लष्करात भरती होण्याची सुवर्णसंधी! गोव्यातील बांबोळीत आर्मी भरतीचे आयोजन | Goa Agniveer Bharti 2024
Goa Agniveer Bharti 2024
Goa Agniveer Bharti 2024
There is good news for lakhs of youth preparing for army recruitment. There is a great opportunity for the youth who dream of joining the Indian Army. Today everyone is struggling to get a government job. Whatever kind of job it is. But if this job offers direct national service opportunity then yes, true..
मराठा लाईट इन्फंटी रेजिमेंटल सेंटरमध्ये २७ जूनपासून अग्निवीर अंतर्गत सैन्यभरतीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी स्टेडियमवर महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक व आंध्रप्रदेशातील उमेदवारांना संधी मिळणार आहे. इच्छुकांनी भरती प्रक्रियेत भाग घ्यावा असे आवाहन मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे करण्यात आले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मागील काही महिन्यांपासून लष्कर भरतीची चातकासारखी वाट पाहणाऱ्या तरुणांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. 24 जून ते 04 जुलै 2024 या कालावधीत गोव्यात लष्कर भरतीचे आयोजन करण्यात येत आहे. पात्र उमेदवार तात्काळ यासाठी अर्ज करु शकतात.
Army Recruitment Rally pic.twitter.com/G489PDv5Ki
— DIP Goa (@dip_goa) June 3, 2024
अग्निवीर अंतर्गत जीडी, ट्रेड्समन व क्लार्क पदासाठी १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जी.डी. (जनरल ड्युटी) पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. क्लार्क पदासाठी बारावी उत्तीर्ण तसेच ट्रेड्समन पदासाठी दहावी व आठवी उत्तीर्ण आवश्यक आहे.
२७ जून रोजी खेळाडूंसाठी शारीरिक चाचणी होणार आहे. २८ रोजी केवळ महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी जनरल ड्युटी पदासाठी भरती होईल. अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई येथील उमेदवारांना संधी देण्यात येईल.
२९ रोजी नागपूर, नांदेड, नंदूरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमधील उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल.
१ जुलै मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा, कर्नाटक व आंध्रप्रदेश येथील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. २ जुलै रोजी ट्रेड्समन पदासाठी भरती होईल. ३ जुलै रोजी ऑफीस असिस्टंट (क्लार्क), स्टोअरकिपर टेक्निकल या पदांसाठी केवळ मराठा इन्फंट्रीच्या माजी सैनिकांना संधी देण्यात येईल. ८ सप्टेंबरला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
दरम्यान, गोव्यातील (Goa) बांबोळी येथील 3-TTR मैदानावर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील सर्व राज्यातील पात्र तरुण वरील नमूद केलेल्या कालावधीत अर्ज करुन भरती प्रक्रियेसाठी हजर राहू शकतात. भारतीय सैन्य भरती रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. अधिसूचनेनुसार पात्र उमेदवार www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर नोंदणी करु शकतात. वैध ईमेल आयडीद्वारे प्रवेश पात्र आहे. लष्करात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांसाठी ही खास संधी आहे. बिलकुल ही संधी सोडू नका..
Goa Agniveer Bharti 2024: The second batch of 2058 firemen are all set to join the army directly under the ambitious Agneepath scheme of the central government. Brigadier Arvinder Singh Sahani initiated these soldiers in the induction ceremony held at 3-MTR Regiment in Naveli. The training of these firemen will be completed on October 3 and after that they will be sent to the army, said Bri. Sahani said. He also informed that some of them will get a chance to go directly to the border and work. Download Goa Agniveer Bharti 2023 Notification at below:
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अग्नीपथ योजनेअंतर्गत 2058 अग्नीविरांची दुसरी तुकडी प्रत्यक्ष सैन्यात रूजू व्हायला सज्ज झाली आहे. नावेली येथील थ्री-एमटीआर रेजिमेन्टमध्ये झालेल्या दीक्षांत सोहळ्यात ब्रिगेडियर अरविंदरसिंग सहानी यांनी या जवानांना दीक्षा दिली. या अग्नीविरांचे प्रशिक्षण 3 ऑक्टोबर रोजी पूर्ण होणार असून त्यानंतर त्यांना सैन्यात पाठविण्यात येणार आहे, असे ब्रि. सहानी यांनी सांगितले. यातील काहीजणांना प्रत्यक्ष सीमेवर जाऊन काम करण्याची संधी मिळणार अशीही माहिती त्यांनी दिली.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या अग्नीविरांना गोव्यात सैनिकी प्रशिक्षण दिले गेले असले तरी या दुसर्या तुकडीतही गोव्याचा एकही जवान नव्हता. आतापर्यंत या योजनेखाली सुमारे 3000 अग्नीवीर तयार करण्यात आले असून यातील पहिली तुकडी मार्च 2023 मध्ये प्रशिक्षण पूर्ण करुन सैन्यात रुजू झाली होती. त्यानंतर गेले काही महिने नावेली येथील सैनिक तळावर या दुसर्या तुकडीचे प्रशिक्षण चालू होते.
शारीरिक प्रशिक्षण, शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण, वाहनांतून गोळीबार करण्याचे प्रशिक्षण तसेच अत्याधुनिक यंत्रणेद्वारे केले जाणारे कार्य यांचे प्रशिक्षण येथे देण्यात आले होते. हे प्रशिक्षण शौर्यचक्र विजेते एम.के. शर्मा यांच्या देखरेखीखाली दिले गेले. दुसर्या तुकडीत देशाच्या विविध भागातून प्रशिक्षणासाठी आलेल्या अग्नीविरांचा समावेश होता. यावेळी प्रशिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल रितीक यादव, ब्रिजेश कुमार आणि हेमंत कुमार यांना गाैरविण्यात आले.
तर गट प्रशिक्षणामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अभिमन्यु पाल, सागर एहलावट आणि अभिषेक पांडे यांना पदक देऊन गौरविण्यात आले. या अग्नीविरांच्या पालकांनाही यावेळी गौरव पदक देऊन गौरविण्यात आले. या अग्नीविरांकडून प्रेरणा घेऊन आणखी युवक सैन्यात भरती होण्यासाठी तयार होतील अशी आशा ब्रि. सहानी यांनी व्यक्त केली.