इंडियन आर्मी महिला रॅली २०१९


बेळगावात महिला सैन्य भरतीच आयोजन पहिल्यांदाच करण्यात येत आहे. सैन्य दलात या आधी फक्त अधिकारी पदासाठीच महिलांची भरती होत होती. यावेळी महिलांना महिला पोलीस म्हणून देशाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. सैन्य दलातील पोलीस विभागात ही भरती होणार आहे. १ ऑगस्टपासून मराठा लाईफ इन्फ्रंटीमध्ये भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. १०० पदांसाठी ही भरती होणार आहे. बेळगावमध्ये होणाऱ्या या भरतीसाठी जवळपास ५ हजार महिला उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पात्रता :  या भरतीसाठी साडेसतरा ते २१ वयोगटातील आणि दहावीला ८६ टक्क्यांहून अधिक गुण असलेल्या मुली यासाठी पात्र ठरणार आहेत. १ते ५ ऑगस्ट दरम्यान भरतीसाठी आलेल्या महिलांची शारीरिक आणि वैद्यकीय तपासणी होईल. दोन्ही चाचण्यात यशस्वी होणाऱ्या उमेदवारालाच परीक्षा देता येणार आहे. १ ते ८ ऑगस्टपर्यंत ही भरती चालणार आहे.

अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.