गोंडवाना विद्यापीठातील भरतीला स्थगिती
Gondwana University Bharti 2020
२५ मे २०२० – गोंडवाना विद्यापीठातील ३६ प्राध्यापक व सहायक प्राध्यापकांच्या भरतीला अर्थ विभागाने आर्थिक कारणामुळे स्थगिती दिली आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्याने विद्यापीठाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भरती प्रक्रियेला राज्याच्या अर्थविभागाने स्थगिती दिली आहे. ३६ पदभरतीची फाईल अर्थ खात्याकडे गेली होती. परंतू, आर्थिककारणांमुळे ही फाईल परत पाठविण्यात आली तसेच भरती प्रक्रियेला स्थगितीही दिली गेली आहे. कुलगुरू डॉ. कल्याणकर यांना यासंदर्भात माहिती नाही असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
२३ मे २०२० अपडेट – करोना टाळेबंदीत गोंडवाना विद्यापीठाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापकांच्या ३६ पदांच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यास कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी व्यवस्थापन परिषदेच्या आज ऑनलाईन झालेल्या बैठकीत स्पष्ट शब्दांत नकार दिला. उलट भरती प्रक्रिया राबविण्यासाठी ‘एक्सपर्ट पॅनल’ नियुक्त करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. तसेच ही प्रक्रिया शासनाच्या निर्देशानुसार टाळेबंदीनंतरच राबविण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
गोंडवाना विद्यापीठात प्राध्यापक व सहायक प्राध्यापकांच्या ३६ पदांच्या भरतीला काही संघटना व सिनेट सदस्यांनी विरोध दर्शविला आहे. तर काही भरती प्रक्रिया झालीच पाहिजे या मताचे आहेत. कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळेच घाईने टाळेबंदीत ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे, असाही काहींचा सूर आहे. करोनाच्या टाळेबंदीत भरती पक्रिया राबविली असल्याने वादग्रस्त ठरली आहे.
अशातच आज गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत बहुसंख्य सदस्यांनी भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली. मात्र, कुलगुरू डॉ. कल्याणकर आणि सदस्य डॉ. मायी यांनी स्थगितीला स्पष्ट शब्दात नकार दिला. आपल्याला विद्यापीठाचा विकास करायचा असेल तर भरती प्रक्रिया राबवावीच लागेल असे त्यांनी स्पष्ट केले. टाळेबंदीत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल, त्यांच्या कागदपत्रांचे ११ सेट ३१ मेपर्यंत पोहचत नसतील तर त्यांना आपण वेळ देवू, त्यांची कागदपत्र ऑनलाईन अर्जावरून काढून घेवू, त्यांचा सहानभूतीपूर्वक विचार करू असे कुलगुरू म्हणाले.
विशेष म्हणजे आज प्रत्येक विषयाचे ‘एक्सपर्ट पॅनल’ नियुक्त करण्याचा विषय एकमताने घेण्यात आला. प्रत्येक विषयासाठी सहा तज्ज्ञांची नावे दिली गेली. शासनाच्या निर्देशाप्रमाणे ही भरती राबविण्यात येणार आहे. टाळेबंदीमुळे सध्या कुठल्याही प्रकारच्या मुलाखती घेतल्या जाणार नाहीत. टाळेबंदीनंतरच भरती राबवू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Iti sathi mula na job bhetla pahije sir ji
Sir Ward boy list latur Kadi lagnar ahe