अकरावी ऑनलाइन: पहिल्या मेरिट लिस्टपर्यंतचे वेळापत्रक जाहीर
11th Online Admission 2020 Schedule till First List Released
11th Online Admission 2020 Schedule till First List Released : अकरावी ऑनलाइन प्रवेशातील ‘भाग-२’ कधी भरायचा ते आता स्पष्ट झाले आहे….
अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे पहिल्या गुणवत्ता यादीपर्यंतचे वेळापत्रक शिक्षण संचालनालयाने अखेर सोमवारी जाहीर केले. या वेळापत्रकानुसार १२ ऑगस्टपासून अल्पसंख्याक, इनहाऊस आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. तर पहिली गुणवत्ता यादी ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे.
राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद या सहा विभागांसाठी सुरू असलेल्या अकरावी प्रवेशप्रक्रियेला २४ जुलैपासून सुरुवात झाली. नोंदणीनंतर १ ऑगस्टपासून अर्जातील ‘भाग-१’ भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्जातील महत्त्वाचा टप्पा असलेला ‘भाग-२’ कधी, असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना पडला होता. त्याची प्रक्रिया शिक्षण विभागाने सोमवारी जाहीर केली. नोंदणी केलेल्या आणि अर्ज प्रमाणित झालेल्या विद्यार्थ्यांना आता भाग-२ मध्ये विद्यार्थ्यांना प्रामुख्याने आवडीच्या कॉलेजांचे प्राधान्यक्रम (गुणवत्तेनुसार) भरायचे आहेत. या अर्ज भरण्याच्या प्रक्रिया, तसेच प्रवेशप्रक्रियेचे हे वेळापत्रक आहे. पहिल्या फेरीचे हे वेळापत्रक शिक्षण संचालनालयाने वेबसाइटवर जाहीर केले. पुढील नियमित दोन प्रवेशफेऱ्या, तसेच विशेष फेऱ्याचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
प्रवेशाचा दुसरा टप्पा असा असेल
पहिला टप्पा – पसंतीक्रम आणि कोटा प्रवेशासाठी शून्य फेरी (१२ ते २२ ऑगस्ट)
- नियमित फेरी एकसाठी विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदविणे सुरू
- नवीन विद्यार्थी प्रवेशाचा पहिला आणि दुसरा भाग भरू शकतात
- विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणी मार्गदर्शन केंद्र व माध्यमिक शाळांमध्ये सुरू राहील
- कोटाअंतर्गत प्रवेश करणे – व्यवस्थापन, इनहाऊस, व अल्पसंख्याक कोटा (शून्य फेरी)
- व्यवस्थापन, तसेच इनहाऊस कोटा प्रवेशाच्या रिक्त जागा प्रत्यार्पित करणे
- नियमित फेरी एकसाठी प्रवेश अर्ज भाग दोन भरणे बंद होईल
दुसरा टप्पा – नियमित प्रवेश फेरी एक (२३ ते २५ ऑगस्ट)
- तात्पुरती, संभाव्य सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे
- तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती ऑनलाइन नोंदविणे
- ऑनलाइन प्राप्त झालेल्या आक्षेप, सूचनांचे संकलन करून सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतीम करणे
तिसरा टप्पा – नियमित प्रवेश फेरी एकसाठी गुणवत्ता यादी जाहीर करणे (३० ऑगस्ट)
- विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेले कॉलेज दर्शविणे
- कॉलेजांना प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची यादी कॉलेज लॉगीनमध्ये दर्शविणे
- विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत मोबाइल संदेश पाठविणे
- पहिल्या नियमित फेरीचे कटऑफ वेबसाइटवर दर्शविणे
चौथा टप्पा – पहिली फेरी अकरावी प्रवेश निश्चिती (३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर)
- विद्यार्थ्याने शाळेमध्ये ऑनलाइन प्रवेश निश्चित करणे
- प्रवेश घ्यायचा नसल्यास प्रोसिड फॉर अॅडमिशन करू नये, घेतलेला प्रवेश रद्द करणे
- व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोटा प्रवेश सुरू राहतील
- व्यवस्थापन कोटाअंतर्गत रिक्त जागा प्रत्यार्पित करणे
अकरावी प्रवेश अधिकृत संकेतस्थळ – https://11thadmission.org.in/
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक आज, सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
11th Admission Pune, Mumbai, Nagpur, Amravati, Nashik, Aurangabad : राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद या सहा विभागांसाठी सुरू असलेल्या अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक आज, सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करून पहिला भाग पूर्ण केला आहे अशा विद्यार्थ्यांना पार्ट २ भरता येईल असे सूत्रांनी सांगितले.
मुंबई एमएमआर विभाग तसेच, पुणे व पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात अकरावीचे ऑनलाइन प्रवेशाचे अर्ज भरले जात आहेत. राज्यभरात रविवारी सांयकाळपर्यंत या भागातून ४ लाख ३१ हजार ४९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा भाग एक भरून नोंदणी केली आहे. यामध्ये मुंबई एमएमआर विभागात २ लाख १९ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. औरंगाबाद १८ हजार ४५५, अमरावती ११ हजार ७७८, नागपूर ३५ हजार १४९ आणि नाशिक २८ हजार ११३ आणि पुणे विभागात ९० हजार ४९६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. यापैकी या विभागांतील एकूण १ लाख ६ हजार विद्यार्थ्यांनी आपला अर्ज प्रमाणित केला आहे. आता या विद्यार्थ्यांना भाग दोन भरायचा आहे. या संदर्भातील वेळापत्रक आज जाहीर होण्याची शक्यता आहे.
Important News for 11th Admission 2020 : यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचे शुल्क २५० हून २२५ रुपये केले आहे. यंदा माहिती पुस्तक संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे. या कारणास्तव छापील माहिती पुस्तकांची किंमत या शुल्कातून कमी केल्याची माहिती मुंबई विभागीय उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली.
पीडीएफ स्वरूपातील माहिती पुस्तिकेसाठी मोबाइल अॅप तयार करण्यात येत आहे. मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयाकडून अकरावी नोंदणीची प्रक्रिया २६ जुलैपासूनच सुरू झाली असून गुरुवारी रात्री ८ पर्यंत १ लाख ६२ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली. दरम्यान, आता विद्यार्थ्यांना केवळ लॉगइन आयडी आणि पासवर्डच मिळणार असून १ तारखेपासून अर्जा$चा पहिला भाग भरता येणार आहे.
अकरावीसाठी मुंबई विभागात आवश्यक तेवढ्या जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी काळजी न करता नोंदणी करावी आणि १ आॅगस्टपासून काळजीपूर्वक भाग १ भरून त्यापुढील प्रक्रिया करावी.
Important News for 11th Admission 2020 : As per the latest news this year 11th admission 2020 process will be held on September month usually this process was complete in April. अकरावी प्रवेशासाठी महत्वाची बातमी : दहावी निकालानंतर मनासारख्या महाविद्यालयात आपल्या पाल्याला प्रवेश मिळेल का, याची चिंता पालकांना असते. यंदा कोरोनामुळे दहावीचा एक पेपर अद्याप शिल्लक आहे. परीक्षा होणार की नाही यासंदर्भात राज्य मंडळाने अजून निर्णय जाहीर केलेला नाही. दरवर्षी एप्रिल महिन्यात अकरावीच्या प्रवेशाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. नवीन महाविद्यालय, त्यांची जागा, नोंदणी अशी कामे या काळात केली जातात. यंदा मात्र ही कामे सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. दरवर्षी सप्टेंबरपर्यंत अकरावीचे प्रवेश पूर्ण करावे लागतात. साधारणत: एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष अर्जाचा पहिला टप्पा भरण्यास सुरुवात होते. यंदा ही प्रक्रिया पुढे ढकलली जाईल आणि त्याचा थेट परिणाम प्रवेशावर होण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा फटका यंदा बहुतांश परीक्षांना बसला आहे. आगामी सर्व शैक्षणिक सत्रांवर याचा परिणाम होणार आहे. दरवर्षी उन्हाळ्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेची तयारी सुरू होते. यंदा दहावीचीच परीक्षा अर्धवट, शाळा बंद, यामुळे अकरावी प्रवेशाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी नोयडाच्या “नायसा’या कंपनीकडे गेल्या तीन वर्षांपासून आहे. मागील वर्ष या कंपनीचे शेवटचे वर्ष होते. यंदा नव्याने निविदा काढून नवी कंपनी सरकारकडून नेमण्यात येणार होती. गेल्या तीन वर्षांत नायसाबाबत अनेक तांत्रिक तक्रारी होत्या, त्यामुळे प्रवेशात अनेकदा गोंधळही उडाला होता. अशात नवीन कंपनी निवडण्यासाठी आणखी विलंब झाल्यास त्याचा फटका प्रवेश प्रक्रियेला बसणार आहे
सौर्स : सकाळ
Admission process
Msrtc bhari 2020 kadhi honar ahe driver cum conductor