूण प्रवेशक्षमता

प्रवेशाबाबत महत्त्वाचे –

  • प्रवेश अर्ज भरल्यानंतर प्रवेश शुल्क ऑनलाईन भरावे.
  • हे शुल्क भरल्यानंतर प्रवेश निश्‍चित होणार आहे.
  • प्रमाणपत्रे तपासणी, प्रवेश निश्‍चितीसाठी संस्थेत येण्याची गरज नाही.
  • प्रवेश अर्ज शुल्कानंतर अर्जात कोणतेही बदल करता येणार नाहीत.
  • प्राथमिक गुणवत्ता यादीनंतर माहितीत बदलाची सुविधा ऑनलाईन.

 

Helpline Number (From 10:00 AM to 06:00 PM)
8104-493-361, 8104-460-640, 9108-259-812



13 Comments
  1. Aakash sudhakar nare says

    2020 te 2021 che pepar kadhi honar aahet

  2. Akshay garud says

    Online admission form due date

  3. Rohit sambhaji patil says

    Iti exam kadhi honar

  4. Swapnil gawade says

    No problem

  5. Ankush says

    iti 2020 che paper kadhi honar aahet

  6. Nitin palav says

    When ITI admission date will be declared?

  7. Kiran Nalawade says

    When iti exam date will be declared?

  8. Anil pagare says

    Baherun addmission ghewun exam deta yeil ka sir mhanje open university sarkhe addmission ghewun exam deun degree gheta yeil ka?

  9. Anand khandare says

    Iti. ची साईड ओपनच होत नाही आहे……

  10. Niyaj shikalgar says

    fire safty cha course karryacha aahe mumbai madhe kutte course karryla bhettel

  11. प्रवीण कांबळे says

    ITI.ची साईड ओपनचा होत नाही आहे…….

  12. Nikhil says

    Iti semester back paper kadhi honar sir

  13. Vaibhav Pachpute Patil says

    *1 St Year Che Paper Honar Ki Nahi..?*

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा