नेव्हीमध्ये सरळ नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय नौदलात २७० पदांसाठी भरती जाहिरात आली! – Indian Navy 270 Vacancies Recruitment
Indian Navy 270 Recruitment 2025
Indian Navy SSC Recruitment 2025: भारतीय नौदलात नोकरीसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय नौदल शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC Indian Navy 270 Vacancies Recruitment) अंतर्गत ऑफिसर पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत एकूण २७० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२५ आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
भारतीय नौदल SSC भरती २०२५: महत्त्वाचे तपशील
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कोर्स सुरू होण्याची तारीख: जानेवारी २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ फेब्रुवारी २०२५
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन (joinindiannavy.gov.in)
एकूण रिक्त जागा: २७०
निवड प्रक्रिया: शैक्षणिक गुण + SSB मुलाखत
भारतीय नौदल SSC भरती २०२५: पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने किमान ६०% गुणांसह BE/B.Tech पूर्ण केलेले असावे.
जनरल सर्व्हिस, पायलट, नेव्हल ऑपरेशन्स ऑफिसर आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलरसाठी अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात.
लॉजिस्टिक्ससाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे MBA पदवी असणे आवश्यक.
शिक्षण शाखेसाठी M.Tech किंवा MSc आवश्यक.
वयोमर्यादा:
उमेदवाराचा जन्म जानेवारी २००१ ते जुलै २००६ दरम्यान झालेला असावा.
अर्ज कसा करावा?
अधिकृत वेबसाइटला भेट द्या 👉 joinindiannavy.gov.in
ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करा
आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा
मागणी केल्याप्रमाणे कागदपत्रे अपलोड करा
अर्ज शुल्क भरून सबमिट करा आणि प्रिंट घ्या
भारतीय नौदल SSC भरती २०२५: निवड प्रक्रिया
शैक्षणिक गुणांच्या आधारे प्राथमिक निवड केली जाईल.
निवडलेल्या उमेदवारांना SSB मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
अंतिम निवड ही SSB मुलाखतीतील कामगिरी व वैद्यकीय तपासणीवर आधारित असेल.
रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
भारतीय नौदल SSC भरती २०२५: शाखा व पदे
कार्यकारी शाखा:
सामान्य सेवा (GS)
पायलट
नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर
एअर ट्रॅफिक कंट्रोलर
लॉजिस्टिक
नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट (NAIC)
शिक्षण शाखा
तांत्रिक शाखा:
अभियांत्रिकी शाखा (सामान्य सेवा)
इलेक्ट्रिकल शाखा (सामान्य सेवा)
नौदल कन्स्ट्रक्टर
इच्छुक उमेदवारांनी संधी साधून २५ फेब्रुवारीच्या आत अर्ज करावा!
Table of Contents