मच्छिमारांच्या मुलांना तटरक्षक दलात संधी

Indian Navy Opportunities For Fisher-mans

सागरी किनारपट्टीची व सागराची इत्यंभूत माहिती असलेल्या मच्छिमारांच्या मुलांना आता तटरक्षक दल संधी देऊ इच्छित आहे. त्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबवली जाईल, असे दलाकडून सोमवारी वरळी भागातील विशेष मेळाव्यात सांगण्यात आले. सागरी सुरक्षेसंबंधी तटरक्षक दलाने वरळी किनारपट्टीवर मच्छिमारांशी संवाद साधला.

२६/११ च्या हल्ल्यानंतर किनारपट्टी सुरक्षेसाठी तटरक्षक दलाकडून विविध कार्यक्रम राबविले जातात. मच्छिमार बांधवांशी चर्चा, हा त्यातील सर्वात मोठा व महत्त्वाचा कार्यक्रम आहे. याअंतर्गत मच्छिमारांमध्ये समुद्री घुसखोरी, बाहेरील नौका ओळखणे, संशयास्पद हालचाली ओळखणे तसेच या सर्वांची वेळोवेळी सुरक्षा दलांना माहिती देणे, याबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच त्यादृष्टीने प्रशिक्षितही केले जाते. असाच कार्यक्रम सोमवारी तटरक्षक दलाने वरळी किनारपट्टीवर घेतला.

तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर व्ही. डी. चाफेकर यांनी सागरी संरक्षण व समुद्री सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले. ‘समुद्राची व किनारपट्टीची सर्वाधिक जाण मच्छिमारांना असते. यामुळे त्यांच्या तरुण मुलांनी तटरक्षक दलात यावे. ही त्यांच्यासाठी करिअरची आगळी संधी असेल,’ असे आवाहन चाफेकर यांनी केले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

समुद्र हा कायम बेभरवशाचा असतो. तो कधीही खवळू शकतो. अशावेळी खोल समुद्रात असताना आपत्कालिन स्थिती निर्माण झाल्यास काय करावे, याबाबत या कार्यक्रमात तटरक्षक दलाकडून प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. जीवरक्षक जॅकेटचा वापर कसा करावा, हे दाखविण्यात आले. यासाठी ३०० मच्छिमारांना जीवरक्षक जॅकेटचे मोफत वितरणही करण्यात आले.

(स्रोत : मटा)


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Uttam wayaingankar says

    मि स्वतःबूडकर आहे, पाण्याचा अंदाज २४वर्षचा आहे, पाण्या च्या ठीकाणी जर माणुस बुडालेला आसेल तर तेही काम करतो पोलीसांच्या मदद तीने

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड