आरोग्य विभागात होणार मोठी भरती, २ हजाराहून अधिक नवीन पदांची निर्मिती! – Massive Recruitment in the Health Department!
Massive Recruitment in the Health Department – Over 2,000 New Positions Created!!
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयांमध्ये २,०७० नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे (Health Department 2000 vacancies), अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. या निर्णयामुळे राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांना मोठा आधार मिळणार आहे.
शासनाने पदनिर्मितीस दिली मान्यता
१३ फेब्रुवारी २०२५ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने एक शासन निर्णय (GR) जारी करून नव्याने स्थापन आणि श्रेणीवर्धित आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक पदनिर्मितीस मंजुरी दिली आहे. राज्यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटर यांसाठी ही पदे मंजूर करण्यात आली आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
८६ नवीन आरोग्य केंद्रांना मनुष्यबळ उपलब्ध होणार
ज्या आरोग्य केंद्रांचे ७५ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे, अशा ८६ आरोग्य संस्थांमध्ये ही भरती होणार आहे. यामध्ये ८३७ नियमित पदे आणि १,२३३ कुशल/अकुशल कर्मचाऱ्यांची भरती बाह्य यंत्रणेद्वारे केली जाणार आहे. या अंतर्गत खालील आरोग्य संस्थांचा समावेश आहे –
- ४७ उपकेंद्रे
- १६ प्राथमिक आरोग्य केंद्रे
- ५ ग्रामीण रुग्णालये
- २ ट्रॉमा केअर युनिट्स
- ४ स्त्री रुग्णालये
- १० उपजिल्हा रुग्णालये
- २ जिल्हा रुग्णालये
राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा पाया मजबूत होणार
ही पदनिर्मिती राज्याच्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेला बळकट करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. सरकारने रिक्त जागा टप्प्याटप्प्याने भरण्याचा निर्णय घेतला असून लवकरच या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना अधिक चांगल्या आणि तत्पर आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल.
गट अ आणि गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांना संधी
सार्वजनिक आरोग्य विभागात यापूर्वी झालेल्या गट अ (MBBS) वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षा यादीतील ४०८ उमेदवारांना आणि गट ब (BAMS) वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षा यादीतील २५ उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात निर्देश दिले असून लवकरच त्यांची नियुक्ती होणार आहे.
राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार
राज्यभरातील विविध आरोग्य संस्थांमध्ये भरती होत असल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होईल. तसेच, भविष्यात आणखी पदे निर्माण करण्यासाठी आणि रिक्त जागा भरण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या मेगाभरतीमुळे राज्यातील हजारो तरुणांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.