घरबसल्या देता येणार सीएस परीक्षा; पॅटर्नही बदलला
ICSI CS Exexutive Entrance Test 2020
ICSI CS Exexutive Entrance Test 2020 : कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट २९ ऑगस्ट रोजी होत आहे.. काय आहे परीक्षेचा पॅटर्न जाणून घ्या….
ICSI CS Exexutive Entrance Test (CSEET) 2020: इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (आयसीएसआय) रविवार, २९ ऑगस्ट २०२० रोजी कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (CSEET) आयोजित करणार आहे. ही प्रवेश परीक्षा घरातूनच घेण्यात येणार आहेत. म्हणजेच उमेदवारांना कोणत्याही परीक्षा केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही. ते त्यांच्या घरातून किंवा कोणत्याही योग्य सुविधेतून ही परीक्षा घेऊ शकतात. करोना संसर्गापासून बचावाची काळजी घेत संस्थेने हा निर्णय घेतला आहे.
परीक्षा कशी घेण्यात येईल?
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या संदर्भात आयसीएसआयने परिपत्रक जारी केलं आहे . त्यात नमूद केले आहे की ‘सर्व पात्र उमेदवार लॅपटॉप किंवा डेस्कटॉपद्वारे घरातून किंवा कोणत्याही सोयीस्कर ठिकाणी ऑनलाइन प्रवेश परीक्षा देऊ शकतात. हे लक्षात ठेवा की स्मार्टफोन (मोबाइल), टॅब्लेट सारख्या गॅझेट्सद्वारे ऑनलाइन परीक्षेत सहभागी होता येणार नाही.
पेपर पॅटर्न
या ऑनलाइन टेस्टमध्ये मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स (एमसीक्यू) विचारले जातील. वायवा घेतली जाणार नाही. ४ पेपर एकूण 50 गुणांचे असतील, ज्यामध्ये चालू घडामोडी, सादरीकरण आणि संवाद कौशल्यांचे प्रश्न विचारले जातील.
CSEET 2020 Paper Pattern:
कोणत्या विषयातील किती प्रश्न –
- बिझनेस कम्युनिकेशन – ३५ प्रश्न – ५० गुण
- लीगल अॅप्टीट्यूड अँड लॉजिकल रीजनिंग – ३५ प्रश्न – ५० गुण
- इकोनॉमिक अँड बिझनेस एनवायर्नमेंट – ३५ प्रश्न – ५० गुण
- चालू घडामोडी (१५ प्रश्न), प्रेझेंटेशन अँड कम्युनिकेशन स्कील (२० प्रश्न)
- एकूण प्रश्न – १४०
- एकूण गुण – २००
सीसीआयटी २०२० चं आयोजन आधी ७ जुलै रोजी होणार होते, परंतु करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती.
मोफत कोचिंगचा फायदा घ्या
आयसीएसआयने उमेदवारांना मोफत कोचिंग क्लासेस व क्रॅश कोर्सेसदेखील उपलब्ध करूनु दिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना सीएस ऑनलाइन परीक्षेत सहभागी व्हायचे आहे त्यांना आय.सी.एस.आय. च्या वेबसाईटद्वारे या मोफत ऑनलाईन कोर्सचा लाभ घेता येईल.
पुढील विषयांसाठी आहेत ऑनलाइन क्लासेस –
बिझनेस कम्युनिकेशन, करंट अफेयर्स, लीगल अॅप्टिट्यूड, लॉजिकल रीजनिंग, इकॉनॉमिक अँड बिझनेस एनवायर्नमेंट
सोर्स : म. टा.
Table of Contents