सावधान मित्रांनो, इस्रो, नासामध्ये नोकरीचं आमिष दाखवून शेकडो तरूणांची फसवणूक!

ISRO Nasa Fake Jobs

इस्रो, तसेच अमेरिकेतील नासामध्ये नोकरी देतो, असे आमिष दाखवून पैसे उकळवत कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे याप्रकरणी ज्या तरूणांनी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली, तेच आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.इस्रो, तसेच अमेरिकेतील नासामध्ये नोकरी देतो, असे आमिष दाखवून पैसे उकळवत कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. नोकरीचे आमिष दाखवून भामट्यांनी 1-2 नव्हे 100 हून अधिक तरूणांना स्वप्न दाखवली आणि त्यांचे पैसे लुटल्याची प्रकार उघडकीस आला आहे. इस्रो आणि नासामध्ये कनिष्ठ वैज्ञानिक, अधिकारी, संशोधक, लिपिक आणि अन्य कर्मचाऱ्यांची भरती असल्याचे सांगून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांच्या टोळीने तब्बल 111 लोकांची फसवणूक केली.

 

ISRO Nasa Fake Jobs

 

धक्कादायक गोष्ट म्हणजे याप्रकरणी ज्या तरूणांनी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली, तेच आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अश्विन वानखडे आणि चेतन भोसले असे आरोपींचे नाव असून पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात हत्येच्या प्रकरणातील आरोपी व सूत्रधार ओंकार तलमले याला आधीच अटक झाली होती. आता आणखी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ओंकार तलमले याने नोकरी देण्याच्या आरोपाखाली हे रॅकेट सुरू केले होते. दोघांच्या हत्याप्रकरणी त्याला अटक झाल्यावर, त्याने केलेला हा फसवणुकीचा कारनामाही उघड झाला. अश्विन वानखेडे याने तक्रार केली होती. तक्रारीनुसार अश्विनने नातेवाईकाकडून एक लाख रुपये घेऊन ओंकारला दिले होते. ओंकारनेही त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याची नियुक्ती झाल्याचे सांगत बनावट नियुक्ती पत्रही दिले, मे 2020 मध्ये हा प्रकार घडला होता. या नोकरीत 50 हजार पगार असून कोरोनामुळे कमी पैसे मिळतील अशी थापही मराली.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

काही काळ ओंकारने त्याला स्वतःच्या बँक खात्यातून पैसे दिले. यामुळे अश्विनचा विश्वास बसला व त्याने इतर नातेवाईक, मित्रांना याची माहिती दिली. त्यानंतर ओंकारने हीच शक्कल इतरांसाठी वापरली आणि १११ तरूण नोकरीच्या आमिषापायी त्याच्या जाळ्यात फसले. अशा प्रकारे ओंकारने या तरूणांकडून 5.30 कोटी घेले. तर अश्विन व आणखी एक आरोपी चेतन भोसले यांनी विविध लोकांकडून नोकरीच्या नावाखाली अनुक्रमे 2.47 लाख व एक कोटी रुपये स्वीकारल्याचे समोर आले.

अखेर याप्रकरणाचा भांडाफोड झाला आणि पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. तर हत्येचा आरोप असलेला ओंकार आधीच पोलिसांच्या ताब्यात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड