Infosys Recruitment 2025
यंदा आर्टिफिशियल इंटेलिजेन्स अर्थात एआयने आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या कमी केल्या. मात्र, आता याच एआयच्या जोरावर नोकऱ्यांची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने नवीन अभियंत्यांसाठी पगाराचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. कंपनीने आपल्या ‘स्पेशलाइज्ड टेक्नॉलॉजी’ विभागासाठी वार्षिक २१ लाख रुपयांपर्यंतच्या पॅकेजची घोषणा केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले असून, यामुळे इन्फोसिस ही देशातील फ्रेशर्सना सर्वाधिक पगार देणारी आयटी कंपनी ठरली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत व्हाट्सअँप चॅनल येथे क्लिक करून लगेच जॉईन करा.
२०२५ मध्ये पदवीधर होणाऱ्या इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी इन्फोसिसने विशेष ‘ऑफ-कॅम्पस’ भरती मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये निवडक तांत्रिक भूमिकांसाठी वार्षिक ७ लाख ते २१ लाख रुपयांपर्यंतचे पगार देऊ केले आहेत. कंपनीचे चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर शाजी मॅथ्यू यांनी स्पष्ट केले की, कंपनीने आता ‘AI-First’ धोरण अवलंबले असून त्यासाठी सखोल तांत्रिक ज्ञान असलेल्या तरुणांची गरज आहे. पहिल्या तिमाहीतील कंपनीची कामगिरी ही एंटरप्राइझ एआय क्षमतांची ताकद दर्शवते. तसेच ३००,००० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचे ते फळ आहे. कंपनीने ३.८ अब्ज डॉलरचे कार्यादेश प्राप्त केले असून जे मजबूत ग्राहक संबंध दर्शवतात, असे इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख म्हणाले.
वित्तीय सेवा हे सर्वात मोठे क्षेत्र राहिले, ज्याने आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत एकूण महसुलात सुमारे २७.९ टक्के योगदान दिले, त्यानंतर उत्पादन १६.१ टक्के आणि किरकोळ विक्री १३.४ टक्के होती. भौगोलिकदृष्ट्या, उत्तर अमेरिकेचा तिमाही महसुलात ५६.५ टक्के वाटा होता, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील ५८.९ टक्क्यांवरून कमी आहे. युरोपने आपला वाटा विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २८.४ टक्क्यांवरून ३१.५ टक्क्यांपर्यंत वाढवला.
मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसचा नफा चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 11 टक्क्यांहून अधिक वाढून सुमारे 6,806 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा अंदाजे 6,106 कोटी रुपये होता. तिसऱ्या तिमाहीत इन्फोसिसचा महसूल सात टक्क्यांहून अधिक वाढून सुमारे 41,764 कोटी रुपये झाला आहे. उत्तर अमेरिकेतील इन्फोसिसची वाढ सुमारे पाच टक्के आहे. या आर्थिक वर्षात कंपनीच्या महसुलात 4.5 टक्के ते 5 टक्के वाढ अपेक्षित आहे. गेल्या तिमाहीत कंपनीने 5,591 कर्मचाऱ्यांची भरती केली होती. त्यांची एकूण कामगार संख्या 3,23,379 आहे. कंपनीने सांगितले की चालू आर्थिक वर्षात 20,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.
गेल्या वर्षी, कंपनीने नवीन कर्मचाऱ्यांची भरती पुढे ढकली होती. त्यामुळे कंपनीला टीकेचा सामना करावा लागला होता. यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांची भरती केली होती. फ्रेशर्सच्या जॉइनिंगची तारीख पुढे ढकलल्यास कंपनीविरोधात निदर्शने करण्यात येतील, असा इशारा सॉफ्टवेअर कामगारांच्या संघटनेने दिला होता. हे तरुण अभियंते जवळपास दोन वर्षांपासून रुजू होण्याच्या प्रतीक्षेत होते. त्यांना 2022 मध्ये कंपनीत सिस्टम इंजिनीअर म्हणून नियुक्तीची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या रुजू होण्यास बराच उशीर झाला. गेल्या काही वर्षांत आयटी कंपन्यांकडून फ्रेशर्सचे जॉइनिंग पुढे ढकलल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
Infosys Current Recruitment Process Link
गेल्या दीड वर्षापासून आयटीतील रोजगाराची बंद दारे आता नवोदितांसाठी सुवर्णसंधी घेऊन आली आहेत. आयटी क्षेत्रातील नावाजलेले नाव असलेल्या इन्फोसिसने कॅम्पस इंटव्ह्यूच्या माध्यमातून निवडलेल्या मुलांना ९ लाख रुपयांचे वार्षिक वेतन देण्याचे ठरविले आहे. पदवी हातात पडताच घसघशीत वेतनाची नोकरी उपलब्ध होणार आहे. टीसीएसने यापूर्वीच प्राईम या प्रकल्पाअंतर्गत नवोदितांना ९ ते अकरा लाख रुपये वार्षिक वेतन देऊ करणार असल्याचे जाहीर केले आहे. बेंगळुरू येथील एका कंपनीने नवोदितांना तीन ते साडेतीन लाख रुपयांचे वार्षिक वेतन देऊ केले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















