Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IIT प्रवेशांसाठी समुपदेशन नोंदणी ६ ऑक्टोबर पासून

Counslling Registration For IIT Admission Likely To Start From October 6

Counslling Registration For IIT Admission Likely To Start From October 6: IIT Admissions  : बीटेक प्रवेशांसाठी जॉइंट सीट अॅलोकेशन ऑथोरिटी (JoSSA) समुपदेशन नोंदणी सुरु करणार आहे.

IIT Admissions : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IITs), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIITs), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NITs) आणि गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट (GFTIs) मधील बीटेक प्रवेशांसाठी जॉइंट सीट अॅलोकेशन ऑथोरिटी (JoSSA) समुपदेशन नोंदणी सुरु करणार आहे. काउन्सेलिंगसाठी ६ ऑक्टोबर पासून नोंदणी सुरू केली जाणार आहे.

JoSSA चे हे काउन्सेलिंग शेड्युल अद्याप अंतिम स्वरुप देण्यात आलेले नाही. मात्र, जेईई अॅडव्हान्स्डच्या माहिती पुस्तिकेत तात्पुरते वेळापत्रक देण्यात आलेले आहे.

JoSSA काऊन्सेलिंगसाठी विद्यार्थ्यांना त्यांचे पसंतीक्रम नोंदवायचे आहेत. जागावाटप सात राउंडमध्ये होणार आहे. जेईई मेन २०२० मध्ये पात्र ठरल्यावर उमेदवार आयआयआयटी, एआयटी आणि जीएफटीआयमधील प्रवेशांसाठी पात्र ठरू शकतील. जेईई मेन परीक्षेतील पहिले २ लाख ५० हजार रँकहोल्डर्स जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरतील. जे उमेदवार जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा उत्तीर्ण होतील ते आयआयटींमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी पात्र ठरतील.

जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत होणार आहेत. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, जेईई अॅडव्हान्स्ड २०२० परीक्षेसाठी ११ सप्टेंबर पासून नोंदणी सुरू होणार आहे.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड