तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात! – Goa PSC Recruitment 2024

Goa PSC Recruitment 2024

Goa PSC Recruitment 2024 Update

 

राज्य कर्मचारी निवड आयोगाने एलडीसी व ज्युनियर स्टेनो अशा २८५ पदांसाठी अभ्यासक्रम व निकष जाहीर केले आहेत. दोन्ही पदांसाठी कम्प्युटर अॅप्लिकेशन व टायपिंग स्पीड प्रती मिनिट ३० ते ३५ शब्द आवश्यक आहे. इंग्रजी, न्युमरिकल क्षमता चाचणी होईल. डेटा इंटरप्रिटेशन व कोंकणीतून पेपरही घेतला जाईल. अनारक्षित पदांसाठी संगणक आधारित परीक्षेत (CBT) किमान ४५ टक्के तर आरक्षित पदांसाठी किमान ३५ ते ४० टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. आयोगामार्फत परीक्षा झाल्यानंतर २४ तासात निकाल जाहीर केला जातो.

 

 

गोवा कर्मचारी निवड आयोगाने नियम ४ मध्ये बदल करून केवळ स्पष्ट रिक्त जागा कळविण्याचा आदेश दिला आहे. खात्यांना संभाव्य रिक्त जागा कळविता येणार नाहीत, अशी तरतूद केली आहे. आयोगाने ‘गोवा कर्मचारी निवड आयोग (परीक्षा, कनिष्ठ सेवा/पदांची निवड व आयोगाच्या कामकाजाची प्रक्रिया)’ नियमांमध्ये सुधारणा केली आहे. नियम ११ मध्ये कौशल्य चाचणीबाबत सुधारणा केली आहे. कौशल्य चाचणी आयोग स्वतः किंवा नियुक्त अधिकाऱ्यांच्या समितीद्वारे आयोजित करू शकतो. गोवा राज्य कर्मचारी भरती आयोगाने केलेल्या सुधारित नियमांमुळे निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व अचूकता येणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत कडक नियम लागू केल्याने अपात्र अर्जदारांना रोखण्यास मदत होईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या चाचणीच्या क्रमाचा निर्णय आयोग घेईल. कौशल्य चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणीच्या गुणांच्या आधारे केली जाईल. नियम १२ मध्ये प्रतीक्षा यादी तयार करताना पूर्वी २५ टक्के किंवा २ उमेदवारांचा समावेश करण्यात येत होता. ही संख्या वाढवून ४० टक्के किंवा ५ उमेदवार केली आहे.

या सुधारित नियमांमुळे निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व अचूकता येणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत कडक नियम लागू केल्याने अपात्र अर्जदारांना थांबविण्यात मदत होईल. कौशल्य चाचणी व प्रतीक्षा यादीच्या संदर्भातील बदल उमेदवारांना न्याय्य संधी प्रदान करतील. नियमावलीच्या सुधारणा आयोगाच्या कामकाजास आणि निवड प्रक्रियेस प्रभावी बनविण्यासाठी महत्त्वाच्या ठरतील, असे आयोगाचे म्हणणे आहे.

 

दिल्ली सदनमधील एक पद भरणार

विविध सरकारी खात्यांमधील ‘क’ गट कर्मचाऱ्यांच्या २८५ रिक्त पदांसाठी गोवा कर्मचारी निवड आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये कनिष्ठ कारकून (एलडीसी) व रिकव्हरी कारकून पदासाठी २३२ पदे तर कनिष्ठ लघुलेखक पदासाठी ५२ पदे तसेच दिल्ली सदनमधील गोवा आयुक्तालय कार्यालयात एक पद भरण्यात येणार आहे. आयोगाने नियम ५ मध्ये सुधारणा करून ऑनलाईन अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचा आदेश दिला आहे. चुकीची कागदपत्रे सादर केल्यास किंवा कागदपत्रे सादर न केल्यास अर्ज सूचना न देता फेटाळला जाईल. कौशल्य चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणीच्या गुणांच्या आधारे केली जाईल. नियम १२ मध्ये प्रतीक्षा यादी तयार करताना पूर्वी २५ टक्के किंवा २ उमेदवारांचा समावेश करण्यात येत होता. ही संख्या वाढवून ४० टक्के किंवा ५ उमेदवार केली आहे.

 


सरकारी खात्यांतील रिक्त असलेल्या सुमारे ९०० जागा आयोगामार्फत भरण्यात याव्यात, अशी मागणी आम आदमी पक्षाचे नेते रामराव वाघ यांनी केली. पक्षांतर केलेले लोकप्रतिनिधी देखील याच घोटाळ्यातून पैसे कमवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिकेंनी केला. राज्य कर्मचारी आयोग स्थापनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. आयोगामार्फत आत्तापर्यंत काहीच जागांची भरती झाली आहे, ज्या उद्देशाने हा आयोग स्थापन केला आहे, तो उद्देश सफल होत नसल्याचे दिसत आहे. सध्या राज्यात ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे या आयोगाची गरज निर्माण झाली आहे आणि सरकारी खात्यांतील रिक्त असलेल्या सुमारे ९०० जागा आयोगामार्फत भरण्यात याव्यात, अशी मागणी आम आदमी पक्षाचे नेते रामराव वाघ यांनी केली.

 

आपच्या येथील कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेस रोहन नाईक (युवा शाखेचे अध्यक्ष), सलमान खान आणि एन. कुतिन्हो यांची उपस्थिती होती. वाघ म्हणाले, नोकर भरतीमध्ये पारदर्शकता आणणार असे भाजपचे नेते सांगत होते. मात्र, सध्या हा आयोग सरकारप्रमाणे निष्क्रिय बनला आहे. राज्यातील युवकांचा सरकारने विश्वासघात केला आहे. त्यांना पात्रतेनुसार नोकरी देणारी यंत्रणा हवी आहे, पारदर्शकता हे केवळ भाजपला सांगण्यासाठी असते. मात्र, काही दलाल पैसे घेऊन नोकरी देण्याचे आमिषे देत आहेत. राज्यातील २८ सरकारी खात्यांत रिक्त जागा असून आयोग स्थापन झाला, तेव्हा हजार रिक्त जागा होत्या. महिन्याकाठी शंभर जागा भरल्या तरी आत्तापर्यंत हा कोटा पूर्णझाला असता.

दरम्यान, ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणी अनेकांना अटक झाली आहे. मात्र, एखाद्या मोठ्या पदावरील व्यक्तीचा भक्कम पाठिंबा असल्याशिवाय अशा गोष्टी घडणे शक्यच नाही. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाच्या मागे असलेल्या मुख्य सूत्रधाराला अटक करणे आवश्यक आहे, असे रोहन नाईक यांनी सांगितले. सध्या भाजपाचे कार्यकर्ते नोकरी देणारे एजंट बनले आहेत. पक्षांतर केलेले लोकप्रतिनिधी देखील याच घोटाळ्यातून पैसे कमवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिकेंनी केला. ते म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांनी गोव्याचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांची चौकशी करावी. कारण, मध्यंतरी भाजपा नेतृत्वाखालील सावंत सरकारमधील या भ्रष्टाचाराविरोधात त्यांनीच आवाज उठविला होता. त्यामुळे त्यांची चौकशी केल्यास दोषीपर्यंत पोहचता येईल, असे भिके म्हणाले.

मतदारांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन देत मतांची भीक मागून भाजपाने सत्ता मिळविली. आज सरकारी नोकऱ्या देण्यासाठी रोखीने भरलेल्या पिशव्या घेतल्या जात आहेत. गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोवा सरकारमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे म्हटले होते. ‘किसीको खाने नहीं दूंगा’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे म्हणणे असूनही मागील १२ वर्षांपासून सर्वच बाजूंनी प्रत्येकजण लोकांची लूटमार करत असल्याचा आरोप भिकेंनी केला.

म्हापशात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक सुधीर कांदोळकर, नगरसेवक अ‍ॅड. शशांक नार्वेकर व परेश पानकर उपस्थित होते.


 

राज्‍य सरकार कर्मचारी भरती आयोगाकडून कर्मचारी भरती करणार की खात्यांनाच पुन्हा ते अधिकार दिले जातील, याची एक मोठी चर्चा राज्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत तिनेक हजार पदे भरण्यासाठी जाहिराती जारी करण्याची तयारी आयोगाने केली आहे. महाराष्ट्रात तलाठी भरतीसाठी महिनाभर परीक्षा घ्यावी लागली होती. कारण उमेदवारांची संख्याच जास्त होती. त्याच धर्तीवर राज्यात लिपिक पदासाठी हजारो उमेदवार अर्ज करून शकतात, असे गृहित धरून ती परीक्षा किती दिवस घ्यावी लागेल, याचा अंदाजही आयोगाकडून घेतला जात आहे. त्याचमुळे तीन हजार पदे भरायची असली तरी त्याच्या जाहिराती एकाचवेळी प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत. 

 

एकेक पद्धतीची पदे भरल्यानंतर पुढील पदे भरण्यासाठीची प्रक्रिया आयोग सुरू करणार आहे. राज्‍य सरकार कर्मचारी भरती आयोगाकडून कर्मचारी भरती करणार की खात्यांनाच पुन्हा ते अधिकार दिले जातील, याची एक मोठी चर्चा राज्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत तिनेक हजार पदे भरण्यासाठी जाहिराती जारी करण्याची तयारी आयोगाने केली आहे. येत्या काही दिवसांत त्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.सरकारने भरती आयोगाकडे सोपविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यात कोणताही बदल करण्याची सरकारची भूमिका नाही.

महाराष्ट्रात तलाठी भरतीसाठी महिनाभर परीक्षा घ्यावी लागली होती. कारण उमेदवारांची संख्याच जास्त होती. त्याच धर्तीवर राज्यात लिपिक पदासाठी हजारो उमेदवार अर्ज करून शकतात, असे गृहित धरून ती परीक्षा किती दिवस घ्यावी लागेल, याचा अंदाजही आयोगाकडून घेतला जात आहे. त्याचमुळे तीन हजार पदे भरायची असली तरी त्याच्या जाहिराती एकाचवेळी प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत. एकेक पद्धतीची पदे भरल्यानंतर पुढील पदे भरण्यासाठीची प्रक्रिया आयोग सुरू करणार आहे.


सरकारी खाती, महामंडळे व इतर सरकारी संस्थांमध्ये मिळून एकूण ६ हजार १७५ रिक्त पदे आहेत. यातील काही पदांच्या जाहिराती आल्या आहेत. तर काही पदे कर्मचारी निवड आयोगाकडे पाठविण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अधिवेशनात लेखी स्वरुपात दिली आहे. विरोधी पक्षनेते नेते युरी आलेमात व आ. एल्टन डिकॉस्टा यांनी याबाबत लेखी प्रश्न मांडला होता. राज्यात सरकारी खात्यात अनेक वर्षांपासून रिक्त पदे आहेत. ती अजून भरलेली नाहीत. आता काही पदांसाठी जाहिराती काढल्या असून, लेखी परीक्षाही झाल्या आहेत. आता सरकार कर्मचारी भरती आयोगामार्फत सरकारी पदे भरली जाणार असल्याने बहुतांश पदांसाठी भरती आयोग करणार आहे, असे या लेखी उत्तरात म्हटले आहे. राज्यात आता आयोगामार्फत पदांची भरती सुरू आहे, तर काही पदे कंत्राटी तत्वावर काढली जात आहेत. बहुतांश बेरोजगार लोक या सरकारी नोकऱ्यांवर लक्ष ठेऊन असून ही पदे कधी भरली जाणार याची वाट पाहत आहेत. अनेक वर्षांपासून सरकारी अनेक खात्यात रिक्त पदे असून ती भरली जात नाही. बहुतांश सरकारी कर्मचारी आता निवृत्त होणार असल्याने ही रिक्तपदे आणखी वाढली जाणार आहेत

 

  • राज्यात विविध सरकारी खात्यात एकूण ८३९ कंत्राटी तत्त्वावर कामगार काम करत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अधिवेशनात लेखी स्वरूपात दिली आहे. आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी प्रश्न मांडला होता.
  • शिक्षण, वीज यांसारख्या खात्यात अनेक कर्मचारी कंत्राटी तत्वावर काम करत आहेत. यातील काही कामगारांचे वय होत आले तरी अजून त्यांना सेवेत कायम केलेले नाही. अधिवेशनात विरोधकांनी विचारलेल्या या लेखी ८३९ कंत्राटी कामगार उत्तरात या कंत्राटी कामगारांचा आकडा समोर आला आहे. यापैकी सर्वाधिक जास्त कंत्राटी कामगार हे वीज खात्यात असून, वीज खात्यात २०२ कंत्राटी कामगार आहेत.
  • तांत्रिक शिक्षण संचालनालयात १३७ कामगार हे कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत. तर त्याच्या खालोखाल शिक्षण खात्यात ९९ कंत्राटी कामगार आहेत. क्रीडा खात्यात ६१ कामगार आहेत. पर्यटन खात्यात ४९, तर महिला बाल कल्याण खात्यात या ४९ कामगार है कंत्राटीतत्त्वावर आहे.

 


Goa PSC Recruitment 2024: गोवा लोकसेवा आयोगातर्फे (जीपीएससी) विविध खात्यांतील २४ पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. या जागा भरण्यासाठी आयोगातर्फे नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जागांसाठी इच्छुकांना आयोगाच्या संकेस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहेत. २४ पैकी १९ जागांवर थेट, तर ५ जागांवर बदली प्रतिनियुक्तीद्वारे (ट्रान्सफर बाय डेप्युटेशन) भरती करण्यात येणार आहे, असे आयोगाने जाहिरातीत म्हटले आहे.

थेट पद्धतीने भरण्यात येणाऱ्या १९ जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ मे २०२४ असून बदली प्रतिनियुक्तीच्या पाच जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जून २०२४ आहे. यानुसार गोवा वैद्यकीय महविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून ५ जागांवर बदली प्रतिनियुक्तीद्वारे भरती केली जाईल. मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्थेत (आयपीएचबी) दोन मानस शास्त्रज्ञांची थेट पद्धतीने भरती होणार आहे.

याशिवाय आरोग्य संचालनालयात दोन, आर्किटेक्चर महाविद्यालयात एक, अभियांत्रिकी महाविद्यालय दहा, शासकीय तंत्रनिकेतनमध्ये एक, महिला आणि बालकल्याण खात्यात दोन, उच्च शिक्षण खात्यात एका जागेवर थेट पद्धतीने भरती होणार आहे. अर्ज केलेल्या व्यक्तींची आयोगातर्फे मुलाखत घेतली जाणार आहे. ‘अ’ गटातील जागांसाठी कोकणीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. मात्र पात्र उमेदवार न मिळाल्यास आयोगातर्फे ही अट शिथिल करण्याची शिफारस करण्यात येईल, असे जाहिरातीत म्हटले आहे.

GPSC Goa Bharti 2024 – नवीन जाहिरात प्रकाशित- अर्ज करा

Goa PSC Recruitment 2024

सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकर भरती वादात सापडल्यानंतर आता राज्य सरकारने राज्य कर्मचारी भरती आयोगाच्या कामाला गती दिली आहे. ‘क’ वर्गीय पदे भरण्यासाठी या आयोगाकडून जाहिरात दिल्यानंतर घ्यावयाच्या संगणकीकृत लेखी परीक्षेसाठी प्रश्नावली तयार करण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, परीक्षेनंतर अर्ध्या तासातच निकाल जाहीर केला जाणार आहे. या आयोगाचे सदस्य मिनिनो डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुमारे 200 पदे भरण्यासाठी लेखी परीक्षा घेण्याचा आयोगाचा विचार आहे. खरे तर ऑक्टोबरमध्येच अशी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, विविध खात्याकडून पदांची मागणी करणाऱ्या विनंती उशिरा पोहोचल्याने आयोगाने त्यावरील प्रक्रिया पुढे ढकलली होती. पाटो-पणजी येथील स्पेसीस इमारतीमधील या आयोगाचे कार्यालय सध्या गजबजलेले आहे. लेखी परीक्षा घेण्यासाठी प्रश्नावली तयार करण्याचे काम एका स्वतंत्र यंत्रणेकडे आयोगाने सोपवले आहे. त्या यंत्रणेकडून डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रश्नावली तयार होऊन मिळाल्यानंतर लेखी परीक्षेची तयारी आयोग करणार आहे. तत्पूर्वी या पदांसाठी जाहिरात दिली जाणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

खातेनिवडीची उमेदवारांना संधी

राज्य कर्मचारी भरती आयोग पदे भरतीसाठी गुणवत्ता यादी तयार करणार आहे. समजा, कनिष्ठ लिपिक पदासाठी आयोगाने लेखी परीक्षा घेतली तर त्याच्या लेखी परीक्षेची गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. त्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना कोणत्या खात्यात सेवा बजावायची आहे, त्या पर्यायाचा निवड करण्याची संधी दिली जाणार आहे.

अर्ध्या तासातच निकाल

साबांखा भरती प्रक्रियेतील निकाल जाहीर करण्यास पाच महिन्यांचा कालावधी लागल्याने सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे राज्य कर्मचारी भरती आयोगाने लेखी परीक्षा घेतली की परीक्षा संपल्यावर अर्ध्या तासातच निकाल जाहीर केला जाईल, अशी संगणकप्रणाली वापरली जाणार आहे. आयोगाच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला आहे.

 


पणजी, राज्य सरकार यापुढील कर्मचारी भरती ही राज्य कर्मचारी भरती आयोगाच्या माध्यमातूनच करणार आहे. केवळ खात्यांच्या माध्यमातून सुरु असलेली भरती पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, या मुदतवाढीमुळे यापुढील कर्मचारी भरती ही खात्यांच्या माध्यमातूनच होणार, असा गैरसमज पसरला आहे. वस्तुस्थिती तशी नाही.

 

खात्यांच्या माध्यमातून कर्मचारी भरतीचे काही टप्पे उरले आहेत. ते पूर्ण करण्यासाठी त्यांना आणखीन तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. विविध खात्यांनी आपल्याला लागणाऱ्या मनुष्यबळाची मागणी आयोगाकडे केली आहे. आयोग लवकरच जाहिराती देऊन ती पदे भरण्यासाठी अर्ज मागवणार आहे. खात्यांचा हस्तक्षेप या कर्मचारी भरतीत नसेल. गोवा लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर हा कर्मचारी भरती आयोग स्वतंत्रपणे काम करणार आहे. सध्या सुरू असलेली कर्मचारी भरती खात्यांच्या माध्यमातून सुरू होणार आहे तर नवीन भरती आयोगाच्या माध्यमातून केली जाणार आहे.

 

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले, की दिल्लीतील गोवा सदन मध्ये पद भरती करण्यासाठी कोकणी सक्तीची करण्यात आली आहे. याआधी कोकणी सक्ती शिथिल करण्यात आली होती. यावर सक्ती कधी शिथिल केली आणि किती पदे भरण्यात येतील याबाबत विचारले असता ती माहिती आपल्याकडे आता उपलब्ध नाही, असे त्यांनी सांगितले. २ कोटी १३ लाख रुपयांच्या माहिती व प्रसिद्धी खात्याच्या खर्चाला कार्योत्तर मंजरी देण्यात आली आहे. झुआरी पुलाच्या छायाचित्रणाच्या ६५ हजार रुपयांच्या खर्चाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालये आणि महिला बालकल्याण खात्याने कोविड काळात केलेल्या खर्चाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली.

 


Goa PSC Recruitment CBT : The CBRT/Screening Test for the Junior Scale Officer, Associate Professor, Assistant Director, Assistant Public Prosecutor, Tutor, Junior Ophthalmic Surgeon, Planning Officer, Medical officer, Assistant Agriculture Officer positions will be conducted by the Goa Public Service Commission on 20/02/2022. Further details are as follows:-

GPSC CBRT/ Screening Test

गोवा लोकसेवा आयोगाकडून 20/02/2022 रोजी “कनिष्ठ स्तर अधिकारी, सहयोगी प्राध्यापक, सहायक संचालक, सहायक सरकारी वकील, शिक्षक, कनिष्ठ नेत्र शल्यचिकित्सक, नियोजन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सहायक कृषी अधिकारी” पदांसाठी CBRT/स्क्रीनिंग चाचणी घेतली जाणार आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

गोवा लोकसेवा आयोग (GPSC) भरती नवीन जाहिरात प्रकाशित; ऑनलाईन अर्ज सुरू

 

  • पदाचे नाव – कनिष्ठ स्तर अधिकारी, सहयोगी प्राध्यापक, सहायक संचालक, सहायक सरकारी वकील, शिक्षक, कनिष्ठ नेत्र शल्यचिकित्सक, नियोजन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सहायक कृषी अधिकारी
  • CBRT/स्क्रीनिंग चाचणी तारीख – 20/02/2022 

GPSC Screening Test | GPSC Computer Based Recruitment Test

Goa PSC Recruitment CBT

Candidates should compulsory report at the venue, within the reporting time mentioned on their hall ticket. The candidates are requested to check their email for further details and those who cannot download their hall ticket by 14/02/2022, should personally report to the office of the Commission from 15/02/2022 to 17/02/2022, during office hours along with their Identity proof to collect their hall ticket. Candidates without Hall Ticket will not be allowed to answer the CBRT/ Screening Test. The candidates should make their own arrangements to reach the center within the reporting time. Syllabus for the CBRT/ Screening Test is already uploaded on Commission’s website.

PDF जाहिरात – https://bit.ly/338PFwh

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड