Goa Police physical Examination Update – Hello Friends, Important Update about Police Bharti Physical Exam is out. As per the latest News The Physical Exam of Police Bharti is under Objection. Six candidates have challenged the physical test conducted as part of the recruitment process for the Police Sub-Inspector post in the High Court. The petition alleges serious technical errors and inconveniences during the 800-meter running test. Taking cognizance of this, the Goa bench of the High Court has issued notices to the state government, the Goa Staff Selection Commission, and the Director General of Police. The test was conducted in December 2025 at the police grounds in Altinho. The petitioners claim that despite passing all other tests, they were disqualified solely due to technical reasons in the 800-meter race. The petition also alleges that 60 candidates were made to run simultaneously on a small 4.5-meter track, causing them to obstruct each other. There were flaws in the microchips and sensors attached to their feet for timekeeping, resulting in inaccurate time recordings for many. The running track was covered with sand instead of soil, which was dangerous for running. The petitioners, including Sai Naik, stated that candidates should have been informed of their time after each lap, but this was not done.
पोलिस उपनिरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेत घेण्यात आलेल्या शारीरिक चाचणीला ६ उमेदवारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ८०० मीटर धावण्याच्या चाचणीत गंभीर तांत्रिक चुका आणि गैरसोयी झाल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. याची दखल घेत उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकार, गोवा कर्मचारी निवड आयोग आणि पोलिस महासंचालकांना नोटीस बजावली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये आल्तिनो येथील पोलिस मैदानावर ही चाचणी घेण्यात आली होती. इतर सर्व चाचण्यांत उत्तीर्ण होऊनही केवळ ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत तांत्रिक कारणांमुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. साडेचार मीटरच्या छोट्या ट्रॅकवर एकाच वेळी ६० उमेदवारांना धावण्यास सांगितले, अन् यामुळे धावताना एकमेकांचा अडथळा झाला, असा आरोप देखील याचिकेतून करण्यात आला आहे. वेळेची नोंद करण्यासाठी पायाला लावलेल्या मायक्रोचिप्स आणि सेन्सरमध्ये त्रुटी होत्या. त्यामुळे अनेकांची अचूक वेळ नोंदवली गेली नाही. धावण्याच्या मार्गावर मातीऐवजी वाळू टाकली होती, जी धावण्यासाठी धोकादायक होती. धावताना प्रत्येक फेरीची वेळ उमेदवारांना कळवणे आवश्यक होते, जे करण्यात आले नाही, असे याचिकाकर्ते साई नाईक यांनी सांगितले.

याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, ही प्रक्रिया संविधानाने दिलेल्या समान संधीच्या अधिकाराचे उल्लंघन करणारी आहे. न्यायालयाने या तक्रारींची गंभीर दखल घेत सर्व संबंधित विभागांना नोटीस पाठवली आहे.
उमेदवारांची मागणी
८०० मीटर धावण्याची चाचणी रद्द करून ती पुन्हा चांगल्या ट्रॅकवर घ्यावी.
अपात्र ठरलेल्यांची पुन्हा परीक्षा घ्यावी.
निकाल लागेपर्यंत लेखी परीक्षा स्थगित ठेवावी.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















