बोटांचे ठसे तपासूनच मिळणार अग्निविरमध्ये प्रवेश, ११ ऑगस्ट पासून अग्निविर रॅली, वेळापत्रक जाहीर! -Agniveer Bharti 2024

Indian Army Agniveer Bharti 2024 Apply Now

Ex Agniveer Bharti 2024

प्रवेशपत्र व बोटांचे ठसे तपासूनच उमेदवारांना अग्निवीर भरतीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल. ११ ते २३ ऑगस्ट या कालावधीत छत्रपती संभाजीनगरात भरती मेळावा होणार असून, वैद्यकीय व शारिरीक चाचणी उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम निवड यादी सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्य भरती कार्यालयाच्या वतीने भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी (दि.६) झालेल्या बैठकीत दिले. उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (निवृत्त) सय्यदा फिरासत, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक क्षीरसागर, मनपा उपायुक्त अंकुश पांढरे आदी यावेळी उपस्थित होते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, हिंगोली, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ९ जुलैरोजी झालेल्या ऑनलाइन सीईई पात्रता चाचणी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पात्र उमेदवारांचे भरती प्रक्रियेचे प्रवेशपत्र त्यांच्या वैयक्तिक ई-मेलवर पाठविण्यात आले आहे. प्राप्त झालेले प्रवेशपत्र व आवश्यक कागदपत्र यांच्यासह उमेदवारांनी भरती मेळावा स्थळी उपस्थित रहावे, असे कळविण्यात आले आहे. दलालांपासून सावध रहा निवड झालेल्या सर्व उमेदवारांना उमेदवारांना अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय सैन्य दलात सेवेसाठी पाचारण केले जाईल. उमेदवारांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे, छायाचित्रे सोबत आणावी. ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक प्रक्रियेने होणार असून, भरती करुन देतो असे सांगणाऱ्या बनावट, तोतया व्यक्तिपासून सावध रहावे व त्याबाबत भारतीय सैन्य दलातील अधिकाऱ्यांना तत्काळ कळवावे, असे आवाहनही करण्यात आले.
भरती प्रक्रियेचे वेळापत्रक
  • ११ ऑगस्ट : सर्व जिल्ह्यातील उमेदवार अग्निवीर ऑफिस असिस्टन्स स्टोअर किपर टेक्निकल पदांसाठी. परभणी जिल्ह्यातील उमेदवार, अग्निवीर जनरल ड्युटी.
  • १२ ऑगस्ट नांदेड जिल्हा, अग्निवीर जनरल ड्युटी.
  • १३ ऑगस्ट छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, कन्नड, खुलताबाद तालुका, अग्निवीर जनरल ड्युटी.
  • १४ ऑगस्ट: पैठण, फुलबी, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर तालुका, अग्निवीर जनरल ड्युटी
  • १५ ऑगस्ट: अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, मुक्ताईनगर,तालुका, अग्निवीर जनरल
  • १६ ऑगस्ट : बोदवड, चोपडा, धरणगाव, एरंडोल, जळगाव, जामनेर, पाचोरा तालुका, अग्निवीर जनरल ड्युटी.
  • १७ ऑगस्ट: जळगाव (पारोळा, रावेर, यावल तालुका), जालना (बदनापूर, भोकरधन्, धनसावंगी आणि जालना, अग्निवीर जनरल ड्यूटी
  • १८ ऑगस्ट जालना (अंबड, जाफराबाद, मंठा, परतूर), हिंगोली (सर्व तालुके), अग्निवीर जनरल ड्युटी
  • १९ ऑगस्ट बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, खामगाव, लोणार, मलकापूर, अग्निवीर जनरल ड्युटी.
  • २० ऑगस्ट मेहकर, मोताळा, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव आणि सिंदखेडराजा तालुका, अग्निवीर जनरल ड्युटी, तसेच सर्व जिल्हे अग्निवीर टेकनिकल (ऑलआर्म्स), अग्निवीर ट्रेड्समन – ८ वी पास (ऑलआर्म्स)
  • २१ ऑगस्ट सर्व जिल्हे अग्निवीर ट्रेड्समन १० वी पास (ऑलआर्म्स)

 


येथील आर्मी भरती बोर्डाच्या वतीने ११ ते २३ ऑगस्टदरम्यान अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. पात्र उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर या भरती मेळाव्याचे प्रवेशपत्र पाठविण्यात आल्याचे भरती प्रक्रियेचे संचालक कर्नल अनूज सिंघल यांनी सांगितले. येथील आर्मी भरती बोर्डाच्या वतीने ११ ते २३ ऑगस्टदरम्यान अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. पात्र उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर या भरती मेळाव्याचे प्रवेशपत्र पाठविण्यात आल्याचे भरती प्रक्रियेचे संचालक कर्नल अनूज सिंघल यांनी सांगितले. 

Army Schdule 2024

 

 

 


Indian Army Agniveer Bharti 2024 Apply Now: केंद्र सरकारने आता माजी अग्निवीरांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार या उमेदवारांना सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (सीआयएसएफ) शिपाई भरतीमध्ये १० टक्के आरक्षण मिळणार आहे. गृह मंत्रालयाने निर्णयानंतर सीआयएसएफ आणि बीएसएफने माजी अग्निवीरांना भरतीमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचे धोरण निश्चित केले आहेच; पण या उमेदवारांना भरतीच्या वेळी शारीरिक चाचणीमध्ये सूट देण्यात येणार आहे. पहिल्या वर्षीच्या बॅचमधील उमेदवारांसाठी भरतीची वयोमर्यादा पाच वर्षांनी, तर पुढील वर्षीच्या बॅचसाठी तीच मर्यादा तीन वर्षांनी वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने जून २०२२ पासून अग्निवीर रोजी गृह मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली होती आणि CAPF आणि आसाम रायफल्समध्ये भरती प्रक्रियेत माजी अग्निवीर जवानांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. CAPF मध्ये BSF, CRPF, ITBP, SSB आणि CISF यांचा समावेश होतो.

CISF च्या DG नीना सिंह म्हणाल्या, ‘भविष्यात कॉन्स्टेबलच्या सर्व भरतींमध्ये 10 टक्के नोकऱ्या माजी अग्निवीर जवानांसाठी राखीव ठेवल्या जातील. कोणतीही शारीरिक चाचणी द्यावी लागणार नाही. वयात सवलत दिली जाईल. पहिल्या बॅचसाठी वयाची सवलत 5 वर्षांसाठी असेल. परंतु पुढील बॅचसाठी ही सवलत फक्त 3 वर्षांसाठी असेल.’

बीएसएफचे डीजी नितीन अग्रवाल म्हणाले, ‘अग्निवीर योजनेतून सैनिकांना 4 वर्षांचा अनुभव मिळाला आहे. त्यांना पूर्णपणे शिस्तबद्ध आणि प्रशिक्षित करण्यात आले आहे. बीएसएफसाठी हे खूप चांगले आहे. प्रशिक्षणानंतर निवडक अग्निवीर जवानांना सीमेवर तैनात केले जाईल.’

अग्निवीर योजना काय आहे?

केंद्र सरकारने 2022 मध्ये अग्निवीर योजना सुरू केली होती. त्याअंतर्गत लष्कर, नौदल आणि हवाई दलात चार वर्षांसाठी युवकांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाते. 4 वर्षात सहा महिन्यांचे प्रशिक्षण देखील समाविष्ट आहे. चार वर्षांनंतर अग्निवीरांना त्यांच्या कार्यक्षमतेच्या आधारे मानांकन देण्यात येणार आहे. या गुणवत्तेच्या आधारे 25% अग्निवीरांना सेवेत कायम घेतले जाईल.


Agniveer Bharti 2024

भारतीय सैन्यात आर्मी अग्निवीर व नियमित भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी २२ मार्चपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे. या भरती प्रक्रियेत अग्निवीर जी.डी., अग्निवीर तंत्रज्ञ, अग्निवीर कार्यालय सहाय्यक, १० वी व ८ वी उत्तीर्णांसाठी अग्निवीर ट्रे मॅन, अग्निवीर महिला सैनिकी – पोलिस यांचा तसेच नर्सिंग असिस्टंट, शिपाई, फार्मासाठी नियमित भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात उमेदवारांना संगणक आधारित ऑनलाइन परीक्षेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संकेतस्थळावरील अधिसूचना वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

विषय अधिसूचनेनुसार एनसीसी उमेदवार, तांत्रिकदृष्ट्या पात्र व्यक्ती, उत्कृष्ट खेळाडू आणि माजी सैनिकांच्या मुलांना बोनस गुण आणि शारीरिक मोजमापातील सूट दिली जाईल. १३ फेब्रुवारी रोजी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अधिसूचना अपलोड करण्यात आली आहे. लेखी परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना सैन्य भरती कार्यालयाद्वारे भरती मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी बोलावले जाईल. उमेदवारांच्या वैद्यकीय चाचणीपूर्वी त्यांना अनुकूलता चाचणीला सामोरे जावे लागेल, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे यांनी कळविले आहे.

 

📝 अर्ज करा

 


देशसेवा करण्यासाठी भारतीय सैन्यदलात जाण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. सैन्यात जाऊ इच्छिणाऱ्यांचे स्वप्न आता साकार होणार आहे. लष्कराच्या वतीने अग्निवीरांच्या पुढील भरती मेळाव्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना यासाठी अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन कॉमन प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. ८ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, २२ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. सैन्यदलामध्ये भरती होण्याचे स्वप्न पाहून अनेक तरुण मैदानी चाचणी व लेखी चाचणीचा सराव वर्षानुवर्षे करत असतात. सैन्य भरतीविषयी शिकवणीवर्गामध्ये जाऊनही सराव केला जातो. सैन्यात भरती व्हावे, हे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी लष्कराच्या माध्यमातून सैन्य भरती प्रक्रिया राबविली जाते. याविषयीची सविस्तर माहिती लष्कराच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येते. याशिवाय जिल्हा रोजगार केंद्राकडेही याविषयी माहिती असते. १७ ते २१ वय असणाऱ्या तरुणांना यासाठी अर्ज करता येणार आहे.

निवडीचे दोन टप्पे

प्रत्यक्ष भरती- सुरुवातीला भरती परीक्षा होईल. त्यात उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार शारीरिक चाचणी देतील, त्यानंतर कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया होईल, त्यानंतर मेडिकल होईल. या सर्व टप्प्यांतील कामगिरी पाहून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यानुसार उमेदवाराची निवड होईल.

अर्ज कसा कराल?
• उमेदवारांनी सुरुवातीला अधिकृत वेबसाइटवर जावे. त्यानंतर
CO/OR/Agniveer Apply या लिंकवर किंवा JCO/OR/Agniveer Enrolment या विभागात लॉगीन करावे. त्यानंतर लॉगीन पेजवर जाऊन अर्ज भरावा.
• अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण अटी जाणून घ्याव्यात. अर्ज भरल्यानंतर शेवटी शुल्क भरा आणि प्रिट डाउनलोड करून घ्या.

कोणकोणती पदे?
अग्निवीर जनरल ड्युटी : यासाठी दहावी पास तरुणांनाही अर्ज करता येणार आहे.
टेक्निकल : अग्निवीर टेक्निकल पदासाठी बारावी विज्ञान, आयटीआय व पॉलिटेक्निक उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी आहे. अग्निवीर ट्रेड्समन : या
पदासाठी आठवी पास तरुणांनाही संधी मिळते. ही शैक्षणिक पात्रता असणारे तरुण यासाठी अर्ज करू शकतात. लिपिक : अग्निवीर लिपिक पदासाठी आठवी, दहावी व आयटीआय पास तरुणांना संधी आहे.

संपूर्ण माहिती या वेबसाइटवर सैन्यदलाच्या http:// www.joinindianar my. nic. in या अधिकृत वेबसाइटवर सैन्य भरतीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. याशिवायी भरतीची माहिती, त्यासाठीची मुदत, शैक्षणिक पात्रता, सीईई व इतर सर्व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध होत आहे.

 


भारतीय लष्कराने अग्निवीर आणि नियमित सैन्यभरतीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली असून यासाठी महाराष्ट्र गुजरात, गोवा राज्यांसह दमण, दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांना २२ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. लष्कराच्या www. joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर नावनोंदणी विभागात हिंदी आणि इंग्रजीमध्ये ही नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षेदरम्यान खेळाडू, एनसीसी प्रमाणपत्रधारक, आयटीआय आणि पदविकाधारकांना अतिरिक्त गुण दिले जातील. ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षेत ऑफिस असिस्टंट / एसकेटी श्रेणीसाठी प्रथमच टंकलेखन चाचणीदेखील सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांनी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात फसवणूक करणाऱ्यांना बळी न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

दरम्यान, मुंबईतील सैनिक भरती कार्यालयाने अग्निवीर निवड चाचणीसाठी केवळ मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यात कायमचे वास्तव्य असणारे अविवाहित उमेदवार पात्र ठरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संगणकाधारित ऑनलाइन लेखी परीक्षा आणि प्रत्यक्ष भरती असे या निवडीसाठी दोन टप्पे ठरवण्यात आले आहे. नोंदणीच्या वेळी अर्जदाराच्या डिजिलॉकर खात्यातून वैयक्तिक तपशील प्राप्त केला जाणार आहे. ऑनलाइन परीक्षेसाठी उमेदवाराला परीक्षा शुल्क म्हणून २५० रुपये तेथे उपलब्ध असलेल्या एसबीआय पोर्टलच्या दुव्यावरून भरता येतील. उमेदवारांकडे ईमेल आणि मोबाईल असणे आवश्यक आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्राचे पाच पर्याय द्यावे लागणार असून त्यातील पहिल्या तीन निवडींवर आधारित परीक्षा केंद्र त्यांना मिळणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांना भरती कार्यालयाच्या हेल्पलाइन क्रमांका ०२२-२२१५३५१० वर कामकाजाच्या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी एक यावेळेत सहाय्य केले जाणार आहे.

PDF जाहिरात बघा


भारतीय सैन्यात काम करून देशसेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्करातर्फे अग्निवीरांच्या पुढील भरती मेळाव्यासाठी नोंदणी प्रक्रिया आज, ८ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. 

 

शेवटची तारीख कधी आहे-

कृपया लक्षात घ्या की भारतीय सैन्य अग्निवीर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२४ आहे, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखेपर्यंत अर्ज करावा.

वय श्रेणी-

या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय १७ ते २१ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

अर्ज फी-

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ५५० रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे जे ऑनलाइन माध्यमातून जमा केले जाऊ शकते.

निवड प्रक्रिया-

भरती परीक्षेत उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार शारीरिक चाचणीत बसतील. त्यानंतर कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया होईल. त्यानंतर पुन्हा मेडिकल होईल.या सर्व टप्प्यातील कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

अर्ज कसा करायचा-

  • सर्व उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्याच्या होम पेजवर, JCO/OR/Agniveer Apply च्या लिंकवर किंवा JCO/OR/Agniveer Enrolment या विभागात लॉगिन करा.
  • त्यानंतर अग्निवीर लॉगिन पेज उघडेल.
  • यानंतर नोंदणी लिंकवर .
  • आता फॉर्म भरण्याची पुढील प्रक्रिया सुरू करा.
  • शेवटी, फी ऑनलाइन भरा आणि फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट घ्या.

 


मित्रांनो, भारतीय सैन्यात (Indian Army) भरती होण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी हि एक चांगली बातमी आहे. प्राप्त ,माहिती नुसार लवकरच लष्कराच्या अग्निपथ योजनेअंतर्गत (Agnipath Yojana) भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अग्निपथ (Agnipath Scheme) ही लष्कर भरतीसाठी भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत भरती झालेल्या तरुणांना अग्निवीर (Agniveer Bharti) म्हणतात. अग्निवीर भरती चार वर्षांसाठी असते. चार वर्षांनंतर, 75 टक्के अग्निवीरांना सैन्यातून मुक्त केले जातं. दरम्यान, निमलष्करी दल आणि राज्य पोलीस दलात नोकरीसाठी 25 टक्के अग्निवीरांना पुढील कामासाठी पुन्हा भारतीय सैन्यात नियुक्त केलं जातं. 

लवकरच अग्निवीर भरती २०२४ साठी नोंदणीला सुरू

अग्निपथ योजनेअंतर्गत, भारतीय सैन्यात (Indian Army Recruitment) अग्निवीर भरती 2014 (Agniveer Recruitment 2024) साठी अर्ज प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात सुरु होणार आहे. अग्निवीर भरती 2014 साठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागेल. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 08 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत 21 मार्च 2024 पर्यंत आहे. अग्निवीर भरतीसाठी इच्छुक उमेदवार 8 फेब्रुवारीपासून www.joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतील.

अग्निवीर भरती होणार दोन टप्प्यांत भरती 

ही दोन भरती टप्प्यात करण्यात येणार असून पहिला टप्पा ऑनलाइन संगणक आधारित लेखी परीक्षा (Online CEE) असेल. तर, दुसऱ्या टप्प्यात शारीरिक चाचणी आणि निकष भरती प्रक्रिया असेल.

 

1. अग्निवीर जनरल ड्युटी (All Arms)

पात्रता : 45 टक्के गुणांसह दहावी आणि प्रत्येक विषयात 33 गुण.

दहावीमध्ये सी ग्रेड आणि ग्रेडिंग सिस्टम असल्यास प्रत्येक विषयात किमान डी ग्रेड.

ज्या अर्जदारांकडे लाइट मोटर व्हेईकल (LMV) ड्रायव्हिंग लायसन्स आहे, त्यांना ड्रायव्हर पदासाठी प्राधान्य दिलं जाईल.

उंची : 168 सेंटीमीटर असावी.

 

2. अग्निवीर टेक्निकल (All Arms)

पात्रता : बारावी वर्ग भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजीसह 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात 40 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे किंवा NIOS आणि संबंधितांसह कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयांसह 12वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. NSQF स्तर 4 किंवा त्याहून अधिक क्षेत्रात किमान एक वर्षाचा ITI अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. दहावी/मॅट्रिक परीक्षा 50 टक्के गुणांसह इंग्रजी, गणित आणि विज्ञान 40% गुणांसह मान्यताप्राप्त ITI मधून 2 वर्षांचे तांत्रिक प्रशिक्षण आणि पॉलिटेक्निकमधून 2 किंवा 3 वर्षांचा डिप्लोमा.

उंची : 167 सेमी असावी

 

3. अग्निवीर लिपिक / अग्निवीर स्टोअर कीपर तांत्रिक

पात्रता : इंटरमिजिएट परीक्षा कोणत्याही विषयात 60 टक्के गुणांसह (कला, वाणिज्य आणि विज्ञान) उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात किमान 50 टक्के गुण आणि इंग्रजी आणि गणित/अकाउंट्स/बुक किपिंग अतिरिक्त 50 टक्के गुण. बारावी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उंची : 162 सेंटीमीटर असावी.

 

4. अग्निवीर ट्रेडसमेन (All Arms)

पात्रता : प्रत्येक विषयात 33 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उंची : 168 सेमी असावी

 

5. अग्निवीर व्यापारी (All Arms)

पात्रता : प्रत्येक विषयात 33 टक्के गुणांसह 08 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उंची : 168 सेमी असावी

 

6. अग्निवीर जनरल ड्युटी (महिला) मिलिटरी पोलिस

पात्रता : 10वी/मॅट्रिक प्रत्येक विषयात 45 टक्के गुणांसह आणि 33 टक्के गुणांसह उत्तीर्ण, जर ग्रेडिंग सिस्टम डी ग्रेड असेल तर प्रत्येक विषयात 45 टक्के गुणांसह C2 ग्रेडसह उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

उंची : 167 सेमी असावी

 

सर्व पदांसाठी निकष

वय : 31.10.2024 रोजी 17½ ते 21 वर्षे दरम्यान असावे.

वजन : 50 किलो

छाती : 77 सेमी + (05 सेमी विस्तार)

शारीरिक कार्यक्षमता चाचणी

1. 5 मिनिटे 30 सेकंद ते 5 मिनिटे 45 सेकंदात 1.6 किलोमीटर धावा.
2. बीम वर खेचा
3. 9 फूट खड्ड्यात उडी मारणे अनिवार्य आहे.
4. बॅलन्सिंग बीममध्ये चालणे अनिवार्य आहे


2024 सालासाठी अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज शुल्कासोबत जीएसटीही भरावा लागणार आहे. अधिसूचना जारी केली आहे. सध्या लष्कर आणि हवाई दलानेही भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. प्रवेश शुल्क 550 रुपये असले तरी उमेदवाराला त्यावर जीएसटीही भरावा लागेल. सैन्यात अग्निवीर म्हणून भरती होण्यासाठी अंबाला, कैथल, कुरुक्षेत्र, कर्नाल, यमुनानगर, पंचकुला आणि चंदीगड येथील पुरुष उमेदवार आर्मी रिक्रूटमेंट सेंटर अंबाला अंतर्गत अर्ज करू शकतात, तर दिल्ली, हरियाणा, हिमाचल आणि चंदीगड येथील महिला उमेदवारांसाठी नोंदणी करता येईल. 8 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान होणार आहे.

दुसरीकडे, हवाई दलात अग्निवीर म्हणून भरतीसाठी, उमेदवार 6 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी जास्त गर्दी होऊ नये, यासाठी उमेदवारांची नावे दोन टप्प्यात निश्चित केली जाणार आहेत.

 

  • 550 रुपयांच्या शुल्कासोबतच उमेदवाराच्या खिशातून GST देखील ऑनलाइन कापला जाईल.
  • अग्निवीरची भरती प्रक्रिया डोळ्यांच्या स्कॅनपासून डोप चाचणीपर्यंत पोहोचली आहे.

Maharashtra Agniveer Bharti 2024 – The Indian Army has made a major change in the Agniveer recruitment process. The new rule will be implemented in the 2024-25 Agniveer recruitment drive. The Army has also issued a notification in this regard. Army Recruitment Boards of all states have also been informed about this. The new rule will be applicable only for recruitment of clerk and storekeeper posts under Agniveer under Maharashtra Agniveer Bharti 2024. Also, this new rule will not apply to other posts. The Army will also conduct a typing test for recruitment to the posts of clerk and storekeeper, which can be 30 words per minute in Hindi and 35 words per minute in English. According to media reports, an official of the Bihar-Jharkhand Army Recruitment Board Directorate confirmed this and said that there will be a typing test for the recruitment of clerk and storekeeper posts under Agniveer, but its standard is yet to be decided. The standard will be set soon.

 

भारतीय लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. 2024-25 च्या अग्निवीर भरतीमध्ये हा नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. लष्कराने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. यासोबतच सर्व राज्यांच्या सैन्य भरती मंडळांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. नवा नियम अग्निवीर अंतर्गत क्लर्क आणि स्टोअरकीपर या पदांच्या भरतीसाठीच लागू असणार आहे. तसेच, हा नवीन नियम इतर पदांना लागू होणार नाही. आता क्लर्क आणि स्टोअरकीपर पदांच्या भरतीसाठी लष्कर टायपिंग टेस्ट देखील घेईल, जी हिंदीमध्ये प्रति मिनिट 30 शब्द आणि इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिहार-झारखंड सैन्य भरती मंडळ डायरेक्टोरेटच्या एका अधिकाऱ्याने याची पुष्टी केली आणि सांगितले की, अग्निवीर अंतर्गत क्लर्क आणि स्टोअरकीपर पदांच्या भरतीसाठी टायपिंग टेस्ट होईल, परंतु त्याचे मानक अद्याप ठरलेले नाही. मानक लवकरच निश्चित केले जाईल.

 

कोण करू शकतो अर्ज?
क्लर्क आणि स्टोअरकीपरच्या पदांसाठी 60 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. गेल्या वर्षी लष्कराने भरती प्रक्रियेत आणखी एक बदल केला होता. त्याअंतर्गत आता प्रथम लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर भरती मेळावा आयोजित केला जाईल. यापूर्वी लेखी परीक्षा नंतर आयोजित करण्यात आली होती आणि त्यापूर्वी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भरती मेळाव्यातील गर्दी कमी करण्यासाठी लष्कराने हा बदल केला होता.

‘या’ पदांसाठी भरती 
भारतीय हवाई दलाद्वारे अग्निवीरच्या 3500 पदांसाठी अर्ज प्रक्रिया 17 जानेवारी 2024 पासून सुरू होणार असून 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे. भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवार विहित अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करू शकतात. निवड लेखी परीक्षा पीईटी आणि कागदपत्र पडताळणीद्वारे केली जाईल.


Army Agniveer Recruitment Online Registration 2024

  • अग्निवीरांना समावेशासाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
  • 20 जून रोजी लष्कराने याविषयीची आधिसूचना जाहीर केली होती.
  • अर्ज, निवड आणि भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • या ठिकाणी उमेदवार अधिसूचना वाचू शकतात.
  • ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे.
  • 1 जुलै पासून ऑनलाईन नोंदणी करुन तरुणांना लष्करात जाण्याचे स्वप्न साकारता येईल.

How to Apply For Indian Army Agniveer Recruitment 2024

  • अग्निवीर लष्करात भरतीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्यासाठी तरुणांना https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या संकेतस्थळावर वर जाऊन अर्ज भरुन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  • उमेदवार यामध्ये त्यांची इत्यंभूत माहिती सविस्तर भरुन रजिस्ट्रेशन्स पूर्ण करतील.
  • ऑनलाईन अर्ज भरुन तो जमा करावा लागेल.
  • सोबतच उमेदवारांना प्रक्रिया शुल्क जमा करावे लागेल.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे.
  • 16 ऑक्टोबर रोजी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
  • तर 30 डिसेंबर 2022 पासून लष्कराच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल.

Indian Army Benefits of Army Agniveer Bharti 2024

  • Indian young people whose age is between 17.5 to 23 years can apply in this Indian Army Agneepath Agniveer scheme 2022-23.
  • Agneepath will allow youth to serve in the Indian Army for a period of four years.
  • The candidates who become Agniveer will get 10% reservation in recruitment in Assam Rifles after 4 years.
  • Uttar Pradesh / Madhya Pradesh and other states will also give preference to Agniveer in police department recruitment.
  • LIC (LIfe Insurance) : Army Agniveers will be provided life insurance cover of Rs. 48 Lakhs for the duration of their engagement period as Agniveers in the Indian Army.
  • Army Agniveer Leave : Annual : 30 Days, Sick Leave. Medical advice based.
  • For More Details and Indian Army Agniveer Benefit Must Read the Notification.

Pay Scale For Agnipath Army Agniveer Recruitment 2024

  • अधिसूचनेनुसार सेवेच्या पहिल्या वर्षी ३० हजार रुपये पगार आणि भत्ते,
  • दुसऱ्या वर्षी ३३ हजार रुपये पगार आणि भत्ते,
  • तिसऱ्या वर्षी ३६,५०० रुपये पगार आणि भत्ते आणि
  • चौथ्या वर्षी ४०,००० हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील.
  • चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र आणि इयत्ता बारावी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल.
  • दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चार वर्षांनंतर बारावी समकक्ष प्रमाणपत्र देखील मिळेल.

 

Important Documents – Agneepath Indian Army Agniveer Bharti 2024

महत्त्वाचे कागदपत्रे :-

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा
  • 10वी किंवा 12वी वर्गाची मार्कशीट
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी इ.

Indian Army Agneepath Vacancy 2024 – Selection Process

The candidates will be shortlisted through four stages as mentioned in the Indian Army Agneepath Scheme Notification. The candidates have to appear in each stage and qualify as per the standards required.

  • स्टेज 1 शारीरिक तंदुरुस्ती चाचणी
  • स्टेज 2 भौतिक मापन चाचणी
  • स्टेज 3 वैद्यकीय चाचणी
  • स्टेज 4 लेखी चाचणी

 

Indian Army Agniveer Recruitment 2024 Details

विभागाचे नाव  भारतीय लष्कर
योजनेचे नाव  अग्निपथ भरती योजना
पदाचे नाव  अग्निवीर
एकूण पदसंख्या  अंदाजे 25000
वेतनश्रेणी  30000 – 40000
नोकरी स्तर राष्ट्रीय स्तर
अग्निवीर सैन्य भरती रॅली ठिकाण
अर्ज पद्धती  ऑनलाइन
परीक्षा पद्धत  ऑफलाइन
नोकरी ठिकाण  संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट  joinindianarmy.nic.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
  1. jitesh Tukaram kokate says

    मला आर्मी होयच आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड