‘डीजी लॉकर’ची उपयुक्तता
एखाद्या सरकारी कार्यालयात कोणत्याही कामानिमित्त गेल्यानंतर आपल्याला अचानक अमुक एका कागदपत्राची मागणी केली जाते. मात्र, त्या वेळी आपल्याकडे तो कागद नसल्यास आपल्याला सरकारी कार्यालयात पुन:पुन्हा हेलपाटे मारावे लागतात. काही वेळा प्रवासादरम्यान कागदपत्रांची फाइल अथवा बॅग हरवली जाते. अशा वेळी सर्व कागदपत्रे नव्याने बनवण्यासाठी वेळ आणि खर्च या दोन्ही गोष्टी वाया घालवाव्या लागतात. या सर्वातून सुटका करून घ्यायची असेल तर केंद्र सरकारच्या ‘डीजी लॉकर’ सुविधेचा लाभ घेणे आवश्यक आहे. ‘डीजी लॉकर’द्वारे तुम्हाला नेहमी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे आता एका क्लिकवर तुमच्या मोबाइलवर उपलब्ध होऊ शकतात. ‘डीजी लॉकर’ ही क्लाऊड तंत्रज्ञानावर काम करते. नागरिकांना आपल्या सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग करून त्यांची ‘सॉफ्ट कॉपी’ आपल्या ‘डीजी लॉकर’ खात्यात जमा करून ठेवता येते. आपल्याला जेव्हा गरज पडते तेव्हा आपण त्या फाइलची प्रिंटआऊट काढू शकतो.
कसे इन्स्टॉल कराल?
हे अॅप तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येते. याखेरीज kdigilocker.gov.in या संकेतस्थळावरूनही तुम्ही ‘डीजी लॉकर’ हे अॅप डाऊनलोड करून इन्स्टॉल करू शकता. अॅप इन्स्टॉल करून आपला आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक यांची नोंद करून तुम्ही डीजी लॉकरचा वापर करू शकता. यामध्ये पासवर्ड ठेवून तुमची कागदपत्रे सुरक्षित राहतील व ती तुमच्याखेरीज अन्य कुणीही हाताळू शकणार नाही, याची काळजी घेऊ शकता. डीजी लॉकरमध्ये प्रत्येक नागरिकाला सुरुवातीला १० एमबी इतकीच जागा देण्यात आली होती. मात्र, आता एक जीबीपर्यंत करण्यात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
डीजी लॉकरचे उपयोग
- आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, शैक्षणिक कागदपत्रे, व्यक्तिगत कागदपत्रे, पॅनकार्ड, मतदान कार्ड, विद्यापीठ प्रमाणपत्रासाठी किंवा अन्य महत्त्वाची कागदपत्रे ठेवता येतात.
- ही कागदपत्रे आधार क्रमांकाशी जोडण्याचीही सुविधा असते.
- ही कागदपत्रे हवी तेव्हा डाऊनलोड करून त्यांची मुद्रित प्रत काढता येते.
वापरण्याची पद्धत
- डीजी लॉकरचे अॅप वापरण्यासाठी तुम्हाला एक सहा अंकी पिन क्रमांक तयार करावा लागतो. या पिन क्रमांकाच्या मदतीनेच तुम्हाला तुमचे खाते खुले करता येते.
- यानंतर तुम्हाला तुमची कागदपत्रे डीजी लॉकर अॅपवरील लिंकवरून डाऊनलोड तसेच तुमची इतर कागदपत्रे अपलोड करून साठविता येतील.
- डीजी लॉकरमध्ये ‘पीडीएफ’, ‘जेपीईजी’, ‘पीएनजी’, ‘बीएमपी’ आणि ‘जिफ’ या प्रकारातील फायलीच साठवण्याची सोय आहे.
लेखक : प्रा. योगेश हांडगे (लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कॉम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)