त्वरा करा, बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षा न देता थेट निवड!
IPPB Recruitment 2025 Apply Online
देशातील विविध राज्यात शाखा असलेल्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. या बँकेत ५१ पदांसाठी कंत्राटी भरती काढण्यात आली आहे. या पदांसाठी १ मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. बँकेतील नोकरीसाठी ippbonline.com या वृत्तसंकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे. पोस्टातील नोकरीसाठी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत २१ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजून ५९ वाजता असणार आहे. या नोकरीसाठी इतर मार्गांनी अर्ज स्वीकारला जाणार नाही. नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट पाहू नका, त्याधी अर्ज भरण्याचा सल्ला उमेदवारांना देण्यात आला आहे.
उमेदवार फक्त १ पदासाठी अर्ज दाखल करू शकता. बँकेतील नोकरीसाठी कोणत्याही लेखी परीक्षेची गरज नसणार आहे. या पदांसाठी पदवीपर्यंत शिक्षण होणे गरजेचे आहे. पदांची निवड करताना राज्यातील उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. उमेदवारांची निवड ही १ वर्षांच्या कंत्राटावर केली जाणार आहे. कामगिरी चांगली असल्यास उमेदवाराचा कामाचा अवधी २ वर्षांनी वाढवण्यात येईल. उमेदवाराचा कंत्राट हा कमीत कमी ३ वर्षांचा असेल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अर्ज शुल्क किती?
अर्जासाठी एससी/एससी/पीडब्लूडी वर्गातील उमेदवारांसाठी १५० रुपये अर्ज भरावे लागणार आहेत. तर इतर वर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ७५० रुपये असणार आहे.
ईब्लूएस वर्ग – ०३ पदे
ओबीसी – १९ पदे
एसएसी – १२ पदे
एसटी – ४ पदे
बँकेच्या गरजेनुसार, पदांची संख्या वाढवू किंवा कमी करू शकतात.
वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय हे १ फेब्रुवारी २०२५ पर्यंत २१ वर्ष ते ३५ वर्षांदरम्यान असलं पाहिजे.
राज्य/केंद्र शासित प्रदेशातील पदांची संख्या
छत्तीसगड – ३ पदे
आसाम – ३ पदे
बिहार – ३ पदे
गुजरात – ६ पदे
हरियाणा – १ पदे
जम्मू आणि काश्मीर – २ पदे
लक्षद्वीप – १ पदे
महाराष्ट्र – ३ पदे
गोवा – १ पदे
अरुणाचल प्रदेश – ३ पदे
मनीपूर – २ पदे
मेघालय – ४ पदे
मिझोरम – ३ पदे
नागालँड – ५ पदे
त्रिपुरा – ३ पदे
पंजाब – १
राजस्थान – १ पदे
तामिळनाडू – २ पदे
पुद्दुचेरी – १ पदे
उत्तर प्रदेश – १ पदे
उत्तराखंड – २ पदे
कशी होणार निवड?
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत एक्झिक्युटिव्ह पदांसाठी निवड मेरीटच्या आधारावर होणार आहे. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरताना पदवीचे गुण व्यवस्थित भरावा लागणार आहे. काही उमेदवारांचे गुण सारखे असतील, त्यावेळी उमेदवारांची जन्म तारखेचा विचार केला जाईल. यानंतर मेरीट लिस्टनुसार मुलाखतीसाठी निवड केली जाईल. मुलाखतीनंतर निवड केलेल्या उमेदवारांची अंतिम यादी वेबसाईटवर जाहीर केली जाणार आहे.