भारतीय लष्करात ७१,३२४ जागा रिक्त!

Indian Army 71000 Posts


भारतीय सैन्यामध्ये 71,324 जागा रिक्त असून, त्यात 8,792 जागा या अधिकार्‍यांच्या आहेत. सरकारने सैन्यातील संधींकडे युवकांना आकर्षित करण्यासाठी सध्या विशेष उपक्रम हाती घेतला आहे. राज्यसभेत संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी ही माहिती सोमवारी दिली.

तृणमूल काँग्रेसचे मानस रंजन भुनिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर नाईक म्हणाले की, लष्करातील सेवेकडे युवकांनी एक उत्तम संधी म्हणून पाहावे याकरिता उत्तम वेतन, बढतीच्या उदंड संधी आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दलचे बक्षीस तसेच जोखमीच्या प्रसंगात भरपाईची वाढीव रक्कम आदी तरतुदी सरकारने केल्या आहेत.

लष्करातील नागरी सेवा पाहता या पदांसाठी उमेदवारांची तीव्र टंचाई आहे. अ वर्गात 3782, ब वर्गात 34,289 तर अन्य श्रेणींमध्ये 2.01 लाख कर्मचारी-अधिकार्‍यांची लष्कराला गरज आहे. वायुसेना आणि नौसेनेच्या तुलनेत स्थलसेनेत अधिक जागा रिक्त आहेत.

१९१ जागा – भारतीय सैन्य भरती २०२०Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड