Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मुख्याध्यापकांची ११६ पदे रिक्त, पुढील महिन्यात पदोन्नती!

There are three and a half thousand Zilla Parishad schools in the district and 457 posts of headmasters have been approved. Out of this 342 posts are working and 116 posts are vacant. Last year in February 2022, teachers were promoted and 169 posts of principals were filled. But still 116 posts are vacant. Now these promotions will be held at the end of May next month and everyone will be paying attention to how many teachers accept the promotion.

 

जिल्ह्यात साडेतीन हजार जिल्हा परिषद शाळा असून मुख्याध्यापकांची ४५७ पदे मंजूर आहेत. यातील ३४२ पदे कार्यरत असून ११६ पदे रिक्त आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी २०२२ मध्ये शिक्षकांची पदोन्नती होऊन मुख्याध्यापकांची १६९ पदे भरली गेली. परंतु अजूनही ११६ पदे रिक्त आहेत. आता पुढील महिन्यात मे अखेर या पदोन्नती होणार असून त्यात किती शिक्षक पदोन्नती स्वीकारतात, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.

 

सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळते. परंतु अनेकदा पन्नाशी ओलांडलेले शिक्षक मुख्याध्यापकपदाची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करतात. बारा वर्षे सेवा झाल्यानंतर शिक्षकाची वेतनश्रेणी व मुख्याध्यापकाची वेतनश्रेणी जवळजवळ सारखीच असते. त्यामुळे पगारासाठी नव्हे तर केवळ पदासाठी काही शिक्षक मुख्याध्यापक होण्याला पसंती देतात. परंतु बदलीच्या वेळी प्रत्यक्ष समुपदेशनाच्या वेळी सोयीचे ठिकाण मिळाले नाही तर बहुदा शिक्षकांकडून पदोन्नती नाकारली जाते. हे प्रमाण अनेकदा ५० टक्क्यांपर्यंतही जाते.

 

तालुकानिहाय रिक्त पदे अशी –
अकोले- १०, संगमनेर ६, कोपरगाव ९, राहाता ५, श्रीरामपूर ५, राहुरी ११, नेवासा ८, शेवगाव १०, पाथर्डी ६, जामखेड ५, कर्जत ६, श्रीगोंदा ८, पारनेर १०, नगर १७

 

 

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे माध्यमिक विभागासाठी मंजूर असलेली मुख्याध्यापकांची १७पैकी १५ पदे आजतागायत रिक्त आहेत. तर दुसरीकडे महापालिका शाळेत प्रभारी मुख्याध्यापकपद सांभाळणारे तब्बल १५ सहाय्यक शिक्षक नऊ वर्षांपासून मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. पदोन्नतीकरिता वारंवार मागणी करूनही विभागामार्फत कोणतीही कार्यवाही होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी आता आयुक्तांनीच लक्ष घालण्याची मागणी पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या शिक्षकांनी केली आहे.

विशेष म्हणजे प्रभारी मुख्याध्यापकपद सांभाळणाऱ्या सहाय्यक शिक्षकांना मुख्याध्यापकपदाचा कोणताही आर्थिक व अन्य सेवाविषयक लाभ मिळत नाही. त्यामुळे या शिक्षकांचे आतापर्यंत किमान १० ते १५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पदोन्नती समितीची बैठक लवकरात लवकर आयोजित करून माध्यमिक शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने मुख्याध्यापक संवर्गात पदोन्नती देण्याची मागणी प्रभारी मुख्याध्यापकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Source : Mata


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड