IT Company Recruitment 2026
अमेरिकेतील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांनी आपल्या कामकाजाची पुनर्रचना कृत्रिम प्रज्ञेवर (एआय) आधारित करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम म्हणून कर्मचाऱ्यांची पुनर्रचना आणि नोकरकपातीचे सत्र सुरूच आहे. मेटा आणि लिंक्डइनने मोठ्या प्रमाणावर नोकरकपात आणि संस्थात्मक बदलांची घोषणा केली आहे.
एनबीसी न्यूजच्या अहवालानुसार, मेटाच्या पुनर्रचना योजनेनुसार, एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १० टक्के कर्मचाऱ्यांवर नोकरकपातीची कुऱ्हाड कोसळणार आहे, तर दुसरीकडे कंपनी सुमारे ७,००० कर्मचाऱ्यांना एआय-संबंधित कामकाजासाठी स्थानांतरित करणार आहे. या पुनर्रचनेचा भाग म्हणून सुमारे ८,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाण्याची शक्यता आहे, तर जवळपास ६,००० रिक्त पदे न भरताच ठेवली जातील. कर्मचारी कपातीची पहिली कुऱ्हाड मेटाच्या सिंगापूर येथील कर्मचाऱ्यांवर पहाटे आलेल्या एका ईमेलच्या रूपात कोसळली आहे. २०२२ मध्ये मेटाकडे ८६,४८२ कर्मचारी होते, जे मार्च २०२६ च्या अखेरपर्यंत ७७,९८६ इतके झाले आहेत. ओरॅकल कंपनीने सकाळी ६ वाजता जगभरातील आपल्या कर्मचाऱ्यांना कपातीसंदर्भात ईमेल पाठवला असून त्याद्वारे सुमारे ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
दरम्यान, न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, लिंक्डइनने ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली आहे. अहवालात ‘वर्कर्स अॅडजस्टमेंट अँड रिट्रेनिंग नोटिफिकेशन’चा हवाला देण्यात आला आहे, ज्यानुसार लिंक्डइनच्या ६०६ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरकपातीची माहिती देण्यात आली आहे, जी १३ जुलैपासून लागू होईल. सर्वांत मोठी नोकरकपात कॅलिफोर्नियातील लिंक्डइनच्या माउंटन व्ह्यू कार्यालयातून झाली असून, तेथील सुमारे ३५२ कर्मचाऱ्यांना आणि त्याच शहरातील ६६ रिमोट किंवा घरी बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे.
IT Company Recruitment 2026
देशात सर्वाधिक रोजगार देणाऱ्या आयटी (IT) क्षेत्रातील अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि त्यानंतर ऑटोमेशन व आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (AI) नोकरभरतीवर मोठा परिणाम झाला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक, विप्रो आणि टेक महिंद्रा यांसारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये नवीन भरती मंदावली आहे. इतकंच नाही तर या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्याही हजारोंनी कमी केली आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये जिथे १२,७१८ कर्मचाऱ्यांची वाढ झाली होती, तिथे गेल्या आर्थिक वर्षात ७,३८९ कर्मचारी कमी झाले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात ‘टीसीएस’नं (TCS) सर्वात मोठा धक्का दिला असून एकाच वेळी १२,००० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कोणत्याही भारतीय कॉर्पोरेट कंपनीकडून अलिकडच्या काळातील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात आहे. टीसीएसच्या या निर्णयामुळे संपूर्ण आयटी क्षेत्रावर परिणाम झाला असून, इतर काही कंपन्यांनी भरती करूनही एकूण कर्मचारी संख्येत घटच दिसून येत आहे. भारतातील टॉप ५ आयटी कंपन्यांपैकी ३ कंपन्यांनी भरती केली होती, परंतु टीसीएसच्या कपातीमुळे एकूण आकडेवारी खालावली आहे.

आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात इन्फोसिसमधील कर्मचाऱ्यांची संख्या ८,४४० नं कमी झाली आहे. टीसीएसनं मोठ्या कपातीनंतर २,३५६ नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली. एचसीएल टेकनं ८०२ आणि विप्रोनं १३५ नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली. दुसरीकडे, टेक महिंद्रानेही कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबले आणि १,९९३ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं. आयटी क्षेत्रातील संघटना ‘नासकॉम’च्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रात केवळ २,००० नवीन कर्मचाऱ्यांची भरती झाली. या काळात देशातील एकूण टेक क्षेत्रात १.३५ लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली, जी मागील वर्षाच्या १.३३ लाखांच्या तुलनेत किंचित जास्त आहे. संपूर्ण उद्योगाचा विचार करता, गेल्या आर्थिक वर्षापर्यंत आयटी क्षेत्रात एकूण ५९.५ लाख कर्मचारी कार्यरत आहेत, जे मागील वर्षाच्या तुलनेत २.३ टक्क्यांनी जास्त आहेत.
चालू वर्ष ठरणार सुखद
गेल्या आर्थिक वर्षात नोकरभरतीवर संकटाचे सावट असलं तरी, चालू वर्ष भरतीसाठी चांगले राहण्याची शक्यता आहे. विशेषतः फ्रेशर्सच्या भरतीबाबत कंपन्या उत्साही आहेत.
- टीसीएस : चालू आर्थिक वर्षात सुमारे २५,००० फ्रेशर्सची भरती करणार असल्याचे जाहीर केलं आहे (जरी हा आकडा मागील दोन वर्षांतील ४२,००० च्या तुलनेत कमी आहे).
- इन्फोसिस : चालू वर्षात २०,००० फ्रेशर्सची भरती करण्याचे लक्ष्य ठेवलं आहे.
- इतर कंपन्या : एचसीएल टेक, टेक महिंद्रा आणि विप्रो यांनीही फ्रेशर्सना संधी देण्याचं ठरवलं आहे. नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे, गेल्या वर्षी एचसीएल टेकनं ११,७४४ आणि विप्रो ने ७,५०० लोकांची भरती केली होती.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















