JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

खुशखबर, आता राज्य सरकार द्वारे महाराष्ट्रातील उमेदवारांना मिळणार जगभरातील रोजगार संधी!

International Jobs For maharashtra Candidates – सध्या भारताच्या बाहेर नोकरी मिळणे हे बहुतांश तरुण वर्गाचे स्वप्न असते. अशाच उमेदवारांसाठी राज्य सरकारने एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. या नवीन संधी द्वारे आपल्याला विविध देशात नोकरीच्या हजारो संधी मिळणार आहे.  या साठी आता राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. या द्वारे राज्यातील तरुणांना जगभरातील विविध देशांमध्ये रोजगार उपलब्ध करुन देण्याकरिता समन्वय आणि अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था (महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट्स-महिमा) स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील तरूणांना विविध देशातील रोजगार उपलब्धता आणि संधी यांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. चला तर या बद्दल पूर्ण प्रक्रिया समजून घेऊ या. 

 

देशाच्या लोकसंख्येत कार्यप्रवण गटाचे (वय १८ ते ४५ वर्षे) प्रमाण ६० ते ६५ टक्के आहे. या गटास रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाबरोबरच इतर विभागांच्या माध्यमातून राज्यातील प्रशिक्षित मनुष्यबळ देश-विदेशातील औद्योगिक संस्थांना पुरविण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे.राज्यात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये मिळून एक हजारहून अधिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे विस्तृत जाळे आहे. कृषि व संलग्न क्षेत्रे, उद्योग, बांधकाम, आरोग्य, आतिथ्य, लॉजिस्टिक्स, बँकिंग, तसेच सेवा इ. क्षेत्रांत लक्षावधी कुशल कामगार तयार होत आहेत.  या उमेदवारांना विविध देशात नोकरीच्या अनेक संधी प्रदान होणार आहेत.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

सध्या आपल्या महाराष्ट्र, विकसित देशांतील रोजगाराच्या उपलब्ध संधी, देशात मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनेत मिळणारे जादा वेतन या कारणांमुळे मागील काही वर्षापासून भारतीय युवा वर्गाचा कल आंतरराष्ट्रीय रोजगाराकडे वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कामगार आणि विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. केरळ, तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यांनी परदेशातील रोजगारासंबंधी प्रभावी समन्वय व अंमलबजावणीसाठी एकछत्री शिखर संस्था स्थापन केलेल्या आहेत. त्याधर्तीवरमहाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतीशिलता आणि क्षमता संस्था सुरु करण्यास शनिवारी मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे सल्लागार मंडळ नियुक्त केले जाणार असून नऊ सदस्यीय संचालक मंडळ असेल. महिमाच्या माध्यमातून शासनाचे विविध विभाग, कौशल्य विद्यापीठे, नामांकित शैक्षणिक संस्था, कौशल्य प्रशिक्षण / भाषा प्रशिक्षण संस्था, औद्योगिक संघटना, नामांकित भरती संस्था (रिक्रूटिंग एजन्सीज) यांच्या सहाय्याने परदेशातील रोजगार उपलब्धतेसाठीच्या परिसंस्था विकसित केल्या जातील. दैनंदिन कामकाजासाठी मुंबई येथे मुख्य कार्यालय आणि पाच विभागीय कार्यालये असतील. संस्थेत प्रतिनियुक्ती तसेच बाह्यस्रोताद्वारे मनुष्यबळ घेतले जाईल. मुख्य कार्यालय आणि पाच विभागीय कार्यालयांच्या कामकाजासाठी आणि विविध प्रशिक्षण व समुपदेशन कार्यक्रमांसाठी अंदाजे १३२ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित अपेक्षित आहे. इतर देशांमधील सरकारच्या मागण्यांनुसार कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी संस्था म्हणून महिमा संस्था कार्यरत राहणार असून केंद्र सरकारच्या परराष्ट्र विभागाकडून परवाना घेण्यात येईल.

 

तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम (Technical Intern Training Program – TITP)
हा कार्यक्रम भारत सरकार आणि जपान सरकार यांच्यातील करारानुसार असला तरी, महाराष्ट्र सरकार आपल्या कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून याची प्रभावी अंमलबजावणी करते.

  • स्वरूप: याअंतर्गत उमेदवारांना ३ ते ५ वर्षांसाठी जपानमध्ये ‘इंटर्नशिप’ करण्याची संधी मिळते.
  • प्रशिक्षण: उमेदवारांना जपानी भाषा, तिथली संस्कृती आणि संबंधित कामाचे तांत्रिक प्रशिक्षण दिले जाते.
  • फायदा: जपानमध्ये काम करण्याचा अनुभव आणि उत्तम मानधन मिळते.

 

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान (PMKUVA)

राज्यातील तरुणांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सक्षम बनवण्यासाठी ही योजना राबवली जाते.

  • क्षेत्र: आरोग्य (Healthcare), बांधकाम (Construction), लॉजिस्टिक, आयटी यांसारख्या ३६ पेक्षा जास्त क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते.
  • पात्रता: १५ ते ४५ वयोगटातील महाराष्ट्राचे अधिवास असलेले उमेदवार.

 

परदेशातील रोजगारासाठी सामंजस्य करार (MoU with Germany)
महाराष्ट्र सरकारने जर्मनीसोबत एक विशेष करार केला असून, त्याअंतर्गत राज्यातील १०,००० कुशल उमेदवारांना जर्मनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने परिचारिका (Nurses) आणि तांत्रिक क्षेत्रातील कुशल कामगारांचा समावेश आहे.

 

परदेश शिष्यवृत्ती योजना (Foreign Scholarship Schemes)
थेट नोकरीसाठी नसली तरी, परदेशात शिक्षण घेऊन तिथेच नोकरीची संधी मिळवण्यासाठी या योजना अत्यंत उपयुक्त आहेत:

  • सामाजिक न्याय विभाग: अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी.
  • OBC बहुजन कल्याण विभाग: इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी.
  • बार्टी (BARTI) आणि सारथी (SARTHI): विविध प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी १००% अर्थसहाय्य.

 

टीप: परदेशात नोकरी शोधताना केवळ शासनमान्य नोंदणीकृत संस्था आणि पोर्टलचाच वापर करावा. कोणत्याही एजंटला पैसे किंवा व्यवहार करण्यापूर्वी त्याची व्यवस्थित पडताळणी करावी.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड