खुशखबर! ग्रंथालयांमध्ये लवकरच विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु होणार! – Granthalaya Latest Jobs
Granthalaya Latest Jobs
ग्रंथालयांमध्ये अनेक उमेदवार विविध पदांसाठी नोरी मिळवण्याचे प्रयत्न करत असतात. सध्या जिल्ह्यातील विविध ग्रंथालयात मनुष्य बाळाची कमतरता आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन करीत आहोत. ज्ञानदानाचे हे कार्य शाश्वत असून ते सर्वांनी अखंडित सुरू राहण्यासाठी कार्यरत राहूया. शासन प्रत्येत जिल्ह्यात एका केंद्रास मंजुरी देते. या वेळी कोकण विभागातून सिंधुदुर्ग, मुंबई आणि ठाणे या तीन केंद्रांनाच मान्यता मिळाली आहे. ग्रंथालयात प्रशिक्षित माणसांची भरती केली जाणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके यांनी येथे केले.
महाराष्ट्र शासनमान्य ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग २०२५ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ आणि कोकण विभाग ग्रंथालय संघ यांच्या शिफारशीने रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथसंग्रहालय (जिल्हा ग्रंथालय) कुडाळ या संस्थेस केंद्र सिंधुदुर्ग चालविण्यास मान्यता मिळाली आहे. या वर्गाचा उद्घाटन समारंभ व २०२४ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम नुकताच कुडाळ येथे झाला. या कार्यक्रमात मसके बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष अरविंद शिरसाट, कार्यवाह डॉ. विवेक पाटणकर, कोकण विभाग संघाचे सदस्य राजन पांचाळ, सदस्य सतीश गावडे, जयेंद्र तळेकर, वर्गाचे मुख्याध्यापक प्रसाद जाधव, विषय शिक्षक सिद्धेश राऊळ, स्वाती भागवत, सुशांत वालावलकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन आणि श्री देवी सरस्वती देवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार हार घालून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
शिक्षण हे नोकरी मिळावी यासाठी आवश्यक आहेच, परंतु वेगवेगळे कोर्सेस करून सातत्याने ज्ञान वाढविले पाहिजे. त्यामुळे आपले ज्ञान वाढतेच आणि ज्ञानसंपन्न पिढी घडविण्याचे काम ग्रंथालयाच्या माध्यमातून करू शकतो. त्यासाठी आपण सर्वांनी याचा लाभ घेतला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. पाटणकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी, आपण ज्या ग्रंथालयात बसलो आहोत, या ग्रंथालयास १६४ वर्षे पूर्ण झालेली आहेत. या संस्थेस हे केंद्र मंजूर केल्याबद्दल जिल्हा व विभाग ग्रंथालय संघाचे आभार मानतो. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर हायस्कूल, कॉलेज, सार्वजनिक ग्रंथालये, औद्योगिक ग्रंथालय या ठिकाणी काम करण्याची संधी मिळू शकते, असे सांगितले. वर्गव्यवस्थापक राजन पांचाळ यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक प्रसाद जाधव यांनी आभार मानले. मान्यवरांच्या हस्ते २०२४ मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App