Hospicio Hospital Goa Recruitment 2025
दक्षिण गोव्यातील हॉस्पिसिओ इस्पितळात सध्या तब्बल १८७ पदे रिक्त असून, यामुळे मनुष्यबळाची कमतरता भासते आहे. इस्पितळातील एकूण ६४४ पदांपैकी ४५७ पदे भरली असून, कंत्राटी पद्धतीवर १९६ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, मल्टीटास्किंग कर्मचाऱ्यांच्या १७५ पदांपैकी अजूनही ७३ पदे रिक्त असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.
या इस्पितळात थेट येणाऱ्या रुग्णांसोबतच दक्षिण गोव्यातील विविध आरोग्य केंद्रांतून पाठवलेले रुग्णही दाखल होतात. खाटा अपुऱ्या असल्या तरी कोणत्याही रुग्णाला उपचार नाकारले जात नाहीत, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, खाटांची संख्या वाढवली तर आधीच कामाच्या ताणाखाली असलेल्या कर्मचाऱ्यांवर अधिक भार पडेल, त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची तातडीची गरज निर्माण झाली आहे.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातून २०२१ ते २०२५ दरम्यान हजारो रुग्णांना गोमेकॉ आणि बांबोळी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. २०२१ मध्ये ३७१७ रुग्णांपैकी ३ जण, २०२२ मध्ये ३८८५ पैकी १० जण, २०२३ मध्ये ४४४२ पैकी २ जण, २०२४ मध्ये ४७३९ पैकी ३ जण तर २०२५ मध्ये जूनपर्यंत २२०९ रुग्णांपैकी काहींचा मृत्यू झाला आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















