झारखंड सरकारचा मोठा निर्णय !! तरुणांसाठी इंटर्नशिप , १०००० रुपये मानधन ,आणि शिक्षक भरती होणार ; ५१००० रुपये पगार मिळणार !-Internship & Teacher Recruitment!

Internship & Teacher Recruitment!

झारखंडच्या महाविद्यालयीन तरुणांसाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘झारखंड ग्रासरूट इनोव्हेशन इंटर्नशिप योजना’ (Jharkhand Grassroots Innovation Internship Scheme) या नव्या उपक्रमाला मंजुरी देण्यात आली आहे.

Internship & Teacher Recruitment!

या योजनेतून राज्यातील १७,३८० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीत गावपातळीवर आठ आठवड्यांची इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला एकूण १०,००० रुपये मानधन देखील दोन टप्प्यांत दिले जाणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्य सरकारच्या प्रधान सचिव वंदना दादेल यांनी सांगितले की, झारखंडमधल्या ४,३४५ पंचायतींमध्ये चार विद्यार्थ्यांचा एक गट तयार केला जाईल आणि या गटाकडून गावांमध्ये नवोपक्रम शोधण्याचे, आणि स्थानिक समस्यांचा अभ्यास करण्याचे काम केले जाईल. ही इंटर्नशिप क्रेडिट-आधारित असून, सरकारी आणि खाजगी विद्यापीठे तसेच संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी खुली असेल.

योजनेचा मुख्य उद्देश गावांमधील पारंपरिक ज्ञान, स्थानिक नवोपक्रम, आणि समस्या समजून घेणे हा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुलभूत स्तरावर समाजाशी संपर्कात राहण्याचा अनुभव मिळणार आहे.

शिक्षक भरतीत बदल – ८,९०० पदं रद्द, १३७३ नव्या माध्यमिक शिक्षक पदांची निर्मिती

त्याचवेळी झारखंड सरकारने शिक्षक भरतीबाबतही मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील टीजीटी (पदवीधर प्रशिक्षित शिक्षक) आणि पीजीटी (पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षक) यांच्या ८,९०० रिक्त पदं रद्द करण्यात आली आहेत. त्याऐवजी ५१० शासकीय प्लस टू शाळांमध्ये १३७३ नवीन माध्यमिक शिक्षकांची भरती केली जाणार आहे.

या नवीन शिक्षकांना सातव्या वेतन आयोगानुसार L-6 स्तरावर वेतन – ३५,४०० ते १,१२,४०० रुपये दिलं जाईल. याआधी टीजीटी पदांना L-7 स्तरावर ४४,९०० रुपये आणि पीजीटी पदांना L-8 स्तरावर ४७,६०० ते १,५१,१०० रुपये मिळत होते.

या निर्णयामुळे झारखंडमध्ये शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडण्याची शक्यता असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि शिक्षकांना नवी संधी मिळणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड