रेल्वेत सुरक्षा श्रेणीची दीड लाखाहून अधिक पदे रिक्त ! In – Indian Railways Bharti 2024

Indian Railways Bharti 2024

Indian Railways Bharti 2024

भारतीय रेल्वेत सुरक्षा श्रेणी अंतर्गतच्या सुमारे १० लाख मंजूर पदांपैकी दीड लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत, असे रेल्वे मंत्रालयाने मार्चमध्ये माहिती अधिकार कायद्यांतर्गतच्या अर्जाला उत्तर देताना सांगितले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पदे रिक्त असली तरी रेल्वेच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून, रेल्वेने गेल्या १० वर्षात यासंदर्भात मोठी गुंतवणूक केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षा श्रेणीच्या पदांमध्ये लोको पायलट, लोको इन्स्पेक्टर, ट्रॅक मेंटेनर, स्टेशन मास्टर्स, पॉइंट्समन, इलेक्ट्रिक सिग्नल मेंटेनर आणि सिग्नलिंग सुपरवायझर यांचा समावेश होतो. रेल्वेच्या सुरक्षा श्रेणीतील मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची एकूण संख्या अनुक्रमे १० लाख ९४१, ८ लाख ४८ हजार २०७ आणि १ लाख ५२ हजार ७३४ अशी आहेत.

 


 

भारतीय रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा पुरविण्याचा दावा करीत आहे; परंतु मागील काही वर्षांपासून असिस्टंट लोको पायलटची भरती रेल्वे प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे लोको पायलट गुड्सची पदोन्नती रखडली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

RPF मध्ये 4660 पदांसाठी परत एकदा मिळाली अर्ज शुल्क भरण्याची संधी। RPF Recruitment 2024

स्पेशल प्रवासी रेल्वे गाडीकरिता लोको पायलटची मागणी
नऊ तासांपेक्षा अधिक वेळ येथे कर्मचाऱ्यांना काम करणे दुरापास्त ठरले आहे. चार्जशीट मिळण्याचा धोका अधिक वाढल्याने अधिकारी व कर्मचारी वर्ग तणावात आहे. भारतीय प्रवासी रेल्वेला सर्वसामान्य प्रवाशांची लाईफलाईन म्हटले जाते परंतु मागील काही वर्षांपासून असिस्टंट लोको पायलट (रेल्वे चालक) यांची पदभरती करण्यात आली नाही. तसेच नियमित सेवानिवृत्त होणाऱ्या लोको पायलटची संख्या अधिक आहे. त्यामुळे लोको पायलट गुड्स या पदावर पदोन्नती रखडली आहे. येथे लोक पायलट्सना आहे त्याच पदावर कार्य करावे लागत आहे. रेल्वे प्रशासनात कर्मचाऱ्यांचा स्टाफही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे..

रेल्वेतील ५,६९६ सहायक लोको पायलटसाठी अर्ज केला असेल तर लगेच बघा नवीन माहीती नाहीतर अर्ज होणार बाद!! । Railway Loco Pilot Bharti 2024

लोको पायलट गुड्स पदोन्नती नाही

रेल्वे प्रशासनाने असिस्टंट लोको पायलटची भरती केली नाही. त्यामुळे लोको पायलट्स गुइस यांची पदोन्नती रखडली आहे. दरवर्षी रेल्वे प्रशासन रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती स्पर्धा परीक्षांमार्फत करीत होती; परंतु मागील काही वर्षांपासून रेल्वे प्रशासनाने कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविली नाही. रेल्वे प्रशासन लोको पायलटची भरती कधी करणार……….

 


Previous Update केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) रेल्वे मंत्रालयाने मोठी जबाबदारी दिली आहे. या जबाबदारी अंतर्गत आता UPSC ला रेल्वे मंत्रालयाच्या परीक्षेचे आयोजन करावे लागेल, जी 2023 मध्ये घेतली जाईल. रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, ‘इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस’ (IRMS) ची भरती खास तयार केलेल्या परीक्षेद्वारे केली जाईल. युनियन लोकसेवा आयोग (UPSC) 2023 पासून ही भरती परीक्षा आयोजित करेल.

  • मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा परीक्षा (IRMSE) ही दोन टप्प्यांची परीक्षा असेल ज्यामध्ये प्राथमिक स्क्रीनिंग परीक्षा आणि त्यानंतर मुख्य लेखी परीक्षा आणि मुलाखत असेल.
  • मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की पात्र उमेदवारांना परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच IRMS (मुख्य) लेखी परीक्षेत बसण्यासाठी नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षेत बसावे लागेल.

IRMSE Pattern 

असं असेल IRMSE चं पॅटर्न

  • आयआरएमएस (मुख्य) परीक्षेत सेट केलेल्या विषयामध्ये पारंपारिक निबंध प्रकारच्या प्रश्नांसह चार पेपर असतील.
  • पहिल्या पेपरमध्ये दोन पात्रता पेपर असतील, जे 300-300 गुणांचे असतील. पेपर A उमेदवाराने निवडलेल्या भारतीय भाषेत असेल.
  • तर, बी पेपर इंग्रजीमध्ये घेण्यात येईल. तेथे ऐच्छिक विषयाचे 250 गुणांचे दोन पेपर असतील.
  • 100 गुणांची व्यक्तिमत्व चाचणीही घेतली जाईल.
  • स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी आणि वाणिज्य आणि लेखा हे पर्यायी विषय आहेत. पात्रता पेपर आणि पर्यायी विषयांचा अभ्यासक्रम नागरी सेवा परीक्षा (CSE) सारखाच असेल.
  • CSE आणि IRMS (मुख्य) परीक्षेला बसणाऱ्या उमेदवाराला दोन्ही परीक्षांसाठी वरीलपैकी कोणताही पर्यायी विषय निवडण्याचा पर्याय असेल.
  • त्याला पर्यायी विषय स्वतंत्रपणे निवडण्याचा पर्यायही असेल.

Railways Bharti Eligibility Criteria 2022

शैक्षणिक पात्रता

  • पात्रता पेपर आणि वैकल्पिक विषयासाठी भाषा माध्यम आणि लिपी सीएसई (मुख्य) सारखीच असेल.
  • वयोमर्यादा आणि उमेदवाराला परीक्षेला बसण्याचा पर्याय CSE प्रमाणेच असेल.
  • IRMSE परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता म्हणून अभियांत्रिकी, वाणिज्य किंवा चार्टर्ड अकाउंटन्सीची पदवी असणे आवश्यक आहे.

UPSC गुणवत्तेच्या क्रमाने चार विषयांनुसार अंतिम यादी तयार करेल आणि जाहीर करेल. CSE आणि IRMSE या दोन्हींसाठी प्राथमिक आणि मुख्य लेखी परीक्षेच्या फेऱ्या एकाच वेळी घेतल्या जातील. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की CSE सोबत IRMSE ला सूचित केले जाईल. UPSC च्या 2023 च्या परीक्षेच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, CSE (Prelims) अनुक्रमे 1 फेब्रुवारी रोजी अधिसूचित केले जाईल आणि परीक्षा 28 मे रोजी घेतली जाऊ शकते.


Previous Update –

खेळाडूंसाठी मोठी बातमी!! स्पोर्ट्स कोटामधून रेल्वेत होणार बंपर भरती | Indian Railways Bharti 2022

Indian Railways Bharti 2022: Good news for sports persons. Indian Railways is going to recruit sports persons to fill various vacancies. The applications are invited for Group C posts. The online applications start on the 30th of August 2022 & the last date of submission of the applications is the 29th of September 2022. Further details are as follows:-

भारतीय रेल्वे क्रीडा कोटा (Railway Sports Quota Indian Railway) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Railway Sports Quota Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.

  • गट क या पदांसाठी ही भरती असणार आहे.
  • पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2022 असणार आहे.
  • तर अर्ज सुरु होण्याची तारीख 30 ऑगस्ट 2022 असणार आहे.
JOB TITLE Railway Sports Quota Recruitment 2022
या पदांसाठी भरती गट क (RRC/ ER/ Sports Quota) एकूण जागा – 21
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव गट क (RRC/ ER/ Sports Quota) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये नमूद केल्यानुसार खेळांमध्ये खेळाडू म्हणून भाग घेतला असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
वयोमर्यादा  18 ते 25 वर्षांच्या दरम्यान
भरती शुल्क सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस साठी – रु. 500/-

SC/ST/ESM/स्त्रिया/EBC साठी – रु. 250/-

Railway Sports Quota Indian Railway

या पदांसाठी भरती

  • गट क (RRC/ ER/ Sports Quota)
  • एकूण जागा – 21

Eligibility Criteria For Railway Sports Quota Recruitment 2022

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

गट क (RRC/ ER/ Sports Quota) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये नमूद केल्यानुसार खेळांमध्ये खेळाडू म्हणून भाग घेतला असणं आवश्यक आहे.
  • तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  • या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

वयोमर्यादा –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

भरती शुल्क –

  • सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस साठी – रु. 500/-
  • SC/ST/ESM/स्त्रिया/EBC साठी – रु. 250/-

Importnt Dates For Railway Sport Quota Recruitment 

  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 30 ऑगस्ट 2022
  • अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 29 सप्टेंबर 2022

Railway Bharti Important Documents 

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो
सविस्तर माहिती – https://bit.ly/3KmjY3D

खुशखबर!! रेल्वेत लवकरच 1.4 लाख लोकांना रोजगार!! – Indian Railways Bharti 2022

Indian Railways Bharti 2022 : There are a total of 1.4 Lakhs jobs available in Indian Railways. Indian Railway Recruitment 2022 will soon. The recruitment process for 1.4 lakh posts in Railways is going on and will be completed soon. Further details are as follows:-

Indian Railway Bharti 2022

भारतातील दळणवळण व्यवस्थेचा प्राण समजल्या जाणाऱ्या रेल्वेने आतापर्यंत मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिले असून भविष्यामध्ये या क्षेत्रात नव्याने काही रोजगार निर्माण होणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेमध्ये याबाबतची माहिती दिली. भारतीय रेल्वे आणखी 1.4 लाख लोकांना रोजगार देईल आणि त्यांची भरती करण्याची प्रक्रिया या आधीच सुरू झा्ल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ही भरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 10 लाख नोकऱ्या देण्याच्या घोषणेचा भाग असल्याचे वैष्णव म्हणाले.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पश्चिम रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

  • अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वेत 1.4 लाख पदांसाठी भरती प्रक्रिया सुरूआहे आणि लवकरच ती पूर्ण होईल, राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पूरक प्रश्नांना उत्तर देताना, रेल्वेने या वर्षी आतापर्यंत 18,000 नोकऱ्या दिल्या असल्याचे देखील वैष्णव यांनी सांगितले.
  • काही लोक हे दहा ते वीस हजार रुपये देण्याच्या राणाभीमदेवी थाटामध्ये घोषणा करतात, पण आम्ही प्रत्यक्षात नियुक्त्या केल्या आहेत, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.
  • देशातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात भारतीय रेल्वेचे मोठे योगदान आहे, हे अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, 2014 ते 2022 दरम्यान 3,50,204 लोकांची भरती करण्यात आली आहे.
  • ते म्हणाले, 2014 ते 2022 दरम्यान, भारतीय रेल्वेने 3,50,204 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
  • केवळ या वर्षात, आतापर्यंत तब्बल 18,000 रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
  • पुढे बोलताना वैष्णव यांनी माहिती दिली की, रेल्वे ही एक मोठी संस्था असल्याने, निवृत्ती, राजीनामा, मृत्यू इत्यादींमुळे रिक्त पदे भरणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे.
  • प्रक्रियेदरम्यान, रिक्त पदे उद्भवू शकतात आणि ती नंतर भरली जातात.
  • गेल्या दोन वर्षांमध्ये, 10,189 उमेदवारांची भरती करण्यात आली आहे.

सध्या, सुमारे 1,59,062 पदांसाठी थेट भरती श्रेणीतील रिक्त पदांची भरती विविध टप्प्यांवर आहे, असे देखील त्यांनी सांगितले. यासोबतच अलीकडे, सुमारे 1.15 कोटी अर्जदारांनी रेल्वे ग्रेड IV नोकऱ्यांसाठी अर्ज केले, ज्यात ट्रॅक मेंटेनर, हॉस्पिटलमधील सहाय्यक, लोको शेड, डेपो आणि पॉइंट्समन यांच्यासह इतर लेव्हल1 ग्रेड कॅटेगरीचा समावेश आहे,


Indian Railways Bharti 2022

Indian Railways Bharti 2022: Great opportunity for railway job seekers. There are 1,48,463 vacancies that will be recruited in Railway Department this year. In the last eight years, the railways have provided jobs to an average of 43,678 people every year. Apart from the Union Territories, out of 31.33 lakh Central employees, 40.55 percent are employed in Railways. Further details are as follows:-

पुढील १८ महिन्यांत विविध विभाग आणि मंत्रालयांमध्ये १० लाख नोकऱ्या देण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागात यावर्षी १ लाख ४८ हजार ४६३ पदे भरली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गेल्या आठ वर्षांत रेल्वेने दरवर्षी सरासरी ४३ हजार ६७८ लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. केंद्रशासित प्रदेशांव्यतिरिक्त, ३१.३३ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांपैकी ४०.५५ टक्के रेल्वेमध्ये कार्यरत आहेत.

Indian Railway Vacancy 2022

रेल्वेकडून महत्वाची अपडेट

रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०१४-१५ ते २०२१-२२ पर्यंत एकूण ३ लाख ४९ हजार ४२२ नोकऱ्या देण्यात आल्या. वर्षनिहाय सरासरी पाहिल्यास दरवर्षी ४३,६७८ लोकांना नोकऱ्या मिळाल्या. तर २०२२-२३ मध्ये १ लाख ४८ हजार ४६३ नोकऱ्या दिल्या जाणार आहेत.

  • रेल्वे विभागात नोकरी शोधणाऱ्या आणि रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.
  • रेल्वेत लवकरच बंपर भरती (Railway Recruitment 2022) होणार आहे.
  • यासंदर्भात खुद्द रेल्वेने १४ जून रोजी माहिती दिली. रेल्वेमध्ये यावर्षी १ लाख ४८ हजार ४६३ लोकांना नोकऱ्या (Railway Job) मिळू शकणार आहेत.
  • काही दिवासांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुढील १८ महिन्यांत विविध विभाग आणि मंत्रालयांमध्ये १० लाख नोकऱ्या देण्याचे निर्देश दिले.
  • या पार्श्वभूमीवर रेल्वेने ही घोषणा केली आहे.
  • गेल्या आठ वर्षांत रेल्वेने दरवर्षी सरासरी ४३ हजार ६७८ लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत.

Indian Railway Bharti 2022

वेतन आणि भत्तेवरील खर्च विभागाच्या वार्षिक अहवालानुसार, १ मार्च २०२० पर्यंत, केंद्रीय कर्मचाऱ्यांची संख्या ३१ लाख ९१ हजार इतकी होती. या आकडेवारीत केंद्रशासित प्रदेशांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व विभागांमध्ये ४०.७८ लाख पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यानुसार साधारण २१.७५ टक्के पदे रिक्त आहेत. या कर्मचाऱ्यांचे ९२ टक्के मनुष्यबळ हे पाच मुख्य मंत्रालये किंवा विभागांचे आहे, ज्यात रेल्वे, संरक्षण (नागरी), गृह, महसूल या विभागांचा समावेश आहे. केंद्रशासित प्रदेशांव्यतिरिक्त, ३१.३३ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांपैकी ४०.५५ टक्के रेल्वेमध्ये कार्यरत आहेत.

  • पंतप्रधान कार्यालयाकडून विविध विभाग आणि ९१ मंत्रालयांना रिक्त पदांची यादी तयार करण्यास सांगितल्याची माहिती सरकारशी संबंधित सुत्रांनी दिली.
  • तसेच १० लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • विधानसभा निवडणुकीदरम्यान विविध विरोधी पक्षांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून भाजपला घेरले होते.
  • या पार्श्वभूमीवर नोकरी देण्याच्या हालचालींना वेग आल्याचे म्हटले जात आहे.

Indian Railways Vacant Posts 2022

Indian Railways Bharti 2022 : There are 2.65 lakh vacancies in various categories under Indian Railways. Filling these posts will create employment for millions of youth in the country. Further details are as follows:-

भारतीय रेल्वे अंतर्गत विविध कॅटेगरीमध्ये २.६५ लाख पदे रिक्त आहेत. ही पदे भरली गेल्यास देशातील लाखो तरुणांना रोजगार निर्माण होणार आहे. राज्यसभेत झालेल्या प्रश्नोत्तरादरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती जाहीर केली. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अपडेट मिळू शकणार आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे भरतीमध्ये ८५ टक्के रिक्त जागा गँगमन, कीमन, हेल्पर, पॉइंटमॅन, असिस्टंट मास्टर स्टेशनच्या आहेत. तर १५ टक्के पदे टीटीई, बुकिंग क्लर्क आणि सुपरवायझरच्या आहेत. यामध्ये गॅझेटेड आणि नॉन गॅजेटेड जागांचा समावेश आहे.

Railway Gazetted Seats

मध्य रेल्वेमध्ये ५६, पूर्व किनारपट्टी रेल्वेमध्ये ८७, पूर्व रेल्वेमध्ये १९५, पूर्व मध्य रेल्वेमध्ये १७०, मेट्रो रेल्वेमध्ये २२, उत्तर मध्य रेल्वेमध्ये १४१, उत्तर पूर्व रेल्वेमध्ये ६२, ईशान्य रेल्वेमध्ये ६२ जागा रिक्त आहेत. उत्तर रेल्वे फ्रंटमध्ये ११२, उत्तर रेल्वेमध्ये ११५, उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये १००, दक्षिण मध्य रेल्वेमध्ये ४३, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये ८८, दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये १३७, दक्षिण रेल्वेमध्ये ६५, पश्चिम मध्य रेल्वेमध्ये ५९, पश्चिम रेल्वेमध्ये १७२ रेल्वे आणि इतर घटकांमध्ये ५०७ राजपत्रित पदे रिक्त आहेत.

Railway Non-Gazetted Seats

मध्य रेल्वेमध्ये २७,१७७, पूर्व किनारपट्टी रेल्वेमध्ये ८,४४७, पूर्व रेल्वेमध्ये २८,२०४, पूर्व मध्य रेल्वेमध्ये १५,२६८, मेट्रो रेल्वेमध्ये ८५६, उत्तर मध्य रेल्वेमध्ये ९,३६६, उत्तर-पूर्व रेल्वेमध्ये १४,२३१, ईशान्य सीमा रेल्वे १५,४७७, उत्तर रेल्वे ३७,४३६, उत्तर पश्चिम रेल्वे १५,०४९, दक्षिण मध्य रेल्वे १६, ७४१, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ९,४२२, दक्षिण पूर्व रेल्वे १६,८४७, दक्षिण भारतीय रेल्वे ९,५००, दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये ६,५२५, पश्चिम मध्य रेल्वेमध्ये ११,०७३ पश्चिम रेल्वेमध्ये २६,२२७ आणि इतर युनिटमध्ये १२,७६० नॉन-गॅझेटेड पदे रिक्त आहेत.


Indian Railways Bharti 2022 Details 

Indian Railways Bharti 2022 : There are 2,65,547 vacancies in various sections of the railways. Of these, 2,177 are Gazetted and 2,63,370 are Non-Gazetted. Further details are as follows:-

Indian Railways Recruitment 2022

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Union Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी काल राज्यसभेत सांगितलं की, रेल्वेच्या विविध विभागांत 2,65,547 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 2,177 राजपत्रित आणि 2,63,370 अराजपत्रित पदं आहेत. माकपचे खासदार डॉ. व्ही. शिवासदन (Dr. V. Shiva Sadana) यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिलीय. विविध झोनमध्ये रिक्त असलेल्या राजपत्रित आणि अराजपत्रित पदांची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी सभागृहाला नुकतीच दिली.

The Railway Minister said that 56 Gazetted and 27177 Non-Gazetted posts are vacant in Central Railway. The East Coast Railway has 87 Gazetted and 8477 Non-Gazetted posts vacant. Beth of August sides, 170 gazetted and 15268 non-gazetted posts are vacant in East Central Railway. He said that 195 gazetted and 28204 non-gazetted posts were vacant in Eastern Railway and 22 gazetted and 856 non-gazetted posts were vacant in Metro Railway.

Railway Vacancy 2022 Details 

  • उत्तर मध्य रेल्वे – 141 राजपत्रित, 19366 अराजपत्रित
  • ईशान्य रेल्वे – 62 राजपत्रित, 14231 अराजपत्रित
  • नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे – 112 राजपत्रित, 15677 अराजपत्रित
  • उत्तर रेल्वे – 115 राजपत्रित, 37436 अराजपत्रित
  • उत्तर पश्चिम रेल्वे – 100 राजपत्रित, 15049 अराजपत्रित
  • दक्षिण मध्य रेल्वे – 43 राजपत्रित, 16741 अराजपत्रित
  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे – 88 राजपत्रित, 9422 अराजपत्रित
  • दक्षिण पूर्व रेल्वे – 137 राजपत्रित, 16847 अराजपत्रित
  • दक्षिण रेल्वे – 161 राजपत्रित, 19500 अराजपत्रित
  • दक्षिण पश्चिम रेल्वे – 65 राजपत्रित, 6525 अराजपत्रित
  • पश्चिम मध्य रेल्वे – 59 राजपत्रित, 11073 अराजपत्रित
  • पश्चिम रेल्वे – 172 राजपत्रित, 26227 अराजपत्रित

रेल्वेमंत्री पुढे म्हणाले, इतर युनिटमध्ये 507 राजपत्रित आणि 12760 अराजपत्रित पदं रिक्त आहेत. ती पदं निर्माण करणं आणि भरणं ही सतत प्रक्रिया सुरुय. मात्र, कोरोना महामारी आणि विविध राज्यांनी लादलेल्या लॉकडाउनमुळं परीक्षेच्या प्रक्रियेवर परिणाम झालाय. देशात कोविडची (Coronavirus) पहिली लाट संपल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर RRB नं 15 डिसेंबर 2020 पासून टप्प्याटप्प्यानं रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केलीय. गेल्या पाच वर्षांत रेल्वे भरती बोर्डानं 1,89,790 लोकांची नियुक्ती केलीय, असं त्यांनी सांगितलं.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

68 Comments
  1. Rahul siddhart jadhav says

    Railway workshop welder job need.

  2. Suryawanshi Priyanka Ananda says

    Mi 12 vi pass jali aahe mala job betel ka

  3. Prathmesh pande says

    Sie 1st tiar la ahe tar rilway mashe job bhetel ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड