सुवर्णसंधी ! विद्यार्थ्यांसाठी इस्रो आंतरवासीयता प्रशिक्षण २०२५ | – ISRO Internship Training 2025 for Students!!

ISRO Internship Training 2025 for Students!!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) विद्यार्थ्यांसाठी आंतरवासीयता (Internship) आणि प्रकल्प प्रशिक्षण (Project Training) कार्यक्रम राबवत आहे. यामुळे देशभरातील पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्रातील संधींचा लाभ घेता येईल.

ISRO Internship Training 2025 for Students!!

उद्दिष्ट्य व संधी:
अंतराळ संशोधन क्षेत्राबाबत अधिकाधिक विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे आणि त्यांना व्यावसायिक व तांत्रिक कौशल्ये मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना इस्रोच्या विविध केंद्रांमध्ये थेट तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळेल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्रशिक्षणासाठी इस्रोची केंद्रे:
विद्यार्थ्यांना इस्रोच्या बेंगळुरू, अहमदाबाद, शिलाँग, हसन, तिरुवनंतपुरम्, डेहराडून, हैदराबाद, महेंद्रगिरी, श्रीहरीकोटा या केंद्रांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक केंद्रासाठी स्वतंत्र संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया असेल.

पात्रता निकष:
पदवी, पदव्युत्तर किंवा संशोधन करणारे विद्यार्थी किंवा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार.
भारत किंवा परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक.
किमान ६०% गुण किंवा ६.३२ क्रेडिट पॉईंट मिळवलेले असणे आवश्यक.
आंतरवासीयतेसाठी ४५ दिवसांचा कालावधी तर प्रकल्प प्रशिक्षणासाठी ४० ते १२० दिवसांचा कालावधी असेल.
बी.ई., बी.टेक, एम.ई., एम.टेक, बी.एस्सी, डिप्लोमा, एम.एस्सी, पीएच.डी यांसारख्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना संधी.

हे प्रशिक्षण का करावे?
अंतराळ संशोधन क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी.
इस्रोच्या अनुभवी वैज्ञानिक आणि अभियंत्यांकडून मार्गदर्शन.
महत्वाच्या अंतराळ संशोधन प्रकल्पांवर थेट काम करण्याची संधी.
भविष्यातील संशोधन आणि नोकरीसाठी महत्त्वाचे व्यासपीठ.

आता अर्ज करा आणि ISRO सोबत तुमच्या अंतराळ संशोधन कारकिर्दीची सुरुवात करा!


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड