नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज मागविले !! – Government Hostel Admission 2024

Government Hostel Admission Online Apply 2024

Government Mahila Hostel Admission Process 2024

Government Hostel Admission Process:  नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. बोरिवली येथील वसतीगृहात सन २०२४-२५ या वर्षाकरिता प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन व्यवस्थापक, शासकीय वसतिगृह, बोरिवली यांनी केले आहे. या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ या प्रवर्गातील असाव्यात. तसेच अर्जदार महिलेचे मासिक उत्पन्न ३० हजारांपेक्षा जास्त नसावे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्त, समाजकल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-७१ येथे संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


Government Hostel Admission Process

Government Hostel Admission 2023 – The admission process for the academic session 2023-24 of government hostels run by the department for backward class students has been completed and the date for spot admission on vacant seats in addition to the first and second admission selection lists has been fixed as November 17.

 

 

विभागाद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी शासकीय वसतिगृहाची सन २०२३- २४ या शैक्षणिक सत्रासाठीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून पहिल्या व दुसऱ्या प्रवेश निवड यादी व्यतिरिक्त रिक्त जागेवर स्पॉट अॅडमिशन देण्याची तारीख १७ नोव्हेंबर ही निश्चित करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता सहायक आयुक्त, सामाजिक न्याय भवन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर, श्रद्धानंद पेठ, नागपूर येथे आवश्यक कागदपत्रांसह हजर व्हावे. विद्यार्थी निर्धारित तारखेस हजर न झाल्यास त्यांचा प्रवेश निश्चित केला जाणार नाही व त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील, असे जाहीर आवाहन सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, वसंतनगर, नागपूर या कार्यालयाशी संपर्क करावा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 


Government Hostel Admission Process : The Government Hostel Admission process has been started by the Department of Social Justice. Interested candidates apply now. The admission process for the academic session is underway and the schedule for filling up the application form for the vacancy has been announced. Further details are as follows:-

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी शासकीय वसतिगृह सुरु करण्यात आले आहे. शैक्षणिक सत्राकरीता प्रवेश प्रक्रीया सुरु असून रिक्त जागेकरीता प्रवेश अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 

 

  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी शासकीय वसतिगृह, निवासी शाळा सुरु करण्यात आली असून चालू शैक्षणिक सत्राकरीता प्रवेश प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.
  • चालू शैक्षणिक सत्राच्या रिक्त जागेकरीता वसतिगृह प्रवेश अर्ज भरण्याचे वेळापत्रक समाज कल्याण आयुक्तालयाकडून प्राप्त झाले आहे.
  • ज्या विद्यार्थी व विद्यार्थिंनीना शासकीय वसतिगृहात प्रवेश घ्यावयाचा आहे.
  • त्यांनी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, रहाटे कॉलनी, वर्धा रोड येथून अर्ज प्राप्त करुन निर्धारित मुदतीत सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.

वेळापत्रक यानुसार

  • शासकीय वसतिगृहाचे वेळापत्रकानुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 15 जुलै पर्यंत राहील.
  • पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिध्द करण्याचा दिनांक 18 जुलै राहील.
  • पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 25 जुलैपर्यंत, रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 27 जुलै आहे.
  • दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 5 ऑगस्टपर्यंत सुरु राहील.
  • पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे 10 ऑगस्टपर्यंत राहील.

दहावी अकरावीनंतर

  • दहावी व अकरावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ( व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून)ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 30 जुलै पर्यंत आहे.
  • पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिध्द करण्याचा दिनांक 5 ऑगस्ट राहील.
  • पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 14 ऑगस्टपर्यंत आहे.
  • रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 17 ऑगस्ट आहे.
  • तर दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 27ऑगस्टपर्यंत सुरु राहील.
  • पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे 31 ऑगस्ट 2022पर्यंत पूर्ण होईल.

पदवी व पदव्युत्तरसाठी

  • बी.ए, बी.कॉम व बी.एस.सी. अशा बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका व पदवी आणि एम.ए.एम.कॉम व एम.एस.सी असे पदवी नंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदविकास आदी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 24ऑगस्टपर्यंत आहे.
  • पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिध्द करण्याचा दिनांक 10 सप्टेंबर आहे.
  • पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 13 सप्टेंबरपर्यंत राहील.
  • यानंतर रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 23 सप्टेंबर आहे.
  • दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 28 सप्टेंबरपर्यंत सुरु राहील.
  • पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे 31 सप्टेंबर 2022पर्यंत पूर्ण होईल.

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी

  • व्यावसायिक अभ्यासक्रम ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 30 सप्टेंबर 2022पर्यंत आहे.
  • पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिध्द करण्याचा दिनांक 3 ऑक्टोबर पर्यंत राहील.
  • पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 13 ऑक्टोरपर्यंत आहे.
  • रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील गुणवत्तेनूसार निवड यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 15 ऑक्टोबर आहे.
  • दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 25 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहील.
  • पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे 28 ऑक्टोबर 2022 पर्यंत सुरु राहील.
  • अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नागपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड