खुशखबर! -इन्फोसिसने कॅम्पस इंटव्ह्यूच्या माध्यमातून निवडलेल्या मुलांना तब्बल ९ लाखाचे पॅकेज! | Infosys Recruitment 2024
Infosys Recruitment 2024
Infosys Recruitment 2024
गेल्या दीड वर्षापासून आयटीतील रोजगाराची बंद दारे आता नवोदितांसाठी सुवर्णसंधी घेऊन आली आहेत. आयटी क्षेत्रातील नावाजलेले नाव असलेल्या इन्फोसिसने कॅम्पस इंटव्ह्यूच्या माध्यमातून निवडलेल्या मुलांना ९ लाख रुपयांचे वार्षिक वेतन देण्याचे ठरविले आहे. पदवी हातात पडताच घसघशीत वेतनाची नोकरी उपलब्ध होणार आहे. टीसीएसने यापूर्वीच प्राईम या प्रकल्पाअंतर्गत नवोदितांना ९ ते अकरा लाख रुपये वार्षिक वेतन देऊ करणार असल्याचे जाहीर केले आहे. बेंगळुरू येथील एका कंपनीने नवोदितांना तीन ते साडेतीन लाख रुपयांचे वार्षिक वेतन देऊ केले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत व्हाट्सअँप चॅनल येथे क्लिक करून लगेच जॉईन करा.
त्यावरून वादंग सुरू झाला होता. इन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार कंपनी नवोदितांना ९ लाखांपर्यंत वेतन देऊ करणार आहे. उमेदवारांच्या कौशल्यानुसार चार ते साडेसहा लाख आणि नऊ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक वेतन दिले जाणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नवोदित उमेदवारांना संगणकीय प्रणाली विकसनासाठी घेणार आहे. टीसीएसची वेतनश्रेणी ९ ते अकरा लाख रुपये वार्षिक अशी आहे. तसेच, टीटीएस यावर्षी कृत्रिम बुद्धिमत्ता, जनरेटीव्ह एआय आणि मशिन लर्निंग अशा विविध प्रकल्पांसाठी भरती करणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशातील पाच बड्या आयटी कंपन्यांनी ७० हजार लोकांना कामावरून कमी केले होते. जून-२०२४ अखेरीस संपलेल्या जून-२० आर्थिक वर्षात टीसीएसमध्ये ५,४५२ नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. त्यापूर्वीच्या तीन तिमाहीत कामगार कपात करण्यात आली. या काळात १३,२४९ कामगारांची कपात करण्यात आली. इन्फोसिसमध्ये एप्रिल ते जून या कालावधीत दोन हजाराने कामगार संख्या कमी झाली. देशातील चार मोठ्या कंपन्या ८२ हजार कामगार भरती करणार आहे. एचसीएलटीटेक १० हजार आणि विप्रो १२ हजार नवोदितांना संधी देणार आहे.
इन्फोसिस या भारतातील आघाडीच्या आयटी कंपनीत यंदा मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्स आयटी इंजिनिअर्सची भरती होणार आहे. कंपनीचे सीएफओ जयेश संघराजका यांनी याबाबत माहिती दिली आहे. पहिल्या तिमाहित झालेल्या फ्रेशर्सच्या भरतीव्यतिरिक्त ही भरती असणार आहे. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महत्वाची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसनं यंदाच्या आर्थिक वर्षात मेगा फ्रेशर्सची भरती घोषणा केली आहे. त्यामुळं आगामी काळात ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ही मोठी संधी असणार आहे. गेल्या अर्थिक वर्षात कंपनीनं ११,९०० फ्रेशर्सना नोकरीच्या संधी दिल्या होत्या. पण त्याच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत अर्थात २०२३ च्या तुलनेत यात ७६ टक्के घट झाली होती. कारण २०२३-२४ या अर्थिक वर्षात कंपनीनं तब्बल ५०,००० फ्रेशर्सची भरती केली होती.
इन्फोसिसच्या १८ जुलै रोजी पार पडलेल्या पहिल्या तिमाहितील कॉन्फरन्समध्ये बोलताना कंपनीचे सीएफओ अर्थात चीफ फायनान्शिअल ऑफिसर जयेश संघराजका यांनी सांगितलं की, गेल्या काही तिमाहींमध्ये आपण वेगवान भरती प्रक्रिया राबवली आहे. यामध्ये आपण कंपनीच्या कॅम्पसमध्ये आणि बाहेरच्या लोकेशनलाही मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्सची भरती केली. गेल्या तिमाहितीच्या तुलनेत या तिमाहित मात्र २००० कमी फ्रेशर्स आपण भरले. यंदा 15,000 ते 20,000 फ्रेशर्सना कामावर घेण्याचा विचार कंपनी करत आहे, पण कंपनीची वाढ कशी होतेय यावर ते अवलंबून आहे, असंही यावेळी संघराजका यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, दुसरीकडं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या आर्थिक वर्षीत सुमारे 40,000 फ्रेशर्सची भरती करणार आहे, ज्यापैकी पहिल्या तिमाहीत सुमारे 11,000 प्रशिक्षणार्थींना कंपनीनं आधीच नियुक्ती दिली आहे.
Infosys Recruitment 2024: Great opportunity to work in Infosys Company. Infosys has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill 15 to 20 Thousand vacancies. Further details are as follows:-
Infosys कंपनी अंतर्गत Customer Support process पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांना नोकरीची (Infosys Recruitment 2023) संधी उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी फ्रेशर्स तसेच अनुभवी दोन्ही उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. एकूण 30 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात आहे.
सदर पदांची भरती थेट मुलाखतीव्दारे केली जाणार आहे. यासाठी 9 आणि 10 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.00 यावेळेत पुणे येथे मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे.
मुलाखतीचा पत्ता – फेज 1, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, बिल्डिंग B1, तळमजला, हिंजवडी, पुणे, महाराष्ट्र 411057
Infosys मध्ये नोकरीसाठी इच्छूक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीला येण्यापूर्वी खालील लिंकवरून नोंदणी करणे आवश्यक आहे.
कामाचे स्वरूपआणि आवश्यक पात्रता
कॉल/चॅट/मेलवर क्लायंटच्या समस्या समजून घेणे आणि त्यांचे निराकरण करणे. 24*7 मध्ये काम करण्यासाठी तयार असणे. कार्यालयीन वातावरणात काम करण्याची तयारी असणे विश्लेषणात्मक समस्या सोडवणे, ग्राहकांच्या समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि ग्राहकांच्या समस्यांचे स्वतंत्रपणे, पूर्ण आणि कार्यक्षमतेने निराकरण करण्यासाठी त्वरित विचार करण्याची क्षमता, ग्राहकांच्या वेळेबद्दल आदर दाखवणे, वेळेचे व्यवस्थापन करणे.
आवश्यक कागदपत्रे –
अपडेट केलेला बायोडाटाची प्रिंट, 2 फोटो, ओळखीचा पुरावा (पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार ओळखपत्र/पासपोर्ट), सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे (10वी, 12वी, पदवी (सेम वाइज मार्कशीट, सीएमएम. तात्पुरती आणि मूळ पदवी).
Infosys मध्ये नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांची प्रतीक्षा संपली!! होय; Infosys अंतर्गत 1139 पदांची भरती सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करा. या भरती करिता नोकरी ठिकाण संपूर्ण भारत (बंगलोर, पुणे, मुंबई) अशाप्रकारे आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करिता येणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता व अर्ज करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Infosys मध्ये फिनाकल सल्लागार – वरिष्ठ सहयोगी सल्लागार, ग्लोबल इमिग्रेशन – सहयोगी, आयटी चाचणी, आयटी डिलिव्हरी, स्विफ्ट UI – iOS विकसक, ओरॅकल GTM सल्लागार, AWS/ Azure/ GCP सल्लागार, कामगिरी चाचणी, मेनफ्रेम वरिष्ठ विकासक, मेनफ्रेम लीड, प्रिन्सिपल टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट व इत्यादी पदांची भरती करण्यात येत आहे.
पूर्ण जाहिरात/ अर्ज लिंक – https://bit.ly/3QcQYxZ
खुशखबर!! Amazon मध्ये नोकरीची मोठी संधी, 92,000+ पदांची बंपर भरती सुरु
Infosys Bharti 2022
Infosys Recruitment 2022: The company has decided to hire another 50,000 employees. For the fiscal ended March 2022, Infosys’ revenue grew by 22.7 per cent. As a result, the company has made a profit of Rs 5,686 crore. IT services revenue is projected to grow by 12 to 15 per cent in the current financial year. Further details are as follows:-
इन्फोसिस या देशातील दुसऱ्या क्रमाकांच्या सॉफ्टेवेअर सेवा कंपनीला यंदा १२ टक्के वाढीव नफा मिळाला आहे. त्यामुळे कंपनीने आणखी ५० हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
- मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात इन्फोसिसचा महसूल २२.७ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे कंपनीला ५ हजार ६८६ कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे.
- चालू आर्थिक वर्षात माहिती तंत्रज्ञान सेवांच्या महसुलात १२ ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.
- ग्राहकांनी आमच्यावर कायम ठेवलेल्या विश्वासामुळे आम्हाला मार्केट शेअर मिळत राहिला आहे, असे इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख यांनी सांगितले.
- इन्फोसिसचे मुख्य अर्थ अधिकारी म्हणाले, “भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता आम्ही विक्री, पुरवठा आणि संशोधन या दृष्टीने क्षमता विकसित करण्यासाठी गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत”.
Infosys Recruitment 2022 Details
Infosys Recruitment 2022 : While the country is slowly recovering from the second wave of Corona, a number of private sector companies, including the public sector, appear to have started the recruitment process. Infosys, now a leading IT company, will also provide 55,000 jobs. Further details are as follows:-
देशातील सर्वात मोठी IT कंपनी असलेल्या इन्फोसिसमध्ये तब्बल 55 हजार नवीन लोकांची भरती होणार आहे. कंपनीचे सीईओ सलील पारेख यांनी याबाबत बुधवारी माहिती दिली आहे. या भरतीमध्ये अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेच्या पदवीधारकांना संधी मिळणार असल्याचे CEO पारेख यांनी सांगितले.
आयटी उद्योग लॉबी नॅसकॉमच्या वार्षिक NTLF कार्यक्रमाला सीईओ पारेख यांनी आज संबोधित केले. त्यावेळी या नोकरभरतीबाबत माहिती दिली. पारेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2022 साठी 55 हजार नवीन लोकांना इन्फोसिसमध्ये संधी देण्यात येणार आहे. शिवाय वर्ष 2023 मध्ये यापेक्षा जास्त लोकांची भरती करू, अशी माहिती सीईओ पारेख यांनी यावेळी दिली.
“इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2022 मध्ये वार्षिक महसुलात 20 टक्के वाढ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळेच नवीन व्यक्तींना कंपनीमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. इन्फोसिस कंपनी नोकरदारांच्या कौशल्यावर जास्त लक्ष केंद्रित करते. त्यासाठी नवीन भरती झालेल्या उमेदवारांना सहा ते 12 आठवड्यांपर्यंत प्रशिक्षण देण्यात येते, अशी माहिती सीईओ पारेख यांनी दिली.
“प्रशिक्षित म्हणून भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना दहा वर्षांत स्वत:च्या कौशल्यात वाढ करावी लागणार आहे. परंतु, तंत्रज्ञान सतत बदलत असल्याने तरुण पदवीधरांनी दर तीन ते पाच वर्षांनी स्वत:च्या कलागुणांना वाव देत नवीन कौशल्य प्राप्त केले पाहिजे. इन्फोसिसला भविष्यात वाढीसाठी खूप चांगली संधी आहे. याबरोबरच भविष्यातील कामांसाठी कुशल कर्मचार्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे सीईओ पारेख यांनी सांगितले.
“ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणावर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हाती घेऊन काम केल्यामुळे कंपनी विक्रेत्यांसह आणि इतर भागधारकांसोबत काम करण्यास तयार आहे. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक क्लाउड, खासगी क्लाउड आणि प्लॅटफॉर्मला सेवा कार्य म्हणून एकत्रित करू शकते,” असे सीईओ पारेख म्हणाले.
Table of Contents
Where is this job and what is the job please tell me
Hii