ICSE बोर्डाच्या फेरपरीक्षांच्या तारखा जाहीर

ICSCE Board Examination


ICSCE Board Examination  : काउन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CICSE) ने आयसीएसई (दहावी) व आयएससी (बारावी) च्या कंपार्टमेंट व श्रेणीसुधार परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. सीआयसीएसई बोर्ड ६ ते ९ ऑक्टोबर दरम्यान दहावी आणि बारावीच्या कंपार्टमेंट आणि श्रेणीसुधार परीक्षा आयोजित करणार आहे. मंडळाने बुधवारी ही माहिती दिली. अधिकृत माहितीनुसार, कंपार्टमेंट व श्रेणीसुधार परीक्षा संपल्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता निकाल जाहीर केला जाईल.

आयसीएसई बोर्डाने असेही म्हटले आहे की कंपार्टमेंट परीक्षेत यशस्वी न होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी उत्तीर्ण होण्याची संधी दिली जाईल. परंतु, जे विद्यार्थी श्रेणीसुधार परीक्षेत सहभागी होणार नाहीत त्यांना गुण सुधारण्याची दुसरी संधी दिली जाणार नाही.

आयसीएसई, आयएसई परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे :-

  • – आयसीएसई कंपार्टमेंट परीक्षा २०२०: ६ ते ७ ऑक्टोबर
  • – आयसीएसई सुधार परीक्षा २०२०: ६ ते ९ ऑक्टोबर
  • – आयएससी कंपार्टमेंट परीक्षा २०२०: ६ ऑक्टोबर
  • – आयएससी सुधार परीक्षा २०२०: ६ ते ७ ऑक्टोबर

सीआयसीएसई बोर्डाचे मुख्य कार्यकारी आणि सचिव गेरी अराथून म्हणाले, ‘गर्दी टाळण्यासाठी आणि परीक्षा सुरळीत व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेपूर्वीच परीक्षा केंद्रावर पोहोचावे. त्यांनी मास्क व सॅनिटाझर्स सोबत बाळगणे आवश्यक आहे, तर हातमोजे वापरणे वैकल्पिक आहे.’

जुलै महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल मंडळाने जाहीर केला होता. त्यानुसार दहावीत ९९.३४ टक्के तर बारावीत ९६.८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

सोर्स : म. टा.


ICSCE Board Examination : आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या श्रेणीसुधार आणि फेरपरीक्षांची नोंदणी सुरू …

ICSE Board Examination  : काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) म्हणजेच आयसीएसई बोर्डाने ICSE आणि ISC म्हणजेच दहावी आणि बारावीच्या श्रेणीसुधार आणि फेरपरीक्षांची नोंदणी सुरू केली आहे. यासंदर्भातील माहिती बोर्डाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे.

दहावी, बारावी कंपार्टमेंटल आणि इम्प्रूव्हमेंट परीक्षा २०२० साठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमार्फत नोंदणी करता येणार आहे. नोंदणीची अखेरची मुदत २२ सप्टेंबरपर्यंत आहे. करोना काळात आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या ज्या विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आणि विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात आले त्या विषयांसाठी देखील श्रेणीसुधार परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे असे कोणते विषय असतील तर त्यांचीही विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन बोर्डाने केले आहे.

श्रेणीसुधार परीक्षांमध्ये मिळणारे गुण हे अंतिम असतील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असेही बोर्डाने प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.

आयसीएसई बोर्डाचे दहावी आणि बारावीच्या कंपार्टमेंट आणि श्रेणीसुधार परीक्षांच्या नोंदणीबाबतचे सर्क्युलर –

ICSE Board Examination

सीबीएसई बोर्डाची फेरपरीक्षा २२ सप्टेंबरपासून

दरम्यान, सीबीएसई बोर्डाच्या फेरपरीक्षा तसेच श्रेणीसुधार परीक्षा २२ सप्टेंबरपासून होणार आहेत. या परीक्षा देण्यासाठी दहावीचे विद्यार्थी लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडणार आहेत. बारावीचे विद्यार्थी यापूर्वी जेईई आणि नीट परीक्षांच्या निमित्ताने परीक्षा केंद्रांपर्यंत जाऊन आले आहेत. दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा २२ सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. इयत्ता दहावीची परीक्षा २२ सप्टेंबर २०२० ते २८ सप्टेंबर २०२० या कालावधीत घेतली जाणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २२ सप्टेंबर २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत होईल.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड