घरबसल्या नोकऱ्या शोधा – गुगलचं नवं अॅप भारतात लाँच!!

Google Kormo App for Jobs Search in India

Google Kormo App for Jobs Search in India : गुगलचं नवं अॅप भारतात लाँच झालं आहे. एंट्री लेवलच्या नोकऱ्या शोधण्यासाठी हे अॅप खूप फायदेशीर ठरणार आहे.

Google Kormo App for Jobs Search in India: आता धावपळ केल्याशिवाय एका जागी बसून नोकरी शोधण्याची संधी चालून आली आहे. यासाठी पुढाकार घेतला आहे गुगल सर्च इंजिनने. गुगलने आपलं जॉब सर्च अॅप्लिकेशन भारतात लाँच केले आहे. गुगलच्या या जॉब सर्च अॅपचं नाव आहे – कॉर्मो (Kormo). हे अॅप भारतातील लाखो तरुणांना एंट्री लेवलच्या नोकऱ्या शोधण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार असल्याचा दावा गुगलने केला आहे.

टेक क्रंचनुसार गुगलने भारतात कॉर्मो जॉब्सला आपलं पेमेंट अॅप्लिकेशन गुगल पे (Google Pay) शी जोडलं आहे. भारतात हे जॉब स्पॉट कॉर्मो जॉब्स या रुपात उपलब्ध केले जाईल. गुगल ने हे अॅप २०१८ साली बांगलादेशमध्ये लाँच केले आहे. यानंतर इंडोनेशियात देखील या अॅपचा विस्तार केला गेला आणि आता ते भारतात आणण्यात आले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कंपनीने असा दावा केला आहे की हे अॅप गुगल पे द्वारे लाँच केल्यापासून झोमॅटो, डुंजोसह अनेक कंपन्यांनी यावर २० लाखांहून अधिक नोकऱ्यांच्या ऑफर पोस्ट केल्या आहेत.

हा अॅप यूजर्सना केवळ एन्ट्री लेवलच्याच नोकऱ्या शोधण्यास मदत करणार नाही तर रेझ्युमे / सीव्ही बनवण्यास आणि नवी कौशल्ये शिकण्यासदेखील मदत करणार आहे.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Pravin Ghorpade says

    Sir Any job for exservivemen persons .please inform.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड