Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत “या” पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; असा करा अर्ज!! | GMC Miraj Bharti 2024

GMC Miraj Bharti 2024

Government Medical College Miraj Bharti 2024

GMC Miraj Bharti 2024: Government Medical College & Hospital (GMC) Miraj has issued the notification for the recruitment of “Professor, Associate Professor”. There are total of 13 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Miraj. Eligible candidates can apply through the given mentioned link. The last date for submission of the online application should be the 22nd of February 2024. For more details about Government Medical College Miraj Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
  • पदसंख्या13  जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मिरज, सांगली
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख22 फेब्रुवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.gmcmiraj.edu.in/

GMC Miraj Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
प्राध्यापक 03 पदे
सहयोगी प्राध्यापक 10 पदे

Educational Qualification For GMC Miraj Online Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक M.S., M.D.
सहयोगी प्राध्यापक M.S., M.D., DNB

Salary Details For GMC Miraj Professor Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्राध्यापक रु.१,८५,०००/-
रु.२,००,०००/-
रु.२,३०,०००/-
सहयोगी प्राध्यापक रु.१,७०,०००/-
रु.१,८५,०००/-
रु.२,१०,०००/-

How To Apply For Government Medical College & Hospital Miraj Application 2024

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.gmcmiraj.edu.in Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/lpuN0
???? ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/anAH1
✅ अधिकृत वेबसाईट https://www.gmcmiraj.edu.in/

 

 

 

GMC Miraj Bharti 2023 details

It has been found that more than 45 per cent of the seats in government hospitals do not have manpower. In comparison, patient stress has doubled in the past few years. There is not enough manpower in all the posts from doctors to class IV. Efforts are being made to keep patient care uninterrupted by deploying staff from one department to another department. As many as 313 of the 739 class I to IV seats do not have staff. That means about 45 percent of the seats are vacant. As many as 135 of the 237 posts are vacant in class IV. Each employee has to manage four wards. Judicial transfer staff since 1997 are constantly awaiting appointment.

 

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या भेटीनंतर शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात अनुकंपा तत्वावरील चार जागा बुधवारी भरण्यात आली. उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. उर्वरित पदांसाठी आरक्षणाची बिंदुनामावली निश्चित करण्याचे काम सुरू आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शासकीय रुग्णालयात तब्बल ४५ टक्क्यांहून अधिक जागांवर मनुष्यबळच नसल्याचे आढळून आले आहे. त्या तुलनेत गेल्या काही वर्षांत रुग्णांचा ताण मात्र दुप्पटीने वाढला आहे. डॉक्टर्सपासून चतुर्थ श्रेणीपर्यंतच्या सर्वच जागांवर पुरेसे मनुष्यबळ नाही. एका विभागातील कर्मचारी दुसऱ्या विभागात नेमून रुग्णसेवा अखंडित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वर्ग एक ते चारच्या ७३९ पैकी तब्बल ३१३ जागांवर कर्मचारी नाहीत. म्हणजे सुमारे ४५ टक्के जागा रिक्त आहेत. चतुर्थ श्रेणीमध्ये २३७ पैकी तब्बल १३५ पदे रिक्त आहेत. एकेका कर्मचाऱ्याला चार-चार वॉर्ड सांभाळावे लागत आहेत. १९९७ पासूनचे न्यायालयीन बदली कर्मचारी कायम नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

 

दरम्यान, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गेल्या महिन्यात सांगली व मिरजेतील शासकीय रुग्णालयांना भेटी दिल्या होत्या. रिक्त जागांचा आढावा घेतला होता. त्या भरण्याची सूचना जिल्हाधिकारी व अधिष्ठात्यांना केली होती. चतुर्थश्रेणी पदे भरण्याचे अधिकारी जिल्हास्तरावर आहेत. त्यानुसार या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या जागांचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ती पूर्ण होताच जिल्हाधिकाऱ्यांकडून भरती प्रक्रियेस प्रारंभ होईल. कायम नियुक्त्यांसाठी न्यायालयात धाव घेतलेल्या जागांव्यतिरिक्त उर्वरित जागा जिल्हाधिकाऱ्यांकडून भरल्या जाणार आहेत. दरम्यान, पहिल्या टप्प्यात अनुकंपा तत्वावरील चार जागांवर उमेदवारांची नियुक्ती झाली आहे. बुधवारी त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. ही सर्व पदे चतुर्थश्रेणी दर्जाची आहेत.

 

परिचारिकांच्या तब्बल २७६ जागा रिक्त
शासकीय रुग्णालयासाठी क वर्ग परिचारिकांची ३९९, तर ड वर्ग परिचारिकांची २३७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी अनुक्रमे २५८ व ९० पदांवरच परिचारिका काम करत आहेत. उर्वरित तब्बल २७६ जागा रिक्त आहेत. रजा, सुट्ट्या आदी सांभाळून परिचारिकांना रुग्णसेवा करावी लागत आहे. यातील क दर्जाची पदे, तसेच प्रथम व द्वितीय श्रेणीच्या रिक्त पदांवर भरतीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड