राज्याच्या माहिती जनसंपर्क खात्यात काही जिल्ह्य़ांत पदे रिक्त
Information Public Relations Department Bharti
Information Public Relations Department Bharti : सरकार आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या, सरकारी योजनांची प्रसिद्धी, प्रचार करणाऱ्या राज्याच्या माहिती जनसंपर्क विभागाला सध्या मनुष्यबळाची चणचण आहे. या विभागात अनेक पदे रिक्त आहेत.
महासंचालकाच्या अखत्यारीत मुंबईत संचालकांची पाच, तर विभागीय पातळीवर उपसंचालकांची सहा पदे आहेत.
मुंबईतील संचालक (प्रशासन) अजय आंबेकर यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. विभागीय उपसंचालकांपैकी अमरावती विभागाचे उपसंचालक राधाकृष्ण मुळी मे महिन्यात निवृत्त होणार आहेत. कोल्हापूर विभागाचे उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयातील जनसंपर्क अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे आणि नाशिकमध्येही माहिती उपसंचालकांचे पद रिक्त आहे. चंद्रपूर आणि गोंदियामध्ये जिल्हा माहिती अधिकारी हे पद रिक्त आहे. चंद्रपूरचा अतिरिक्त कार्यभार वर्धा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे, तर गोंदियाचा अतिरिक्त कार्यभार भंडारा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे आहे. जिल्हापातळीवरही वर्ग -२ आणि वर्ग-३ ची साधारणपणे निम्मी पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामकाज अधिक असते. त्यामुळे या खात्यात पदभरतीची प्रक्रिया तातडीने राबवण्याची गरज आहे. शासनाने इतर काही विभागांच्या भरती प्रक्रियेला मंजुरी दिली आहे, हे येथे उल्लेखनीय. माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, रिक्तपदे सर्वच विभागांत आहेत. आम्ही इतर अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार दिल्याने कामकाजावर परिणाम होत नाही. ही पदे भरली जावी म्हणून शासनाकडे प्रयत्न करू.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सोर्स : लोकसत्ता
Online form kasa bharicha ya varil exam denyasathi