Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

१७ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एक हजारांहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त! – Government Medical College Bharti 2024

Government Medical College Bharti 2024

Government Medical College Bharti 2024

Government Medical College Bharti 2024: The posts of Assistant Professors, Associate Professors and Professors are vacant in Medical Colleges and Hospitals run by the Department of Medical Education. The shortage of teachers is affecting the education of postgraduate medical students. There is also difficulty in creating a thesis and summary. One of the Assistants, Associates and Professors is appointed as PG Guide. This PG guide shows the right path for medical students. As a rule, a medical student gets a PG mentor. However, due to the shortage of teachers, one teacher is burdened with many medical students. Abhijit Helge has mentioned in the letter.

More than 1000 posts of teachers are lying vacant in 17 medical colleges of the state for many years. This is affecting the studies of more than six thousand students (doctors) pursuing Doctor of Medicine (MD) and Master of Surgery (MS). Therefore, a request has been made to the Medical Minister to immediately appoint qualified teachers in the medical colleges.

 

राज्यातील १७ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एक हजारांहून अधिक शिक्षकांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे डॉक्टर ऑफ मेडिसिन (एमडी) आणि मास्टर ऑफ सर्जरी (एमएस) करणाऱ्या सहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या (डॉक्टर) अभ्यासावर परिणाम होत आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तातडीने पात्र शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी विनंती वैद्यकीय मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या सेंट्रल मार्डने शिक्षकांच्या कमतरतेबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र लिहिले आहे. यामध्ये लवकरात लवकर शिक्षकांची नियुक्ती करण्याची विनंती करण्यात आली आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. थीसीस आणि सारांश तयार करण्यातही अडचण येते. असिस्टंट, असोसिएट आणि प्रोफेसर्सपैकी एकाला पीजी गाईड म्हणून नियुक्त केले जाते. हे पीजी मार्गदर्शक वैद्यकीय विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवते. नियमानुसार वैद्यकीय विद्यार्थ्याला पीजी मार्गदर्शक मिळतो. मात्र, शिक्षकांच्या कमतरतेमुळे एका शिक्षकावर अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांचा भार असल्याचे केंद्रीय मार्डचे अध्यक्ष डॉ. अभिजित हेलगे यांनी पत्रातून नमूद केले आहे.

या विभागात सर्वाधिक रिक्त पदे

ऑर्थोपेडिक्स, त्वचा, रेडिओलॉजी, कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी आणि पल्मोनोलॉजी या विभागांमध्ये शिक्षकांची सर्वाधिक कमतरता असल्याचे एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. जे.जे. रुग्णालय समूहात प्रोफेसरच्या दोन, असोसिएट प्रोफेसरच्या आठ आणि सहायक प्रोफेसरच्या २० जागा रिक्त आहेत.

 


Government Medical College Bharti 2023

Government Medical College Bharti 2023: The latest update for Government Medical College Recruitment 2022. Super Specialty Hospital in Pune has filled 121 posts of Associate Professors, Assistant Professors as well as Dr. Also, Medical Education Minister Girish Mahajan informed in the legislative council that the process of filling up the vacant posts in other super specialty hospitals is going on. Regarding the facilities in the super specialty hospital in the state, member Dr. Wajahat Mirza had presented the attention. Answering this, Minister Shri. Mahajan was speaking.

 

पुण्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अतिविशेषोपचार विषयात अध्यापकीय संवर्गात सहयोगी प्राध्यापक , सहायक प्राध्यापक तसेच क व ड संवर्गातील १२१ पदे भरण्यात आली आहेत. तसेच इतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सुविधांबाबत सदस्य डॉ. वजाहत मिर्ज़ा यांनी लक्षवेधी मांडली होती. यास उत्तर देताना मंत्री श्री. महाजन बोलत होते.

 

मंत्री श्री.महाजन म्हणाले की, पुण्यातील ससून रूग्णालयात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता विविध आजारांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात आलेले आहे. अतिविशेषोपचार विषयात अध्यापकीय संवर्गातील सहयोगी प्राध्यापक पदांच्या २ व सहायक प्राध्यापक पदांची ७ पदे मंजूर आहेत. त्याचप्रमाणे गट-क व गट-ड संवर्गात १२१ पदे भरण्यात आली आहेत.

अतिविशेषोपचार विषयातील रुग्णसेवेची निकड तसेच पदव्यत्तर विद्यार्थी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने मंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर येथील विशेषोपचार विषयातील काही अध्यापकीय पदांचे स्थानांतरण व रुपांतरण तसेच काही पदे समर्पित करून ही पदे नव्याने निर्माण करण्यात येणार आहेत.

त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर या संस्थेकरिता गट-अ ते गट-ड मधील एकूण १३५ पदे निर्माण करण्यात आली आहेत. तसेच केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजनांतर्गत राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद येथे अतिविशेषोपचार रुग्णालये सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर ४ अतिविशेषोपचार रुग्णालयांकरिता एकूण १८४७ पदे आवश्यक असून प्रथम टप्याकरिता आवश्यक असलेली गट-अ ते गट-ड संवर्गात एकूण ८८८ पदे निर्माण करण्यात आली आहे. उर्वरित द्वितीय व तृतीय टप्प्यासाठी आवश्यक असलेली अनुक्रमे ५५३ व ४०६ तसेच तांत्रिक संवर्गातील गट-क व गट-ड मधील अतिरिक्त २४८ अशी एकूण १२०७ पदे निर्माण करण्यात येणार आहेत.

अतिविशेषोपचार विषयातील अध्यापकीय वर्गातील प्राध्यापक-९, सहयोगी प्राध्यापक- १३ व सहायक प्राध्यापक-५९ इतक्या उमेदवारांना विविध अतिविशेषोपचार रुग्णालयात नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले असल्याची माहितीही मंत्री श्री.महाजन यांनी यावेळी दिली.


सध्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांचे पददेखील प्रभारीच आहे. त्याशिवाय मंजूर २३ पैकी ११ अधिष्ठाता, ४९० पैकी १६८ प्राध्यापक, ११२६ पैकी २०६ सहयोगी प्राध्यापक व १७६५ पैकी ८२४ सहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ‘एनएमसी’च्या तपासणीवेळी याच वैद्यकीय शिक्षकांची ‘उसनवारी’ करण्याची वेळ अजूनही येत आहे आणि हा उसनवारीचा उद्योग वर्षानुवर्षे सुरुच आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक संवर्गात १०५, सहयोगी प्राध्यापक १५६, तर सहायक प्राध्यापकांची ७९७ अशी एकूण १०५८ पदे रिक्त असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत दिली.

एकूण १,२०१ पदांचे मागणीपत्र आयोगास पाठविण्यात आले आहे. त्यापैकी २१५ अध्यापकांना पदस्थापना देण्यात आली आहे. १५९ अध्यापकांना पदस्थापना प्रस्तावित आहे. उर्वरित पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदांबाबत प्राध्यापक १३३ व सहयोगी प्राध्यापक १८३ पदांचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागास सादर केला आहे. विभागाने शिफारस केलेले प्राध्यापक १०५ व सहयोगी प्राध्यापक १५३ जणांना पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आल्याचेही त्यांनी लेखी उत्तरात सांगितले…

 • राज्यात डझनभर नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा घाट घालण्यात आला आहे; परंतु सध्या सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षकांची तब्बल १२०० पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत.
 • ही पदे अनेक दिवसांपासून भरली जात नसताना आणि एकूणच वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा खालावत असताना, नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 • महत्वाचे म्हणजे थेट अधिष्ठातांपासून अगदी सहाय्यक प्राध्यापकांपर्यंतची पदे रिक्त असल्याचेही यानिमित्ताने समोर येत आहे.
 • अशी एकंदर स्थिती असताना वैद्यकीय शिक्षकांची नियुक्ती नगण्य होत आहे आणि पुन्हा १२ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.
 • त्यामुळे नवीन महाविद्यालये सुरू केली जात असताना जुन्या महाविद्यालयांच्या रिक्त पदांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ शिक्षकांची नव्हे तर परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी व इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही पदे लक्षणीय प्रमाणात रिक्त आहेत.
 • या सगळ्याचा फटका वैद्यकीय शिक्षणाला तसेच रुग्णसेवेलाही बसत आहे आणि वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता सातत्याने घटत असल्याचा आरोप होत आहे.

‘सुपरस्पेशालिटी’त नियुक्ती केव्हा?

 • मराठवाड्यातील औरंगाबाद व लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांर्तगत अतिविशेषोपचार केंद्रांच्या (सुपरस्पेशालिटी ब्लॉक) सुसज्ज इमारती मागेच उभ्या करण्यात आल्या आहेत.
 • या केंद्रांमध्ये विविध प्रकारची उपकरणे व यंत्रसामुग्रीही सज्ज आहे. या केंद्रांतील डॉक्टरांच्या पदांना उशिरा का होईना मंजुरीही मिळाली.
 • मात्र अद्यापही नियुक्ती झालेली नाही.
 • शासकीय विभागीय कर्करुग्णालयाची स्थितीही त्यापेक्षा वेगळी नाही.
 • परिणामी, कोट्यवधी रुपये खर्चूनही अपेक्षित असलेली अद्ययावत रुग्णसेवा सुपरस्पेशालिटीतून मिळत नसल्याचे चित्र आहे.

‘एनआयआरएफ’मध्ये शून्य स्थान

 • ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रॅंकिंग फ्रेमवर्क’अंतर्गत (एनआयआरएफ) देशातील ५० उत्तम वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश नाही.
 • केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत वेगवेगळ्या निकषांच्या आधारे ही सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालयांची यादी जाहीर केली जाते.
 • या यादीत महाष्ट्रातील एकाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्थान मिळाले नसल्याचे सलग काही वर्षांपासून दिसून येत आहे.

महत्त्वाचे – वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 568 पदे रिक्त!! Government Medical College Recruitment 2022

Government Medical College Bharti 2022 : In the state, 946 posts of assistant professors in 13 different subjects have been sanctioned in 22 medical colleges. Of these, 378 seats have been filled and 606 percent or 586 seats are vacant. With the exception of the Department of Ophthalmology, Gynecology and Surgery, more than 50 percent of the vacancies in the remaining 10 departments are vacant. Further details are as follows:-

राज्यातील वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) डॉक्टरांच्या तब्बल ६० टक्के जागा रिक्त आहेत. यातही नेत्र, स्त्री रोग व शल्यचिकित्सा विभाग सोडल्यास उर्वरित १० विभागांतील सहायक प्राध्यापक संवर्गातील ५० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहेत. 

Government Medical College Vacancy 2022

Government Medical College Bharti 2022

राज्यात शासकीय डॉक्टरांच्या ६० टक्के जागा रिक्त | Government Medical College Bharti 2022

राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांचा विचार केला असता, या महाविद्यालयांवर तज्ज्ञ व कौशल्यप्राप्त डॉक्टर घडविण्यासोबत ‘टर्शरी केअर’चीही जबाबदारी आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आधीच मंजूर पदांची संख्या कमी पडत आहे. त्यात रिक्त पदांमुळे कार्यरत डॉक्टरांवर कामाचा ताण पडला आहे.

सहायक प्राध्यापकांच्या ५८६ जागा रिक्त

 • राज्यात २२ मेडिकल कॉलेजमधील १३ विविध विषयांतील सहायक प्राध्यापकांच्या ९४६ जागा मंजूर आहेत.
 • यातील ३७८ जागा भरलेल्या असून, तब्बल ६० टक्के म्हणजे, ५८६ जागा रिक्त आहेत.

Government Medical College Bharti 2022


Government Medical College Bharti 2022

Government Medical College Bharti 2022 : A total of 9 posts of 1 Professor, 3 Associate Professors and 5 Assistant Professors have been sanctioned in Pune, Nagpur and Akola Medical Colleges. Further details are as follows:-

GMC Bharti 2022

पुणे, नागपूर, अकोला वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १ प्राध्यापक, ३ सहयोगी प्राध्यापक व ५ सहायक प्राध्यापक अशी एकूण ९ पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

BJGMC Pune Bharti 2022 | बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे भरती नवीन जाहिरात प्रकाशि

GMC Kolhapur Bharti 2022 | GMC कोल्हापूर अंतर्गत थेट मुलाखती आयोजित – नवीन जाहिरात प्रकाशित

GMC Akola Bharti 2022 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) अकोला अंतर्गत नवीन भरती सुरू

GMC Nagpur Bharti 2022 | GMC नागपूर येथे तंत्रज्ञ सह डेटा एंट्री ऑपरेटर पदांची नवीन भरती सुरु

VMGMC Solapur Bharti 2022 | वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (VMGMC) सोलापूर अंतर्गत 95 रिक्त पदांची नवीन भरती

A decision was taken at a recent cabinet meeting to create 9 teaching posts in the medical colleges at Nagpur, Pune and Akola by increasing the existing manpower under the Center of Excellence scheme. The meeting was chaired by Chief Minister Uddhav Thackeray.

त्यानुसार वै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला या तीन संस्थांकरिता १ प्राध्यापक, ३ सहयोगी प्राध्यापक व ५ सहायक प्राध्यापक अशी एकूण ९ पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पदांसाठी वार्षिक रु.१.७५,१०,६५२/- (रु. एक कोटी पंच्चाहत्तर लाख दहा हजार सहाशे बावन्न फक्त ) खर्च होईल. तसेच सद्याच्या एकूण २७ पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये अतिरिक्त ५९ पदव्युत्तर विद्यार्थ्यांची वाढ होईल.


Government Medical College Recruitment 2021 Details 

Government Medical College Bharti 2021 : Recruitment of 790 posts of professors in GMC has been started through MPSC; But given the slow pace of the commission’s work, medical students are skeptical about when the posts will be filled. Further details are as follows:-

राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सहयोगी प्राध्यापकांची तब्बल ७९० पदे रिक्त आहेत. त्या भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाने प्रक्रिया सुरू केली आहे; पण आयोगाच्या कामकाजाची मंद गती पाहता ही पदे केव्हा भरली जातील याबाबत वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी साशंक आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्यात काही नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये मंजूर झाल्याने रिक्त जागांचा प्रश्न चर्चेत आला आहे. सातारा शासकीय सर्वोपचार रुग्णालयात व वैद्यकीय महाविद्यालयाला येत्या शैक्षणिक वर्षापासून १०० जागांवर प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने गुरुवारी (दि. १६) मंजुरी दिली. पण तेथे कामासाठी प्राध्यापकच उपलब्ध नाहीत. परिषदेच्या पाहणीवेळी मिरज, सांगली, पुणे व सोलापुरातून प्राध्यापक तात्पुरते नियुक्त केले होते. अलिबाग, सिंधुदुर्ग व उस्मानाबादेतही नव्या महाविद्यालयांचे काम सुरू आहे; पण तेथेही प्राध्यापक नाहीत.

Government Medical College Bharti 2021

Government Medical College Bharti 2021

सध्या राज्यभरात तीन-तीन महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर प्राध्यापक नियुक्तीस आहेत. एमपीएससीच्या भरतीप्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज करणाऱ्यांमध्ये सध्या मानधनावर काम करणारेच बहुसंख्येने आहेत. एमबीबीएसनंतर एमडी किंवा एमएस आणि किमान एक वर्षाचा निवासी डॉक्टर म्हणून सेवेचा अनुभव अशी पात्रता अपेक्षित आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपली. एमपीएससीच्या कार्यपद्धतीनुसार उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही, गरजेनुसार चाळणी परीक्षा होईल. मुलाखती मात्र होणार आहेत. ही प्रक्रिया कितपत गतीने पूर्ण होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. नव्या महाविद्यालयांना यातूनच प्राध्यापक मिळणार आहेत.

With the approval of some new government medical colleges in the state, the issue of vacancies has come up for discussion. The National Medical Council on Thursday (Dec. 16) approved the admission process for Satara Government General Hospital and Medical College for 100 seats from the coming academic year. But there are no professors available for work. During the inspection of the council, professors were temporarily appointed from Miraj, Sangli, Pune and Solapur. New colleges are also being set up in Alibag, Sindhudurg and Osmanabad; But there are no professors there

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…

 

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. MahaBharti says

  New Update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड