मोठी संधी! इन्फोसिसमध्ये होणार 50 हजार जणांची नोकर भरती!

Infosys Recruitment 2022

Infosys Jobs 2022

Infosys Recruitment 2022: The company has decided to hire another 50,000 employees. For the fiscal ended March 2022, Infosys’ revenue grew by 22.7 per cent. As a result, the company has made a profit of Rs 5,686 crore. IT services revenue is projected to grow by 12 to 15 per cent in the current financial year. Further details are as follows:-

इन्फोसिस या देशातील दुसऱ्या क्रमाकांच्या सॉफ्टेवेअर सेवा कंपनीला यंदा १२ टक्के वाढीव नफा मिळाला आहे. त्यामुळे कंपनीने आणखी ५० हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 • मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात इन्फोसिसचा महसूल २२.७ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे कंपनीला ५ हजार ६८६ कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे.
 • चालू आर्थिक वर्षात माहिती तंत्रज्ञान सेवांच्या महसुलात १२ ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.
 • ग्राहकांनी आमच्यावर कायम ठेवलेल्या विश्वासामुळे आम्हाला मार्केट शेअर मिळत राहिला आहे, असे इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख यांनी सांगितले.
 • इन्फोसिसचे मुख्य अर्थ अधिकारी म्हणाले, “भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता आम्ही विक्री, पुरवठा आणि संशोधन या दृष्टीने क्षमता विकसित करण्यासाठी गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत”.

Infosys Recruitment 2022 Details 

Infosys Recruitment 2022 : While the country is slowly recovering from the second wave of Corona, a number of private sector companies, including the public sector, appear to have started the recruitment process. Infosys, now a leading IT company, will also provide 55,000 jobs. Further details are as follows:-

देशातील सर्वात मोठी IT कंपनी असलेल्या इन्फोसिसमध्ये तब्बल 55 हजार नवीन लोकांची भरती होणार आहे. कंपनीचे सीईओ सलील पारेख यांनी याबाबत बुधवारी माहिती दिली आहे. या भरतीमध्ये अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेच्या पदवीधारकांना संधी मिळणार असल्याचे CEO पारेख यांनी सांगितले. 

आयटी उद्योग लॉबी नॅसकॉमच्या वार्षिक NTLF कार्यक्रमाला सीईओ पारेख यांनी आज संबोधित केले. त्यावेळी या नोकरभरतीबाबत माहिती दिली. पारेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2022 साठी 55 हजार नवीन लोकांना इन्फोसिसमध्ये संधी देण्यात येणार आहे. शिवाय वर्ष 2023 मध्ये यापेक्षा जास्त लोकांची भरती करू, अशी माहिती सीईओ पारेख यांनी यावेळी दिली.

“इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2022 मध्ये वार्षिक महसुलात 20 टक्के वाढ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळेच नवीन व्यक्तींना कंपनीमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. इन्फोसिस कंपनी नोकरदारांच्या कौशल्यावर जास्त लक्ष केंद्रित करते. त्यासाठी नवीन भरती झालेल्या उमेदवारांना सहा ते 12 आठवड्यांपर्यंत प्रशिक्षण देण्यात येते, अशी माहिती सीईओ पारेख यांनी दिली.

“प्रशिक्षित म्हणून भरती  झालेल्या कर्मचाऱ्यांना दहा वर्षांत स्वत:च्या कौशल्यात वाढ करावी लागणार आहे. परंतु, तंत्रज्ञान सतत बदलत  असल्याने तरुण पदवीधरांनी दर तीन ते पाच वर्षांनी स्वत:च्या कलागुणांना वाव देत नवीन कौशल्य प्राप्त केले पाहिजे. इन्फोसिसला भविष्यात वाढीसाठी खूप चांगली संधी आहे. याबरोबरच भविष्यातील कामांसाठी कुशल कर्मचार्‍यांवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे सीईओ पारेख यांनी सांगितले.

“ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणावर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हाती घेऊन काम केल्यामुळे कंपनी विक्रेत्यांसह आणि इतर भागधारकांसोबत काम करण्यास तयार आहे. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक क्लाउड, खासगी क्लाउड आणि प्लॅटफॉर्मला सेवा कार्य म्हणून एकत्रित करू शकते,” असे सीईओ पारेख म्हणाले.


Infosys Jobs 2022

Infosys Recruitment 2022 – कोरोना संकट काळात माहिती आणि तंत्रज्ञान म्हणजेच IT क्षेत्रातील कंपन्या यशस्वी घोडदौड करताना पाहायला मिळत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक असलेल्या आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आयटी कंपन्या आपल्याकडील अनेकविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यानंतर देश हळूहळू सावरत असताना सरकारी क्षेत्रासह खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी नोकर भरती प्रक्रिया सुरू केल्याचे दिसत आहे. यातच आता आघाडीची IT कंपनी असलेल्या Infosys नेही ५५ हजार नोकऱ्या देणार असल्याचे म्हटले आहे.

IT क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिस कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी नीलांजन रॉय यांनी सांगितले की, देशातील प्रतिभा, कौशल्य यांना प्रोत्साहन देण्यावर इन्फोसिस भर देत आहे. तसेच याला आणखी उत्तम करण्यासाठी कंपनी गुंतवणूक वाढवण्याचा विचार करत आहे. याचाच एक भाग म्हणून ग्लोबल हायरिंग प्रोग्राम अंतर्गत कंपनी ५५ हजार किंवा यापेक्षा अधिक भरती करणार आहे.

Jobs In Infosys 2022 | Infosys Recruitment 2022

Infosys Recruitment 2022 – According to the information received from Infosys, the number of employees working in Infosys in December 2020 was 2 lakh 49 thousand 312. It has increased to 2 lakh 92 thousand 067 in December 2021. Out of this, the number of female employees is 39.6 per cent, according to the company. On the other hand, IT giants like TCS, Infosys and Wipro have released their quarterly results.

From October to December 2021, these companies are said to have made huge profits. Infosys’s profit has gone up from Rs 5,197 crore to Rs 5,809 crore. TCS, meanwhile, made a profit of Rs 9,769 crore during the same period, while Wipro made a profit of Rs 2,970 crore. As far as staff numbers are concerned, TCS currently has 5 lakh 56 thousand 986 employees, out of which 2 lakh are women. Wipro also has 2 lakh 31 thousand 671 employees.


Infosys Skill Development Program Details 

Infosys Recruitment 2021 : For the first time in the country, Infosys is cooperating for the benefit of students in Maharashtra. This will benefit about 40 lakh students and one lakh professors and non-teaching staff. This education is completely free from Infosys and will not be a financial burden on the state government. Further details are as follows:-

Memorandum of Understanding (MoU) 

राज्यातील विविध वरिष्ठ महाविद्यालयातपारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना (students) नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण आणि प्रशिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्यआधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठीउपयोग व्हावा म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इन्फोसिस कंपनीसोबत (Infosys company agreement) सामंजस्य करार केला आहे, यासाठीची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

Infosys and Maharashtra GovernmentMoU Regarding Free Education

Vikas Chandra Rastogi, Principal Secretary, Department of Higher and Technical Education, Dhanraj Mane, Director of Higher Education, Dr. Abhay Wagh, Director of Technical Education, Tirumala Arohi of Infosys, Santosh Anandapur, Kiran M. G, concerned officers were present. The Minister for Higher and Technical Education Samant was speaking at the press conference held after that.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत म्हणाले, देशात पहिल्यांदाच इन्फोसिस महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी सहकार्य करत आहे. यामुळे जवळपास 40 लाख विद्यार्थ्यांना आणि एक लाख प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना उपयोग होणार आहे. हे शिक्षण पूर्णपणे इन्फोसिसकडून मोफत असून याचा राज्य शासनावर आर्थिक भार पडणार नाही.

इन्फोसिस या कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व (सी एस आर) अंतर्गत विविध विषयांवरील आणि विविध कालावधीचे 3 हजार 900 पेक्षा अधिक ऑनलाईन कोर्सेस तयार केले असून हे सर्व कोर्सेस कंपनीच्या स्प्रिंग बोर्ड (Spring Board) या ऑनलाईन मंचावर उपलब्ध करुन दिले आहेत. हे अभ्यासक्रम राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नि:शुल्क आणि औपचारिक अभ्यासक्रमासोबतच उपलब्ध राहणार आहेत. पथदर्शी प्रकल्प म्हणून नागपूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि रत्नागिरी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये संगणकाच्या प्रोग्रामिंग भाषा, क्लाउड तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दिमत्ता यासारख्या तांत्रिक कोर्सेस सोबतच बिझिनेस कम्युनिकेशन, बिझिनेस इंग्लिश, अर्थशास्त्र, लेखन कौशल्य, सकारात्मकता, नेतृत्व कौशल्य इत्यादी विषयांचे कोर्सेस असणार आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.

3 हजार 900 अभ्यासक्रम

 • या सामजंस्य करारामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत 1 हजार 600 महाविद्यालयातील 10 लाख विद्यार्थ्यांना आणि उच्च शिक्षण संचालनालयाअंतर्गत 3 हजार महाविद्यालयातील 30 लाख विद्यार्थ्यांना अशा एकूण ४० लाख विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे फायदा होणार आहे.
 • त्यांना इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड या मंचावर उपलब्ध असलेले 3 हजार 900 पेक्षा अधिक कोर्सेस अभ्यासासाठी उपलब्ध होतील आणि सोबतच प्रशिक्षण पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र देखील प्राप्त होईल.
 • तसेच इन्फोसिसच्या म्हैसूर येथील इन्स्टिट्युटमध्ये संबंधित प्राध्यापक, अधिकारी यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याचेही सामंत यावेळी सांगितले.

या दोन महाविद्यालयांची निवड 

The curriculum specially designed for Government Engineering College, Ratnagiri and Government Science Institute, Nagpur, will provide students with all the above facilities along with project internship facility and LMS facility. Project internships and vocational skills enhancement courses will help students in both these institutions become employable.

या उपक्रमाची वैशिष्ट्ये 

 • या मंचावरील कृती प्रवण अध्ययनामुळे रोजगारासाठी आवश्यक व्यावसायिक कौशल्ये विकसित करून रोजगारक्षमता वाढविण्यासाठी या कोर्सेसची विद्यार्थ्यांना मदत होईल.
 • अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रोग्रामिंग लॅंग्वेजेस, प्रकल्प व्यवस्थापन, संभाषण कौशल्ये इत्यादी व्यवसायाभिमुख कौशल्ये प्राप्त करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व व्यावसायिक रोजगारविषयक कौशल्ये प्राप्त होतील.
 • उच्च शिक्षण संस्थामधील शिक्षक वर्गाला या मंचावर उपलब्ध सर्व कोर्सेस वापरता येतील.
 • उपक्रमाअंतर्गत डिजीटल किंवा आभासी पद्धतीच्या वर्ग खोल्या तयार करुन त्याद्वारे विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचे काम संस्था करु शकतील.
 • तसेच याद्वारे ऑनलाईन परिक्षा घेण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे.

The courses available on the Springboard platform can be taught as optional courses for the students and for that the teachers will conduct the course as per their requirements. Maharashtra State Teacher Training Institutes which will conduct courses or training classes. Training in content creation, learning management systems, student assessment techniques, etc. will also be provided by Infosys subject matter experts.


Infosys Bharti 2021 Details 

Infosys Recruitment 2021 : If you are a fresher, this is a golden opportunity for you. Meanwhile, Infosys, the country’s second-largest IT company, said on Wednesday that it would hire about 45,000 freshers this year. Further details are as follows:-

Infosys to hire 45000 freshers this year

Infosys उघडणार नोकऱ्यांचा पेटारा; या वर्षी कंपनी 45 हजार फ्रेशर्सची भरती करणार! जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. दरम्यान, देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने (Infosys) बुधवारी सांगितले की, या वर्षी कंपनीमध्ये जवळपास 45,000 फ्रेशर्सची भरती करणार आहे.

Infosys Mega Recruitment 2021

इन्फोसिसकडून ही घोषणा अशा वेळी आली आहे, ज्यावेळी कंपनीचा अॅट्रिशन रेट म्हणजेच कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दर लक्षणीय वाढला आहे आणि आयटी कंपन्यांमध्ये चांगले टेक्नॉलॉजी टॅलेंट घेण्याची स्पर्धा आहे.  इन्फोसिसचे सीओओ (UB) प्रवीण राव यांनी सांगितले की, “बाजारातील सर्व क्षमतेचा लाभ घेण्यासाठी आम्ही आमच्या कॉलेज ग्रॅज्युएट हायरिंग प्रोग्रॉमला या वर्षी वाढवून 45,000 पर्यंत घेऊन जाणार आहोत.  याव्यतिरिक्त, आम्ही आमच्या कर्मचार्‍यांच्या गरजा पूर्ण करणे सुरू ठेवणार आहोत, ज्यात हेल्थ आणि वेलनेसचे उपाय, रिस्किलिंग प्रोग्रॉम आणि करिअर वाढीच्या संधी यांचा समावेश आहे.”


Infosys Recruitment 2021 Details 

Infosys Recruitment 2021 : Infosys is going to have big recruitment in the near future. IT professionals will have a great opportunity to work in this company. Infosys is currently recruiting from across India. Infosys is currently recruiting in Bangalore, Coimbatore, Chennai, Hyderabad, Bhubaneswar, and Mumbai. Further details are as follows:-

Infosys Jobs 2021

देशातील दिग्गज IT कंपनी Infosys मध्ये येत्या काही काळात मोठी पदभरती होणार आहे. IT प्रोफेशनल्सना या कंपनीत काम करण्याची मोठी संधी मिळणार आहे. देशात कोरोनामुळे इतर कंपन्या जरी नुकसान सहन करत असतील तरी IT क्षेत्राला (IT sector jobs) मात्र उधाण आलं आहे. देशातील अनेक IT कंपन्यांना या काळात बराच फायदा झाला आहे. त्यामुळे या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचनुसार आता इन्फोसिस नं पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

खुशखबर! TCS या मोठ्या आयटी कंपनीत मोठी नोकरभरती! TCS Recruitment 2021 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सध्या, इन्फोसिस RPA डेव्हलपर/कन्सल्टंटसह अनेक जॉब प्रोफाइलसाठी उमेदवार नियुक्त करत आहे. इन्फोसिस ज्या इतर रिक्त पदांसाठी भरती करत आहे त्यामध्ये प्रिन्सिपल आर्किटेक्ट, स्पेशॅलिस्ट प्रोग्रामर -जावा मायक्रो सर्व्हिसेस, टेक्नॉलॉजी अॅनालिस्ट – मर्न स्टॅक, टेक्नॉलॉजी लीड – रिएक्ट जेएस, कन्सल्टंट स्पेशालिस्ट प्रोग्रामर -बिगडेटा आणि अझूर डेव्हलपर्स यांचा समावेश आहे.

Infosys Mega Bharti 2021

“Every career is a journey and that is why candidates at Infosys get the right opportunity and support to move forward in their careers as well as the opportunity for further success,” Infosys said on its official website. 

Infosys President Nandan Nilekani had said in June that the company had recently demonstrated its talent by recruiting 19,230 graduates from India and 1,941 from abroad.

Infosys Recruitment Job Location 

या लोकेशन्ससाठी असणार भरती –

इन्फोसिस सध्या भारतभरातील अनेक भरती करत आहे. बेंगळुरू, कोईमतूर, चेन्नई, हैदराबाद, भुवनेश्वर आणि मुंबई या काही महत्त्वाच्या ठिकाणी सध्या Infosys ची भरती सुरु आहे. इतरही काही लोकेशन्सवर इन्फोसिस येणाऱ्या काही काळामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहे.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Omkar says

  Where is this job and what is the job please tell me

 2. Dnyandev Bhangare says

  Hii

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड