फ्रेशर्सना सुवर्ण संधी! IT क्षेत्रातील टॉप कंपन्या देणार 1 लाख जणांना नोकऱ्या

IT Company Mega Recruitment 2021

Jobs In IT Company 

IT Company Mega Recruitment 2021 : Jobs to be given to 1 lakh freshers in IT sector by 2022; Read what is a plan. Now some IT companies have started offering a large number of job opportunities (Career in IT companies in India). Companies like TCS, Infosys have announced the recruitment of thousands of employees (TCS Mega recruitment for freshers). Further details are as follows:-

IT Sector Jobs 

IT क्षेत्रात येणार ‘ही’ कंपनी घालणार धुमाकूळ! तब्बल 1 लाख फ्रेशर्सना 2022 पर्यंत देणार Jobs; वाचा काय आहे प्लॅन। आता काही IT कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर जॉब्सच्या संधी (Career in IT companies in India) देण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या काळात दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रापेक्षा IT क्षेत्रात नोकरीच्या (Jobs and salaries in IT sector) अनेक संधी उपलब्ध आहेत. कोरोनाकाळात सरासरी सर्वच क्षेत्रांमध्ये मंदी आली. काही क्षेत्रांमध्ये तर अक्षरशः पैशांची वानवा होती. मात्र याचवेळी IT क्षेत्रातील टॉप कंपन्या (Top companies in IT sector) भरघोस पैसे कमवत होत्या. म्हणजेचज कोरोना महामारीच्या संकटाच्या काळातही IT कंपन्या जोमात सुरु होत्या. म्हणूनच आता काही IT कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर जॉब्सच्या संधी (Career in IT companies in India) देण्यास सुरुवात केली आहे.

TCS, Infosys सारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांची भरती (TCS Mega recruitment for freshers) करण्याची घोषणा केली आहे. त्याच शर्यतीत आता Cognizant (Cognizant Mega recruitment for freshers in 2022) ही मागे नाहीये. Cognizant या मोठ्या IT कंपनीनं येत्या काही काळातील IT क्षेत्रांतील स्पर्धा आणि स्कोप बघता TCS आणि इन्फोसिसच्या पावलावर पाऊल ठेवत तब्बल एक लाख कर्मचाऱ्यांची भरती (1 lac jobs for freshers in Cognizant) करणार असल्याची माहिती मिळतेय. ExamDaily या डिजिटल वेबसाईटनं यासंबंधीचं वृत्त प्रकाशित केलं आहे. विविध कारणांमुळे अलीकडच्या काही दिवसांत आयटी फर्मचा अट्रिशन रेट (Attrition Rate in IT companies) थोडा जास्त आहे.

कंपनीचा अ‍ॅट्रिशन रेट म्हणजेच कर्मचाऱ्यांनी नोकरीवरून राजीनामा देऊन निघून जाणे. हा अॅट्रिशन रेट कंपनीच्या टर्नओव्हर रेटवर परिणाम करेल. म्हणूनच, अनेक कंपन्या अॅट्रिशन रेट कमी करण्याचा विचार करत आहेत. विशेष म्हणजे काही कंपन्यांची तुलना करता Cognizant चा अॅट्रिशन रेट हा तब्बल 33% आहे. तर या तुलनेत Tata Consultancy Services (TCS) ने तिमाहीत सर्वात कमी 11.9% एट्रिशन रेट नोंदवला, तर Infosys ने 20.1%, Wipro 20.5% आणि HCL Technologies ने ही संख्या 15.7% इतका रेट नोंदवला. त्यामुळे आता अॅट्रिशन रेट कमी करण्यातही अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची भरती करत आहेत.

त्यामुळे Cognizant आता इतर कंपन्यांच्या व्यतिरिक्त अॅट्रिशनच्या समस्येचा सामना करण्यासाठी रिटेन्शन आणि रिक्रूटमेंटवर लक्ष केंद्रित करत आहे. कॉग्निझंटचे सीईओ ब्रायन जे. हम्फ्रीस यांचा Q3 अर्निंग कॉल घोषणेवर देखील यावर लक्ष केंद्रितकरत आहे. Cognizant नं तिसर्‍या तिमाहीत 17,000 हून अधिक नेट हेडकाउंट वाढवले आहे. 2022 पर्यंत भारतातील तब्बल 45,000 नवीन पदवीधरांना नियुक्त करण्याची कंपनीची योजना आहे.

चालू आर्थिक वर्षात सुमारे एक लाख IT एक्पर्टसची नियुक्ती करण्याचीही Cognizant ची योजना आहे. कॉग्निझंटच्या सीईओने असेही सांगितले की कंपनी चौथ्या तिमाहीत वार्षिक वाढीसह अनेक कार्यक्रमांद्वारे कर्मचार्‍यांच्या करिअरची प्रगती आणि प्रतिबद्धता वाढवण्यास उत्सुक आहे.


खुशखबर ! भारताच्या ‘या’ Top 4 आयटी कंपन्या देतील 91,000 फ्रेशर्सला नोकरी

IT Company Mega Recruitment 2021 : India’s top 4 IT companies will provide jobs to 91,000 freshers –  भारताच्या चार प्रमुख आयटी कंपन्या टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीस आणि विप्रोने सामुहिकपणे पुढील आर्थिक वर्षासाठी कॅम्पसमधून 91,000 उमेदवारांना नोकरी देण्याची योजना तयार केली आहे. कारण लॉकडाऊन कमी झाल्यानंतर मागणीत तेजी आली आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

टीसीएसचे कार्यकारी व्हीपी आणि जागतिक एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी म्हटले होते की, कंपनीला आशा आहे की, पुढील वर्षी सुद्धा तेवढ्याच फ्रेशर्सला कामावर ठेवले जाईल, जेवढे यावर्षी (जवळपास 40,000) होते. इन्फोसिसने म्हटले की, ते पुढील आर्थिक वर्षात भारतात 24,000 कॉलेज पदवीधरांनी नियुक्त करतील, जे 15,000 पासून चालू आर्थिक वर्षासाठी योजनाबद्ध होते.

एचसीएल टेक्नॉलॉजीसचे प्रमुख एचआर अधिकारी अप्पाराव व्हीव्ही यांनी म्हटले की, कामाचा वेग वाढण्याची अनेक कारणे आहेत. आम्ही जे लक्ष्य ठेवले होते, त्यापेक्षा 33% जास्त करत आहोत आणि आम्ही क्यू3 आणि क्यू4 मध्ये तेजी पहात आहोत. जर ग्राहकांनी आपली व्यस्तता वाढवली, तर त्यांना तिथेच जावे लागेल जिथे कौशल्य आहे. मागील वर्षी आमच्या मॅन पॉवरमध्धये 70% वाढ भारतात आणि 30% भारताच्या बाहेर होती. यावर्षी ही जवळपास 90%-10% असेल. आम्ही भारतात विशाल रँप-अप पहात आहोत.

एचसीएलने 31 मार्च, 2022 ला समाप्त होणार्‍या आर्थिक वर्षात भारतात 15,000 फ्रेशर्स आणि 1,500-2,000 लोकांना नोकरीवर ठेवण्याची योजना बनवली आहे. सक्सेना फायनान्शियल ग्रुप (एसएफजी) च्या जेम्स फ्रीडमॅन यांनी उल्लेख केला आहे की, मागणी सामान्यपणे मूलभूत पायाशी संबंधित आहे. त्यांनी म्हटले की, जिथे मोठे सौदे होतात, तिथे भारताचा माईंडशेयर पुन्हा एकदा वाढत आहे.

इन्फोसिसने जर्मन ऑटोमोटिव्ह प्रमुख डेमलरशी इतिहासातील आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा सौदा जिंकला आहे. सूत्रांनी सांगितले की, याचा अंदाज 3.2 बिलियन डॉलर आहे. टीसीएसने प्रूडेंशियल फायनान्शियलशी एक मोठा सौदा जिंकला. तर विप्रोने जर्मन रिटेलर मेट्रोसोबत एक मोठा करार केला.

सोर्स: पोलीसनामा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

15 Comments
 1. Rahul Jadhav says

  Aarogya vibagh jobs ch aaraz karaych aahe ..!

 2. Pooja chaudhari BE comp. says

  Recruitment kashya paddhatine keli jail?college campus selection or Direct interview for degree holders?

 3. Aarti Gyaneshwar sapkale says

  Bharti kadhi honar ahe

 4. Aparna survase says

  I have in acoountant job….. I have done m. Com this year

 5. Darade Mahesh Bhaskar says

  Vacuncy send kara.

 6. Sagar ajinath dahiphale says

  Trade konkontey

 7. Vishwanath yamgar says

  Company made join honyasati kay karav lagel

 8. Arti Deshmukh says

  Job

 9. Sunil sambhaji patil says

  12th job vacancy ahe ka

 10. Jafarsab Javed khajiwale says

  Job apply

 11. Amol Surekar says

  Any vacancy for Dip Automobile Engg plz tell me

 12. Rakesh says

  Prmnt job ahe ka sir ki cantract base job ahe aani mla job chi khup aavshakta ahe plz

 13. Narendra khobragade says

  12 pass & welder Express

 14. Narendra khobragade says

  12 pass & welder Express

 15. Mahesh Thakare says

  Mi 12th pass ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड