खुशखबर! -इन्फोसिस नवीन वर्षात करणार २०,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची महाभरती! | Infosys Recruitment 2024

Infosys Recruitment 2024

Infosys Recruitment 2025

मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसचा नफा चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 11 टक्क्यांहून अधिक वाढून सुमारे 6,806 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा अंदाजे 6,106 कोटी रुपये होता. तिसऱ्या तिमाहीत इन्फोसिसचा महसूल सात टक्क्यांहून अधिक वाढून सुमारे 41,764 कोटी रुपये झाला आहे. उत्तर अमेरिकेतील इन्फोसिसची वाढ सुमारे पाच टक्के आहे. या आर्थिक वर्षात कंपनीच्या महसुलात 4.5 टक्के ते 5 टक्के वाढ अपेक्षित आहे. गेल्या तिमाहीत कंपनीने 5,591 कर्मचाऱ्यांची भरती केली होती. त्यांची एकूण कामगार संख्या 3,23,379 आहे. कंपनीने सांगितले की चालू आर्थिक वर्षात 20,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत व्हाट्सअँप चॅनल येथे क्लिक करून लगेच जॉईन करा.

 

गेल्या वर्षी, कंपनीने नवीन कर्मचाऱ्यांची भरती पुढे ढकली होती. त्यामुळे कंपनीला टीकेचा सामना करावा लागला होता. यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांची भरती केली होती. फ्रेशर्सच्या जॉइनिंगची तारीख पुढे ढकलल्यास कंपनीविरोधात निदर्शने करण्यात येतील, असा इशारा सॉफ्टवेअर कामगारांच्या संघटनेने दिला होता. हे तरुण अभियंते जवळपास दोन वर्षांपासून रुजू होण्याच्या प्रतीक्षेत होते. त्यांना 2022 मध्ये कंपनीत सिस्टम इंजिनीअर म्हणून नियुक्तीची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या रुजू होण्यास बराच उशीर झाला. गेल्या काही वर्षांत आयटी कंपन्यांकडून फ्रेशर्सचे जॉइनिंग पुढे ढकलल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Infosys Current Recruitment Process Link


गेल्या दीड वर्षापासून आयटीतील रोजगाराची बंद दारे आता नवोदितांसाठी सुवर्णसंधी घेऊन आली आहेत. आयटी क्षेत्रातील नावाजलेले नाव असलेल्या इन्फोसिसने कॅम्पस इंटव्ह्यूच्या माध्यमातून निवडलेल्या मुलांना ९ लाख रुपयांचे वार्षिक वेतन देण्याचे ठरविले आहे. पदवी हातात पडताच घसघशीत वेतनाची नोकरी उपलब्ध होणार आहे. टीसीएसने यापूर्वीच प्राईम या प्रकल्पाअंतर्गत नवोदितांना ९ ते अकरा लाख रुपये वार्षिक वेतन देऊ करणार असल्याचे जाहीर केले आहे. बेंगळुरू येथील एका कंपनीने नवोदितांना तीन ते साडेतीन लाख रुपयांचे वार्षिक वेतन देऊ केले आहे.

त्यावरून वादंग सुरू झाला होता. इन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार कंपनी नवोदितांना ९ लाखांपर्यंत वेतन देऊ करणार आहे. उमेदवारांच्या कौशल्यानुसार चार ते साडेसहा लाख आणि नऊ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक वेतन दिले जाणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नवोदित उमेदवारांना संगणकीय प्रणाली विकसनासाठी घेणार आहे. टीसीएसची वेतनश्रेणी ९ ते अकरा लाख रुपये वार्षिक अशी आहे. तसेच, टीटीएस यावर्षी कृत्रिम बुद्धिमत्ता, जनरेटीव्ह एआय आणि मशिन लर्निंग अशा विविध प्रकल्पांसाठी भरती करणार आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशातील पाच बड्या आयटी कंपन्यांनी ७० हजार लोकांना कामावरून कमी केले होते. जून-२०२४ अखेरीस संपलेल्या जून-२० आर्थिक वर्षात टीसीएसमध्ये ५,४५२ नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. त्यापूर्वीच्या तीन तिमाहीत कामगार कपात करण्यात आली. या काळात १३,२४९ कामगारांची कपात करण्यात आली. इन्फोसिसमध्ये एप्रिल ते जून या कालावधीत दोन हजाराने कामगार संख्या कमी झाली. देशातील चार मोठ्या कंपन्या ८२ हजार कामगार भरती करणार आहे. एचसीएलटीटेक १० हजार आणि विप्रो १२ हजार नवोदितांना संधी देणार आहे.


इन्फोसिस या भारतातील आघाडीच्या आयटी कंपनीत यंदा मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्स आयटी इंजिनिअर्सची भरती होणार आहे. कंपनीचे सीएफओ जयेश संघराजका यांनी याबाबत माहिती दिली आहे. पहिल्या तिमाहित झालेल्या फ्रेशर्सच्या भरतीव्यतिरिक्त ही भरती असणार आहे. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महत्वाची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसनं यंदाच्या आर्थिक वर्षात मेगा फ्रेशर्सची भरती घोषणा केली आहे. त्यामुळं आगामी काळात ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ही मोठी संधी असणार आहे. गेल्या अर्थिक वर्षात कंपनीनं ११,९०० फ्रेशर्सना नोकरीच्या संधी दिल्या होत्या. पण त्याच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत अर्थात २०२३ च्या तुलनेत यात ७६ टक्के घट झाली होती. कारण २०२३-२४ या अर्थिक वर्षात कंपनीनं तब्बल ५०,००० फ्रेशर्सची भरती केली होती.

इन्फोसिसच्या १८ जुलै रोजी पार पडलेल्या पहिल्या तिमाहितील कॉन्फरन्समध्ये बोलताना कंपनीचे सीएफओ अर्थात चीफ फायनान्शिअल ऑफिसर जयेश संघराजका यांनी सांगितलं की, गेल्या काही तिमाहींमध्ये आपण वेगवान भरती प्रक्रिया राबवली आहे. यामध्ये आपण कंपनीच्या कॅम्पसमध्ये आणि बाहेरच्या लोकेशनलाही मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्सची भरती केली. गेल्या तिमाहितीच्या तुलनेत या तिमाहित मात्र २००० कमी फ्रेशर्स आपण भरले. यंदा 15,000 ते 20,000 फ्रेशर्सना कामावर घेण्याचा विचार कंपनी करत आहे, पण कंपनीची वाढ कशी होतेय यावर ते अवलंबून आहे, असंही यावेळी संघराजका यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, दुसरीकडं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या आर्थिक वर्षीत सुमारे 40,000 फ्रेशर्सची भरती करणार आहे, ज्यापैकी पहिल्या तिमाहीत सुमारे 11,000 प्रशिक्षणार्थींना कंपनीनं आधीच नियुक्ती दिली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Omkar says

    Where is this job and what is the job please tell me

  2. Dnyandev Bhangare says

    Hii

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड